संशोधन करणे

ज्योतिषांनी केलेले भकित का चुकते?
सध्याचे युग हे अंत्यत आधुनिक युग म्हणुन संबोधले जाते. या आधुनिक काळात ज्योतिषा कडे सुध्दा आधुनिक उपकरने पाहिजेत. जिथे प्रत्येक सेकंदची गणना ठेवली जाते, तिथे चूक करुन कशी चालेल. काहि ज्योतिषी बाजारात मिळणार्या. अनाधिकृत संगणक प्रणाली तसेच कुंडलीचा वापर करतात. तसेच बाजारात मिळणार्याि पंचागावर, आपल्या हातातील घडाळ्यावर, भिंत्तीवरील किंवा भ्रमणध्वनी असणार्याच घडाळ्याच्या समय सुचना प्रणाली वर अवलबुन राहतात. कुंडलीशास्त्र हे आकाशातील ग्रह तारे व तारका समुह ह्याच्या वर आधारीत आहे. ह्याचा कालखंडा विषयी आपणा विचार न केलेला बरा. पण त्यातील काही संकेत व भाष्य आपण आताच्या आधुनिक युगात, आधुनिक शास्त्राच्या मदतीने नवनवीन प्रकारे सोडवण्याचा प्रयत्न पाहीजे.
पुर्वी फक्त नऊ ग्रह व २७ नक्षत्रे ह्यांच्यावर ज्योतिषशास्त्र अवलंबून होते, त्यानंतर राहु,केतु,हर्षल,प्लुटो, नेपचून इत्यादि ग्रह व काही तारका व तारका समुहाचा भर त्यात पडला, अजून पर्यंत हर्षल व नेपचून ह्या विषयी या शास्त्रात योग्यते संशोधन झाले नाही. कारण त्याचा कालखंड फार मोठा आहे.
आता भवीष्य वर्तन करण्यापूर्वी ज्योतिषानी खालील काही बांबींचा विचार करावा असे माझे मत आहे. ह्याचे संशोधन मी करत आहे, संशोधन करताना चुका होतात, चुक दुरुस्त करण्यासाठी आपल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. प्रत्येकाला आपले मत प्रदर्शित करण्याचा अधिकार आहे. आपले मत चांगले असो वा वाईट मला ह्यातून नवनवीन कल्पना मिळतील यात तिळमात्र शंका नाही.
जातक कुंडली, वास्तू कुंडली, जन्मठिकाणाचा आकाशातील ग्रह आणि तारका समुहाचा जन्मवेळेचा व आजचा नकाशा, जातकाची वैज्ञानिक कुंडली, थर्मलइमेज कुंडली, इत्यादि सर्व कुंडली बनवून अभ्यासाची एक नविन पध्दत मी विकसीत करत आहे.
१. २७ नक्षत्र व त्यातील काही तारका व तारका समुहातील मंद प्रकाश तार्यारचा विचार करावा.
२. प्रत्येक तारका समुह हा आकाशात ( डोक्यावरती ), पाताळात ( विरुध्द दिशेस ), उजवीकडे तसेच डावीकडे व कोणत्या दिशेस आहे हे लक्षात घेऊन कुंडलीचा अभ्यास करावा.
३. तारका समुहातील ग्रह व त्या जवळील तारका व इतर तारका समुह, धुमकेतु सुध्दा विचारात घ्यावे.
४. आकाश गंगेतील धुमकेतू व उल्काचा प्रत्येक राशीतील प्रवेश व त्याच्या कालखंडचा विचार करावा.
५. प्रत्येक ग्रहा जवळील धुमकेतू आणि उल्का याचा मार्ग व त्यांचा होणारा ग्रहाशी योग सुध्दा लक्षात घ्यावा.
६. प्रत्येक ग्रह व तारका समुह आणि धुमकेतु मधील अंतर, त्या मधील होणारे योग व इतर ग्रहाचा त्यावर होणारा परिणाम सुध्दा लक्षात घावा.
७. निश्चित केलेल्या भ्रमण रेषेला छेदून जाणारे ग्रह, तारका, नक्षत्र, धुमकेतू उल्का व इतर तारका समुहातील नक्षत्रे याचा परिणाम ची नोद करावी.
७. जातक ज्या ठिकाणी राहात असेल त्या ठिकाणाचा भौगोलीक व आकाशातील ग्रह तारका समुहाचा नकाशा बनवून त्याचे वाचन करावे.
८. २७ नक्षत्रच्या बाजुला असलेले दुसरी नक्षत्रे आणि तारका समुहाचा विचार करावा.
९. जातकाची वैज्ञानीक कुंडली, वास्तुकुंडली व जन्मकुंडली ह्याचे निरीक्षण करुन त्याची पत्रीका तयार करणे व उपाय योजना सांगितल्या नतंर झालेल्या परीणामाची नोंद करुन ठेवणे.
१०. जातक राहत असलेल्या ठिकाणाची समुद्र सपाटीपासुन उंची, वास्तुतील मोकळ्या जागेतून अवकाशातुन येणार्यात किरणाची टक्केवारी इत्यादिचा विचार आवश्यक आहे.
११. वास्तुतील रेडिओ लहरीची तीव्रता, तसेच वास्तुतील विद्युत उपकरणे यातून निघणार्याा लहरी, वास्तुतील चुंबकीय क्षेत्र व त्याचे मोजमाप सुध्दा करणे गरजेचे आहे.
१२. वास्तुचा व जातकाचा र्थमलइमेज कुंडलीचा अभ्यास व उपाय योजना केल्यावर झालेला बदल ह्याचे निरीक्षण करणे व त्याची नोद ठेवणे
ह्या सर्वगोष्टीचा विचार करुन जातकाची कुंडलीचे भाष्य करने योग्य होईल असे मला वाटते.

संजीव

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम कल्पना

वरील १३ कलमे उत्तम आहेत.

अनेक ठिकाणी सांगितल्याप्रमाणे (अ) ग्रह/ज्योति:स्थिती, (आ) उपाययोजना आणि (इ) परिणाम यांची नोंद करून ठेवण्याबद्दल प्रस्ताव आहे. हे उत्तम. अशा तपशीलवार नोंदींशिवाय संशोधन पुढे जाणे नाही.

नोंदी

अशा तपशीलवार नोंदींशिवाय संशोधन पुढे जाणे नाही.

या नोंदीच
१) कोणत्या कोणत्या करायच्या
२) कशा करायच्या?
३) कुणी करायच्या?
कुठल्याही विदा बाबत 'पुरेसा' किंवा त्याची 'विश्वासार्हता' हे मुद्दे पुढे येतात. वस्तुनिष्ठ नोंदी घेण्यासाठी यंत्रणा जी आवश्यक आहे ती ज्योतिषसमर्थक आणि विरोधक या दोघांनाही महत्वाची वाटत नाही. ज्योतिषा कडे जाण्यापुर्वी मधील प्रश्न
६२) परदेशातील फलज्योतिष संशोधनावरची उदाहरणे नेहमी उगाळली जातात मग आपल्याकडे या विषयावर संशोधन का केले जात नाही?

प्रकाश घाटपांडे

वैज्ञानिक कुंडली?

वैज्ञानिक कुंडली ही नेमकी काय भानगड आहे? शब्दप्रयोग चांगला आहे.
प्रकाश घाटपांडे

वैज्ञानिक कुंडली ही नेमकी काय भानगड आहे

श्री प्रकाशजी
वैज्ञानिक कुंडली म्हणजे जातकाचा E.C.G. E.E.G., आरो, र्थमल ईमेज, रक्त व इतर चाचण्या चा नकाशा जो सजीव जीवनातील झालेले बद्ल दर्शवितो.

संजीव

भाकिते कधी बरोबर येतात?

या सर्व सूचनांचं व्यवस्थित प्रपोजल तयार करून तुम्ही भारत सरकारकडे पाठवलंत तर तुम्हाला अनुदान मिळेल का, असा विचार करा. खरं तर तुम्ही या प्रश्नाची कुंडली मांडून आधीच उत्तर काढू शकाल. जर अनुदान मिळणार नसेल तर शेअर बाजारात तुम्ही उत्तम पैसा कमावू शकालच. अर्थातच स्वतःसाठी नव्हे, तर शास्त्राच्या विकासासाठी...

मुद्दा असा आहे की एखाद्या थियरीचा विकास करायचा असेल तर तिचा विशिष्ट मर्यादेपर्यंत उपयोग होतो, आणि त्यापुढे तिला जाता येत नाही हे सिद्ध झाले पाहिजे. आत्तापर्यंत एकाही प्रख्यात जोतिषाने हे सिद्ध करण्याचे आव्हान स्वीकारले नाही. जर दहा ज्ञानी जोतिषांनी केलेली भाकितं वेगवेगळी येत असतील व त्याहूनही वाईट म्हणजे ती अज्ञानी माणसाने किंवा नाणं उडवून केलेल्या भकितापेक्षा वेगळी येत नसतील, तर अर्थ काय राहिला? इंजीनच नसलेल्या गाडीला अजून दहा चाकं जोडून ती पुढे थोडीच जाणार आहे?

राजेश

 
^ वर