ग्रहांच्या परिभ्रमण पध्दतिचा अभ्यास
ग्रहांच्या परिभ्रमण पध्दतिचा अभ्यास
ज्योतिषशास्त्रामध्ये कालानिर्णयपध्दति जर समजेल तरच फ़ल-ज्योतिषाचे महत्व आहे नाही तर हे शास्त्र हस्तसामुद्रिकाचे दर्जाचे होईल, ज्याप्रमाणे सामुद्रिक जाणणारांनी हात पाहून अंत:करणरेषा, मस्तकरेषा, आयुष्य रेषा व ग्रहांचे उंचवटे पाहून आयुष्यात मुख्य मुख्य गोष्टीचे वर्णन करावे. परंतु कालनिर्णयाचे कामी हस्त सामुद्रिक अतिशय लंगडे पडते. अमुक एक गोष्ट अमुक वेळी होईल हे मुळीच सांगता येते नाही, जे सामुद्रिक लोक कालनिर्णय सांगतात त्याला काही आधार नाही. अंदाजाने राम भरोसे काहीतरी थापा मारत असतात. त्या थापांनी ग्राहक थोडावेळ फ़सतो, पंरतु पुढे हस्तसामुद्राबद्दल त्याचा आदर कमी होऊन तो करमणुकीचा विषय आहे असे त्यास वाटू लागते. ( सामुद्रिक ज्योतिषानि वाईट वाटून घेऊनये ..क्षमस्व )
फ़लज्योतिषाला कालनिर्णय समजला नाही तर हे शास्त्र सामुद्रिकासारखे झाले असते. परंतु फ़लज्योतिषशास्त्र, कालनिर्ण याचे कामी अतिशय सूक्ष्म जाऊ शकते. प्रत्येक दिवस चांगला आहे किंवा नाही हे सुध्दा सांगता येते, आज आपण एखाद्या कामास जात आहोत, तेव्हा ते काम फ़त्ते होईल किंवा नाही हे सांगण्यास फ़ल-ज्योतिषशास्त्रात जसा शास्त्रशुध्द मार्ग आहे, तसा मार्ग हस्त सामुद्रिकांमध्ये कोणता आहे हे आम्हांस सामुद्रिक जाणाकारांनी दाखवावे.
कालनिर्णयाच्या अनेक वर्षफ़लपध्दति आहेत. ताजिक पद्धत, गोचर पद्धत, अंगिरस पद्धत, दिनवर्ष पद्धत, तात्काळ ग्रह-नक्षत्र पद्धत, कुष्णमूर्ति पद्धत व प्रायमरी डीरेक्शन पद्धत. त्यांपैकी आम्हांस दिनवर्ष व गोचर पध्दतीचा चांगला शिकवण्याचा अनुभव आहे.
आता परिभ्रमणा पध्दतीचा विचार करु. कै. श्री जीवनराव चिटणीस या पद्धतीचा फ़ार उपयोग करीत असत व त्या पद्धतीवर त्यांचा फ़ार विश्वास होता, ही पद्धत परदेशातील ज्योतिषी उपयोगात आणतात. ही पद्धत वैद्य सीमोनाईटच्या “ अर्कना “ नामक पुस्तकात दिली आहे.
रवि १९ वर्षे, बुध १० वर्षे, शनि ३० वर्षे, चंद्र ४ वर्षे, गुरु १२ वर्षे, हर्षल ८४ वर्षे, मंगळ १५ वर्षे, शुक्र ८ वर्षे, नेपच्यून १६४ वर्षे.
इतक्या वर्षात ह्या ग्रहांचा एक फ़ेरा सर्व राशिचक्रामध्ये पुरा होतो. त्यात गुरु, हर्षल, नेपच्यून, शनि हे खरोखर इतक्या वर्षात राशिचक्राचा फ़ेरा पुरा करतात. म्हणून त्या ग्रहांचे परिभ्रमण सोपपत्तिक आहे. हे स्पष्ट होते. परंतु रवि एक वर्षानी राशिचक्र पुरे करीत असून त्याला १९ वर्षे कां धरावी हा प्रश्न शिल्लक राहतो, त्याची उत्पती खालीलप्रमाणे दिली आहे.
मनुष्याचे पूर्ण आयुष्य १२० वर्षे असते ( हे आपल्या विंशोत्तरी दशेवरुन सिध्द होते ) गतीचे न्यूनधिक्याप्रामाणे ग्रहांचा क्रम चंद्र, शुक्र, बुध, मंगळ, गुरु व शनि असा आहे. ( ग्रहाची एका नंतर एकाची दशा सम ग्रहाच्या अधिकार क्षेत्रात) त्यात चंद्र अति शीग्र गतीचा आहे व शनि मंद. शनिची प्रदक्षिणा ३० वर्षाने होते म्हणून पूर्ण आयुष्य १२० वर्षे भागिले ३० म्हणजे ४ वर्षे ही चंद्राला दिली. गुरुची प्रदक्षणा बारा वर्षाची आहे. म्हणून १२० ÷ १२ = १० वर्षे ही बुधाला दिली. मंगळाचे परिभ्रमण १५ वर्षे. ( कित्येकवेळा १९ वर्षे मानतात त्याचे उत्पती लागत नाही ). १५ वर्षे मानली तर १२० ÷ १५ = ८ वर्षे ही शुक्राची. हा आकडा १९ चा वर्गाच्या जवळपास येतो ( १९ X १९ = ३६१ ) म्हणून रविचा काल १९ वर्षाचा ठरविला. सूर्य-चंद्र ग्रहणाचा पुर्ण फ़ेरा १९ वर्षाचा आहे. त्यानंतर तीच ग्रहणे पुन्हा येतात.
एखादा ग्रह कुंडलीत ज्या ठिकाणी जन्मत: असेल त्याच ठिकाणी प्रत्येक ग्रहाचे एक एक परिभ्रमण झाल्यानंतर येते. कल्पाना करा की, चंद्र जन्मत: चतुर्थ स्थानी आहे तर त्याच राशीत त्याच अंशामध्ये पाचवे वर्षाचे वर्षकुंडलीमध्ये चंद्र तेथेच येईल. एकविसावे वर्षी आरंभी येईल. याप्रमाणे सर्व ग्रहांचे समजावे.
एखादा ग्रह कुंडलीमध्ये जन्मत: बलिष्ठ असेल तर त्या स्थानाचे व त्या ग्रहाचे फ़ल परिभ्रमणपध्दतीने त्या ग्रहाच्या परिभ्रमणाच्या वेळी मिळेल. रवि दशमस्थानी जन्मत: आहे तर विसावे व चाळिसावे वर्षी दशमात येईल म्हणून विसावे व चाळिसावे ही दोन्ही वर्षे नोकरी, दर्जा, मानमान्यता या बाबतीत उत्तम जातील. वर्ष-कुंडली काढून त्रेराशिक पध्दतीने परिभ्रमण पध्दतीच्या ग्रहांची गति काढून वर्षकुंडली मध्ये ग्रह भरावे व ते जन्मकुंडलीशी व आपसात कसे योग करतात ते पाहून त्यांची फ़ले, ग्रहांची स्थाने व राशि यांच्या अनुरोधाने ठरवावी. पुढील उदाहरणावरुन परिभ्रमणपध्दतीची वर्षकुंडली कशी काढावी हे समजेल.
अभ्यास करावा.
जन्मकुंडली :- ता. ३१/०७/१८८३ वेळ ०९.४८ मुंबई रात्री जन्म ( माहीम, मुंबई जवळ )
( क्रंमश )
Comments
थापा
सामुद्रिक म्हणतात हस्तरेषा हा निसर्गाचा आरसा आहे. कुंडली प्रमाणे जन्मवेळ चुकण्याची भानगड आमच्याकडे नाही. एक वर्ग असा ही आहे कि ज्योतिष हाच मुळी करमणुकीचा विषय आहे असे मानतो. चला करमणुक म्हणुन तरी ज्योतिषाची उपयुक्तता आहे. शरद उपाध्यांचा राशीचक्र कार्यक्रम छान करमणुक आहे.
प्रकाश घाटपांडे
चला करमणुक म्हणुन तरी ज्योतिषाची उपयुक्तता आहे
श्री प्रकाश घाटपांड नमस्कार
एक वर्ग असा ही आहे कि ज्योतिष हाच मुळी करमणुकीचा विषय आहे असे मानतो
अगदि बरोबर आहे, कोणतिही कला सादर करण्या साठी अगोदर फार मेहनत घ्यावी लागते. नाहीतर अशावर्गा समोर आपण कसे टिकणार.
आपल्या मताशी सहमत आहे.
संजीव