ब्लॉगमाझा स्पर्धा

स्टार माझा चॅनलतर्फे घेतल्या गेलेल्या 'ब्लॉग माझा-०९' स्पर्धेत खालील ब्लॉग्जची निवड झाली आहे. त्यातील कांही ब्लॉगलेखक उपक्रमाचे सभासद आहेत. त्या सर्वांचे अभिनंदन.

तीन उत्कृष्ट ब्लॉग्ज
अनिकेत समुद्र
नीरजा पटवर्धन
दिपक शिंदे

उत्तेजनार्थ ब्लॉग्ज
हरिप्रसाद भालेराव
देवदत्त गाणार
मेधा सकपाळ
सलील चौधरी
प्रमोद देव
राज कुमार जैन
मिनानाथ धसके
विजयसिंह होलाम
दिपक कुलकर्णी
आनंद घारे

त्यांच्या ब्लॉग्जची नावे मी आधी दिली होती, पण शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे ती काढावी लागली.

लेखनविषय: दुवे:

Comments

अभिनंदन

सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा !

अभिनंदन

सर्वांचे अभिनंदन
श्री. घारे व श्री. प्रमोद देव या दोन्ही आंतरजालीय परिचितांचे विषेश अभिनंदन! :)

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

ब्लॉग माझा ह्या स्पर्धेचे, स्टार माझा ह्या वाहिनीचे अभिनंदन!

तुमचा ब्लॉग छान आहे. त्यामुळे नवल नाही. माझ्यातर्फे 'ब्लॉग माझा' ह्या स्पर्धेचे अभिनंदन !

अवांतर
स्टार माझा ही अतिशय दळभद्री बातमीवाहिनी (न्यूजचॅनल) आहे, असे माझे मत आहे. काही दर्जाच नाही. एकंदरच मराठी वाहिन्या बघून मराठीची अवस्था किती बिकट आहे हे लक्षात येते.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

चांगला उपक्रम

विविध माध्यमांनी एकमेकांशी स्पर्धा न करता एकमेकांना पूरक कसे होता येईल याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे "स्टार माझा" या वाहिनीने घेतलेली ही स्पर्धा.
गेल्या वर्षीदेखील त्यांनी असाच उपक्रम राबवला होता व काही अपवादात्मक वाद-विवाद वगळता तो कार्यक्रमही यशस्वी केला गेला होता. मला यात दोन फायदे दिसतात... मराठी प्रेक्षकांना ब्लोग या प्रकाराची ओळख व माझ्यासारख्या वाचकांना सकस लेखन करणार्या नवनवीन लेखकांची ओळख होणे.
अच्युत गोडबोले, प्रसन्न जोशी व सर्व विजेत्यांचे अभिनंदन. स्टार माझाची अधिक्रुत घोषणा....

http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1439

हार्दिक अभिनंदन

अभिनंदन. ह्या निमित्ताने आनंद घारेंचा वाचनिय ब्लॉग पहायला मिळला.
पण हे ब्लॉग निवडण्याचे निकष काय होते? मला ह्या यादीतले बरेच ब्लॉग्ज अतिशय सुमार वाटले.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

+१

सर्वांचे हार्दिक अभिनंदन. श्री घारे यांचा ब्लॉग याआधीच पाहिला होता. तो अत्यंत वाचनीय आणि माहितीपूर्ण आहे, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु काही ब्लॉग्ज हे सुमार दर्जाचे वाटले. कदाचित परिक्षकांना सर्व लिखाण वाचण्यास पुरेसा वेळ मिळाला नसावा किंवा निकषांमध्ये कसदार लेखनापेक्षा इतर सजावटीस जास्त महत्त्व दिले गेले असावे.

________________________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law

आभार

आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. या ब्लॉगस्पर्धेमध्ये कोणतेही निकष दिलेले नव्हते, त्यामुळे त्याचा विचार करून काही वेगळे असे कोणीच लिहिले नव्हते. पिंडे पिंडे रुचिर्भिन्ना म्हणतात त्याप्रमाणे कोणाला खरी माहिती आवडते, तर कोणाला कल्पनाविलास, कोणाला विनोद भावतो तर कोणाला भावनाविवशता, कोणाला छायाचित्रे मोहवतात तर कोणी हौसेने व्यंगचित्रे काढतात, काही लोकांनी इतर अनेक महत्वाच्या ठिकाणांना भेट देण्याची सोय करून दिली असते, तर जगभरातल्या उत्तमोत्तम साहित्याची ओळख कोणी करून देतात. अशा विविध प्रकारांची तुलना करणे कठीण असते. परीक्षक महोदयांनी त्यांच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या आधारे त्यांना जे पसंत पडले त्या ब्लॉग्जची निवड केली आहे. त्यात माझ्या ब्लॉगची निवड झाल्यामुळे मला त्याचे समाधान आहे.

सर्वांचे अभिनंदन

सर्वांचे हार्दिक अभिनंदन

अभिनंदन्!

सर्वांचे हार्दिक अभिनंदन.

सर्वांचे आभार

सर्व प्रतिसादांबद्दल मी आभारी आहे. श्री. प्रमोद देव मला माहीत आहेत. त्यांचे अभिनंदन. इतरांपैकी आणखी काहीजण उपक्रमाचे सभासद असावेत असे वाटले होते, कारण टोपणनावे घेऊन लिहिणार्‍या सर्वांचीच ओळख झालेली नसते. पण कोणाचे नाव प्रतिसादातून पुढे आले नाही.

'ब्लॉग माझा-०९

सर्वांचे हार्दिक अभिनंदन.
संजीव

प्रमोद काका अभिनंदन
संजीव

अभिनंदन..!

मराठी आंतरजालावरील सर्व थोर थोर लेखकांचे मनापासून अभिनंदन..!

मराठी आंतरजालीय सारस्वताच्या अंगणात हे चांदणे असेच बरसत राहो..

आपला,
(मराठी आंतरजालावरचा एक मोडकातोडका व अत्यंत सुमार लेखक) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

 
^ वर