इंग्रजी पुस्तके - माहिती हवी आहे

इंग्रजी पुस्तकांच्या वाचनासाठी,

तुमच्या वाचनात आलेल्या, तुम्हाला माहित असलेल्या, चांगल्या, वाचनीय, देशी, विदेशी आणि कोणत्याही विषयाशी(इतिहास, अर्थ, प्रवास वर्णन, कादंबरी इ.इ.) संबधित इंग्रजी पुस्तकांबद्दल माहिती हवी आहे.

केशवी

Comments

नाही बॉ

इंग्रजी भाषेचे आणी आमचे फारसे सख्य नसल्याने या विषयात गती नाही...
असो,
आशा आहे इतर सदस्य माहिती देतीलच.
तसेच टॉप सेलींग पुस्तकांच्या याद्याही प्रकाशित होतात म्हणे.

आपला
गुंडोपंत

लेखनला प्रतिसाद आणण्याचा उपाय क्र. ३७८९
लेखनाला प्रतिसादच येत नाहीत असे वाटून काही लोक संसथळ जाण्याच्याच धमक्या देतात.
मग सदस्य "सोडून जाउ नका राया" असे प्रतिसाद तरी देतातच! ;)

सुचवणी

इथे काही मदत मिळू शकेल

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

'टिपिकल' यादी

सुरुवाती करता 'टिपिकल' यादी ;)

७ हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव पीपल
दि अल्केमिस्ट्
आय एम् ओके यू आर ओके
रिच डॅड पुअर डॅड

याशिवाय
शेरलॉक होम्स, रॉबिन्सन क्रुसो, गलिवर इ मनोरंजक :)

बाकी आठवेल तसे.

झुम्पा लाहिरीच्या कथा

झुम्पा लाहिरीच्या कथा वाचनीय आहेत. अलिकडचे अनाकस्टम्ड् अर्थ खूप आवडले. त्यापूर्वी इन्टर्प्रीटर ऑफ़ मॅलडीज, नेमसेक ही पुस्तके सुद्धा आवडली होती. अमेरिकेतल्या, विशेषत: पूर्व किनार्यावरच्या बोस्टन मधील भारतीयांच्या जीवनातील प्रसंग अगदी बारकाईने टिपले आहेत. तुम्हाला नक्की आवडतील!

गौरी

धन्यवाद

गुंडोपंत, तो, नवीन आणि गौरी यांना धन्यवाद.....

आणखी काही पुस्तकांची माहिती असेल तर अवश्य सांगा.

आणखी काही...

गॉन विथ द विंड, स्कारलेट (गॉन विथ द विंड चा पुढचा भाग, लेखिका मात्र वेगवेगळ्या!), सिद्धार्थ, अलकेमिस्ट, द मॉंक हू सोल्ड हिस् फरारी, गॉडफादर...

मी वाचलेली एवढीच इंग्रजी पुस्तके आठवलीत... (यादीतल्या सगळ्या पुस्तकांच्या लेखक-लेखिकांची नावे आठवत नसल्याने उल्लेख टाळला.)

सुधा मूर्ति

सुधा मूर्तिंची पुस्तके : वाइज् अदरवाइज, डॉलर बहु, महाश्वेता.

धन्यवाद

स्मिता१ आणि अंजली ताईंना धन्यवाद.
मी सुधा मूर्तिंची मराठी अनुवादित पुस्तके वाचली आहे आता इंग्रजी ही वाचेन.

टाईम

टाईम मासिक आपली
पुस्तक यादी प्रसिद्ध करते ती पाहिली आहे का?
यात बरेच खाद्य मिळावे.
शिवाय तेथे वाचकांची पसंती असाही विभाग आहेच.
ऍमेझॉन नावाचे एक पुस्तक विक्रीचे दुकान आहे तेथे २००९ ची सर्वाधिक खपाची पुस्तके दिसतात.

या शिवायही पब्लिशर्स वीकली हा महत्त्वाचा दुवा ठरावा.
आशा आहे की याची मदत होईल.

इंग्रजीची बोंब असल्याने यातली कोणतीही पुस्तके मी वाचलेली मात्र नाहीत... ;))

आपला
गुंडोपंत

माझे आणखी काही आवडते लेखक...

अमिताव घोष यांचे '' हंगरी टाईड" खूप छान पुस्तक आहे. ते कुठलीही कादंबरी खूप संशोधनपूर्वक लिहितात. ''ग्लास पालेस" मध्ये रत्नागिरीच्या थिबा राजाचे वर्णन चांगले दिले आहे.
रोहीन्तन मिस्त्री यांचे बरेचसे साहित्य हे पारशांबद्दल व मुंबईसंबधी आहे. त्यांच्या कथा मनाला अगदी जवळून स्पर्श करतात.
सुकेतु मेहता यांचे मुंबई-म्याक्सिमम सिटी वाचनीय आहे. माझ्यातला सुप्त झालेला मुंबईकर मेहतांनी जागा केला.

गौरी

 
^ वर