वास्तुशास्त्राला कोणत्या भारतीय ग्रंथांचा आधार आहे

चिनूक्स यांस
प्रश्न :- वास्तुशास्त्राला कोणत्या भारतीय ग्रंथांचा आधार आहे, हे कृपया सांगाल का?
उत्तरः- मयानं वास्तुशास्त्रावर मयमतम नावाचा अफलातून ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ पॉडिचेरीच्या आश्रमात धूळ खात पडून होता. ब्रुनो डॉन्जेस नामक फ्रेंच तत्वचेत्त्याला हा ग्रंथ सापडला आणि ग्रंथाचं भग्य उजळ्लं डॉन्जेसनं हा ग्रंथ फ्रेंचमध्ये भाषांतरित केला. फ्रान्समध्ये खूप गाजावाजा झाल्यानंतर त्यांच इंग्रजीत भाषांतर झांल. त्यानंतर भारतीयांचं त्याच्याकडे लक्ष गेलं.

१. सुज्ञान जन्म रहित्यम् २. गंटल पंचांगम् ३. गुप्ता पंचागम्, ४. गुप्ता वास्तु, ५. गुप्ता वास्तु सम्राट, ६. गृहवास्तु ( काकिनाडा ) ७. वास्तुशास्त्र विवेकम् ४ भाग ८. श्री रामराय वास्तु शास्त्रम् ९. जातक परिजातम्, १०. बृहत्पराशर होरा शास्त्रम् ११. श्रीकृष्ण वास्तू शास्त्रम् १२. वास्तु दर्पणम् १३. वास्तु नारायणीम् १४. सनत्कुमार वास्तुशास्त्रम् १५. उत्तर काळमृत् १६. पेध्दबाल शिक्षा १७. आंध्रज्योति सचित्र वार पत्रिका १८. मनदेशम् पाक्षिक वार पत्रिका १९. गृहवास्तू दीपिका २० गृहवास्तू रहस्यम् २१ गृहवास्तू दर्पणम् २२. वास्तु दुंदुभि / टुंटुभि २३ वास्तु पद्माकरम् २४. वास्तु विज्ञान सर्वस्वम् २५. सुब्बराय वास्तु शास्त्रम् २६. श्री दत्तात्रेय वास्तुशास्त्रम २७ कृष्णा यजुर्वेद तैत्तरीय संहिता ५ भाग २८ याजुषा पुर्वप्रयोगचंदिका,

२९ निर्णयसिंधु ३० धर्मसिंधु ३१, अश्वलायन गृह्यसूत्रम् ३२. समारांगण- सूत्रधार ३३. ऋग्वेद ३४ यजुवेद ३५ सामवेद ३६ अथवेद ३७ शांति कमलाकरम् ३८ शांति रत्नाकरम् ३९ सर्व देव प्रतिष्ठा प्रकाश ४० श्रीविमानार्चना कल्पम्

४१ बृहत्संहिता ४२ वास्तु रत्नाकर ४३ वास्तु रत्नावली ४४ बृहद्वास्तुमाला ४५ गृहवास्तु शांती प्रयोग ४६ मुर्हर्त चिंतामणी ४७ वराह पुराण ४८ सूर्य पुराण ४९ भविष्य पुराण ५० विष्णु पुराण ५१ विष्णु धर्मोत्तर पुराण ५२ विश्वकर्मा पुराण ५३ विश्वकर्मा प्रकाश

५४ वास्तुवैभव ५५ मातृस्मृती १२ भाग ५६ वास्तु सम्राट ५७ वास्तुशास्त्र, ५८ शिल्पशास्त्र ५९ मेदिनीय ज्योतिष ( ५७ ते ५९ प्रत्येकी १२ भाग ) ६० मयमतम् ६१ मशिल्प ६२ मयशिल्पशतिका ६३ सूर्यसिध्दान्त ६४ वास्तुप्रवेश ६५ अजित वास्तु ६६ वास्तुशुभा ६७ मस्त्यपुराण ( १९०६) ६८ स्कंद पुराण ६९ वेद पुराणे समालोचन ७० श्री अग्निमहापुराण ७१ श्री गरुड पुराण ७२ श्री विश्वकर्मा पुराण ७३ सार्थ मुहूर्तमार्तंड

अशी अनेक पुस्तके आपणास मिळतील
वरील सर्व पुस्तकांचे संदर्भ आपणास पाहिजे असता माफक शुल्लकात उपलब्द होईल.

वास्तु विज्ञान प्रेमी संजीव

लेखनविषय: दुवे:

Comments

उपलब्ध

वरील सर्व पुस्तकांचे संदर्भ आपणास पाहिजे असता माफक शुल्लकात उपलब्द होईल.

ही चांगली गोष्ट आहे. केवळ पुरावा म्हणुन नव्हे पण संदर्भ हा माहितीचा स्त्रोत / प्रेरणास्थान म्हणुन या कडे पहाता येईल. उपलब्ध न होणार्‍या संदर्भापेक्षा हे 'माफक शुल्कात' ही कल्पना चांगली आहे. त्यातील विचारांशी सहमती/ अंशतः सहमती/ असहमती ही बाब पुर्णपणे भिन्न आहे
प्रकाश घाटपांडे

बापरे~

इतकी पुस्तके?
कुठे मिळतील बॉ ही पुस्तके?
आणि माफक म्हणजे किती किमतीला?

आपला
गुंडोपंत

लेखनाला प्रतिसाद आणण्याचा उपाय क्र. ३७८९
लेखनाला प्रतिसादच येत नाहीत असे वाटून काही लोक संसथळ जाण्याच्याच धमक्या देतात.
मग सदस्य "सोडून जाउ नका राया" असे प्रतिसाद तरी देतातच! ;)

अफलातून

ज्या जमिनीवर वास्तु बांधायची असेल तेथे वासरू असलेली गाय बांधून ठेवली तर वास्तुदोष दूर होऊन बांधकाम निर्विघ्नरीत्या पार पडते. वास्तुग्रंथ 'मयमतम' मध्ये यासंदर्भात विवरण दिले आहे.

नक्कीच अफलातून.

अवांतर-'चिनूक्स' म्हणजे?

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

हाहाहाहा गाय!

ज्या जमिनीवर वास्तु बांधायची असेल तेथे वासरू असलेली गाय बांधून ठेवली तर वास्तुदोष दूर होऊन बांधकाम निर्विघ्नरीत्या पार पडते. वास्तुग्रंथ 'मयमतम' मध्ये यासंदर्भात विवरण दिले आहे.

नक्कीच अफलातून.

हाहाहा! गाईला बाहेर कधी काढायचे? घर बांधून झाल्यावर? गाय सुपरवायझर चे काम करते की काय? :))

गाय वासरू, नका विसरू

ज्या जमिनीवर वास्तु बांधायची असेल तेथे वासरू असलेली गाय बांधून ठेवली तर वास्तुदोष दूर होऊन बांधकाम निर्विघ्नरीत्या पार पडते.

गाय वासरू, नका विसरू. नाईक जुने काँग्रेसी वास्तुशास्त्री दिसता!

चिनूक हे हेलिकॉप्टर आहे. ह्या हेलिकॉप्टरमध्ये बसून नाईकसाहेब ग्रहताऱ्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी गजाली करीत जातकांचे भविष्य जाणून घेत असावेत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

इतकी पुस्तके?

इतकी पुस्तके?
कुठे मिळतील बॉ ही पुस्तके?
आणि माफक म्हणजे किती किमतीला?

हा आमच्या घरण्याच उघोग आहे. साधारण सन १८०१ पासुन जुनि पुस्तके आमच्या जवळ आमच्या अभ्यासा साठी उपब्द आहेत.
आपल्यास पाहीजे असल्यास फक्त संदर्भ मिळतील व त्याच्या फोटो कॉपीचे शुल्लक व पोष्ट खर्च आपणास करावा लागेल.

लेखनाला प्रतिसाद आणण्याचा उपाय क्र. ३७८९
पंत मला आपला सल्ला अतिषय योग्य आहे. तरी काही ग्रहाचे फलादेश मी स्वतावर अनुभव घेऊन पाहत आहे.
तसाच एक अनुभव तो म्हणजे गेल्य रविवारी अमवस्या लागली असतान मी माझ्या गच्चीत वास्तुशास्त्राचा वर्ग सुरु केला.
असे करत असताना आधुनीक शास्त्राची सुध्दा मदत घेतली, ती म्हणजे माझ्या घराच्या गच्चीवर असलेले ऩक्षत्र, चारी दिशेचे तारकासमुह, काही तारकाचे व धुम केतु व घराचे अतंर व त्याचा वर्ग शिकवत असताना होणारा परिणाम
वर्ग सुंदर चालला आहे. प्रतिसाद फार उत्तम आहे. बघु काय होते ते.
वेळ संध्याकाळी ०६.३० ते १०.३०
संजीव

उद्योग

हा आमच्या घरण्याच उघोग आहे.

आता लक्षात आले कशाची जाहिरात सुरू आहे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

बॅक-अप की व्यवसायाची जाहिरात?

वर्ग सुंदर चालला आहे. प्रतिसाद फार उत्तम आहे. बघु काय होते ते.
वेळ संध्याकाळी ०६.३० ते १०.३०

आपल्या ब्लॉगवरील सगळे लेख जसेच्या तसे इथे 'डंप' करण्याचे काय कारण असावे बरे? बॅक-अप की व्यवसायाची जाहिरात? ही अशी जाहिरातबाजी उपक्रमावर चालते का?

 
^ वर