तर्कक्रीडा:७७:जुळे की तिळे?

तर्कक्रीडा:७७:सहसुंद
(छत्री ज्याची त्याला .चिनी प्रवासी बागेबाहेर.पुढचा प्रवास. रात्री मंदिरात आसरा.वृद्ध आचार्यांची भेट. परिचय.बोलण्याच्या ओघात छत्रीप्रसंग निवेदन.तदनंतरचा हा संवाद.)

"सापडलेली वस्तू ज्याची त्याला द्यावी हा तुमच्या देशातील दंडक इथेही आहेच.पण ती छत्री मूळ धन्यालाच मिळाली याविषयी मी साशंक आहे."
"का? मी आपल्याला सगळे निवेदन केले आहे."
"ते ठीक. पण ऐकले आहे की सुंद बंधू जुळे नसून तिळे आहेत.तिसरा भाऊ सहसुंद दंडकारण्यात असतो.कधी कधी इकडे येतो."
"सहसुंद? सहसुंद? दोन बंधूंच्या बोलण्यात कधी हे नाव आले नाही.त्याच्या सत्यासत्यकथना विषयी काय?"
"सुंद उपसुंदांचे सोमवारी शिवव्रत असते. त्या दिवशी ते सत्यच बोलतात. नंतर सलग तीन दिवस सुंद खरे बोलतो, तर उर्वरित तीन दिवस(शुक्र,शनि,रवि) तो खोटे बोलतो.या उलट उपसुंदाचे असते यात शंका नाही.सहसुंद कोणतेही व्रत आचरत नाही. तो नेहमीच खोटे बोलतो असे ऐकले आहे."
"तुम्ही सहसुंदाला कधी पाहिले आहे काय?"
" असेल नसेल सांगता येत नाही."
"का? सांगता का येऊ नये?"
"विचार कर. विचार कर."
"(आचार्यांच्या पायाला हात लावून) समजले!समजले!"
"साधु साधु!! आता निद्रा घे"

आपल्याला दुपारी बागेत दोघे दिसले त्यांतील एक सहसुंद होता काय? असल्यास टोपीवाला की फ़ेटेवाला?असा विचार करीत चिनी प्रवासी झोपी गेला.
पहाटे उठला.वृद्ध आचार्य आधीच निघून गेले होते.याचाही प्रवास सुरू झाला.दोनप्रहरी एका वटवृ़क्षाच्या दाट छायेत विसावला.वडाच्या पानांची खोलपी(द्रोण) करून पाणी प्यायला गेला. तिथे निर्झराच्या काठी एका शिलाखंडावर बसलेले दोन सुंद बंधू दिसले.टोपी नाही,फ़ेटा नाही,भस्मपट्टे नाहीत. कुणाजवळ छत्रीही नव्हती.दोन्ही अगदी सारखेच.त्यांतील "अ’ला चिनी प्रवाशाने उच्चस्वरात विचारले:
"तुझे नाव सहसुंद आहे काय?"
"होय. मी सहसुंदच आहे." अ उत्तरला.
मग प्रवाशाने ’ब’ कडे पाहून ,भुवया उंचाऊन.उजव्या हाताचा पंजा हालवत प्रश्नार्थक मुद्रा केली.
"होय तो सहसुंदच आहे." ब उत्तरला.
तर या प्रश्नोत्तरांवरून निश्चित असे कोणते निष्कर्ष काढता येतील?
(सुंदबंधू तिळे असतील तर तिसर्‍याचे नाव सहसुंद, तो नेहमी असत्यच बोलतो हे गृहीत धरावे.)
..................................................................
उत्तर व्य. नि. ने पाठवावे)
......................................................................
.

लेखनविषय: दुवे:

Comments

व्य. नि. उत्तरे: १ आणि २:

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय तसेच श्री.अमित कुलकर्णी यांनी या कोड्याची अचूक उत्तरे कळवली आहेत.धन्यवाद!

व्य. नि. उत्तरः३:

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कोड्यात दिलेल्या प्रश्नोत्तरांवरून अदिती यांनी दोन अचूक निष्कर्ष काढले आहेत.अभिनंदन!!

व्य. नि. उत्तरः४

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.सुनील यांनी दोन निष्कर्ष काढले आहेत.ते दोन्ही बरोबर आहेत.

व्यंइ. उत्तरः५

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |

श्री.Nile यांनी एकच निष्कर्ष लिहिला आहे. तो अचूक आहे. पण उत्तर अपुरे आहे.ते लिहितातः"...आता घाईत् असल्याने इतकेच् उत्तर् पाठवतो. "

व्य. नि. उत्तरः६:

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.Nile यांनी सुधारित उत्तर पाठविले आहे.त्यातील दोन्ही निष्कर्ष अचूक आहेत.

तर्कः७७:जुळे की तिळे उत्तर्

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
१) "होय, मी सहसुंदच आहे" असे अ म्हणतो. सहसुंद कधीच खरे बोलत नाही. म्हणून अ सहसुंद नाही.तो सुंद अथवा उपसुंद आहे. तो खोटे बोलतो आहे. म्हणून आज सोमवार नाही.
२) अ खोटे बोलत आहे.(कारण तो सहसुंद असल्यास त्याचे उत्तर खरे ठरेल. पण सहसुंद नेहमीच खोटे बोलतो). ब हा अच्या उत्तराची री ओढतो आहे. म्हणून तोही खोटेच सांगत आहे.
३) सुंद आणि उपसुंद दोघेही खोटे बोलतील असा कोणताही दिवस नाही. म्हणून ब सहसुंदच असला पाहिजे. म्हणजे ते तिळे आहेत.
४) अ आणि ब या दोघांकडे छत्री दिसली नाही. म्हणजे ती सहसुंदाला मिळाली असल्याची संभवनीयता कमी. म्हणजे छत्री मूळ मालकाला मिळाली असण्याची संभवनीयता अधिक.

 
^ वर