माजुली बेटावर फेरफटका

बेट म्हटले की आपल्या डोळ्यासमोर जी कल्पना साकार होते त्यास छेद देणारे असे हे माजुली बेट. माजुली बेटाची सविस्तर माहिती ही नेट वर उपलब्ध आहेच त्यामुळे या बेटाच्या कमलाबारी या परिसरात फिरतांना बेटाची कल्पना यावी या उद्देशाने व मला दिसलेले आणि भावलेले आपणास ही आनंद देउन जाईल या आशेने फोटो देत आहे.

The sight of Board displaying Hotel arrangement. A pleasing sight for me.

पेप्सी च्या बोर्ड च्या शेजारी हॉटेलचे रीसेप्शन फारसे आशादाई नव्हते पण लोखंडी फाटकातुन एक मजली हॉटेलचा परिसर मात्र रम्य वाटला.

Entry Gate to the Hotel Rooms

सकाळी सहा वाजता बेटाचा फेरफटका मारण्यासाठी सज्ज.

Opposite the Hotel

या बेटावरील शाळा व त्याचा परिसर पुण्यातील शाळेच्या परिसरापेक्षा ही सरस वाटला.

School premises

हॉटेल ते मुख्य चौकाकडे जाणारा रस्ता.

Road to main squire.
water bodies on the island
market area in the morning
Road to Kamalabari satra
College on the island
water bodies and bridge. The Ponds are used for fishing

एक विशेष गोष्ट मला जाणवली ती ही की डासांपासुन संरक्षण करण्यासाठी आपण मच्छरदाणी वापरतो पण या बेटावर गाईंना डासांचा त्रास होऊ नये म्हणुन गोठ्याला देखिल मच्छरदाणी लावतात.

Mosquito Nets for Cows in their Shed.

या बद्दलची एक् गमतीदार गोष्ट् आठवली. महाराष्ट्रात त्याभागातील लोक शिबीरासाठी येतात. तेंव्हा आसाममधील लोक आवर्जुन त्यांच्या सामानात मच्छरदाणी अवश्य आणतात आणी ती झोपतांना वापरतात. शिबीरात रात्री सर्व झोपतात तेंव्हा मच्छरदाणी घेउन झोपला असेल तो आसामी आहे हे आम्ही ओळखतो.

लेखनविषय: दुवे:
 
^ वर