मेंदूचा वापर आणि लठ्ठपणा

शारीरिक श्रमांपेक्षा बौद्धिक श्रमांनी अधिक थकवा येतो असा माझा अनुभव आहे. कॅल्क्युलेटर न वापरता तासभर केलेली आकडेमोड ही तासभर केलेल्या शारीरिक श्रमांपेक्षा अधिक थकवा आणणारी असते. मी असंही ऐकलं आहे की आपल्या मेंदूला सतत साखरेचा पुरवठा व्हावा लागतो. याचा अर्थ मेंदूचा सतत वापर करीत राहिल्यास शरीरातील साखर कमी होते. कदाचित त्यामुळेच बौद्धिक श्रमांनी अधिक थकवा येत असावा.

यावरून असं अनुमान निघतं की जे लोक रोजच्या कामात मेंदूचा वापर ज्यास्त प्रमाणात करतात त्यांच्यात लठ्ठपणाचं प्रमाण कमी असावं. आपणास काय वाटतं? किंबहुना आपलं याबाबतीत काय निरीक्षण आहे? जर मेंदूच्या वापराचं लठ्ठपणाशी व्यस्त प्रमाण असेल तर संगणकीकृत साधनांचा वापर कमी करणं हा आजकालच्या सार्वत्रिक लठ्ठपणावर उपाय होऊ शकेल का?

लेखनविषय: दुवे:

Comments

मेंदू फ्राय

हे पहा

किंवा

हे पहा

मेंदूला मिळणारी साखर हे रक्तातून मिळते. कोलेस्टेरॉल वगैरे मुळे साखरेचा पुरवठा कमी झाल्यास अल्झायमर् सारखे आजार होतात. अशावेळी प्रमुख उपाय म्हणून योग्य आहार आणि पुरेसा व्यायाम दिलेला आहे.

त्यामुळे बौद्धिक काम केल्यामुळे मेंदूची साखर कमी होत नाही किंवा वाढतही नाही.. :-)

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

बौद्धिक् थकवा?

शारीरिक श्रमांपेक्षा बौद्धिक श्रमांनी अधिक थकवा येतो असा माझा अनुभव आहे. कॅल्क्युलेटर न वापरता तासभर केलेली आकडेमोड ही तासभर केलेल्या शारीरिक श्रमांपेक्षा अधिक थकवा आणणारी असते.

कदाचीत, शारीरीक श्रम-> शारीरीक् थकवा.
बौद्धिक् श्रम्-> बौद्धिक् (मानसीक) थकवा. असे गणित् असावे! :)

लठ्ठपणा

मेंदूचा जास्त वापर करणारी मंडळी बैठे काम करतात.त्यांच्या शरीराला पुरेसा व्यायाम मिळत नाही.अशा व्यक्तीचे खाणे जास्त असल्यास ती व्यक्ती लठ्ठ होत जाते. माझ्या निरिक्षणाप्रमाणे मेंदूचा वापर करणारी मंडळी शारिरिक श्रम करणार्‍यांपेक्षा बहुदा जास्त लठ्ठ असतात.
चन्द्रशेखर

मेंदूने व्यायाम न केल्यास मेंदूही लठ्ठ होतो ना?

धन्यवाद. ह्यावरून एक प्रश्न विचारावासा वाटला. मेंदूचा पुरेसा वापर न केल्यास, मेंदूने व्यायाम न केल्यास मेंदूही लठ्ठ होतो ना?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर