काझीरंगा ते माजुली
मला अरुणाचल मध्ये १३/१०/२००९ पर्यंत फिरावयाचे होते. परंतु १३ ला तिथे निवडणुका असल्याने एकुलते एक असलेले साधन सुमो या सर्व निवडणुकित गुंतल्यामुळे मला प्रवास अशक्य झाला त्यात १५ ला गोहाटी ची माझी फ्लाईट निश्चीत असल्यामुळे मला शेवटची उपलब्ध बस ९ तारखेची ने गोहाटी ला जाणे भाग पडले. १० ला गोहाटी ला पोचलो व त्याच दिवशी तेथील ब्रम्हपुत्रा पात्र व कामाख्या मंदिर पाहुन ११ तो १४ हा काळ कसा उपयोगी आणावा याचा विचार करित असतांना तेथील सेवा भारती चे ईशान्य भारताचे प्रमुख श्री उल्हासजी कुळकर्णी यांनी काझीरंगा व माजुली जाउन येण्याचा सल्ला दिला. ११ ला गोहाटी हुन गोलाघाट जाणार्या बसमध्ये मी ७ तास प्रवास करुन सोहोरा (काझीरंगा) येथे उतरलो दरम्यान तेथील सेवा भारतीचा एक कार्यकर्ता व तेथील गाईड श्री सपनदा हा आसामी तरुण याच्याशी फोन वरुन संपर्क झाला होता तो माझी वाट पहात होता. संध्याकाळ झाली असल्याने त्याने मला त्याच्या मोटरसाईकल ने जंगला च्या एंन्ट्री पॉईंट पर्यंत फीरवून आणले.
रात्री त्याने आग्रहाने त्याच्या घरी माझी राहण्याची व्यवस्था केली. त्याचे घरी त्याची विधवा आई व बहिण होती त्याचे घर म्हणजे निसर्गरम्य पण सुसज्ज् बांबुचे घर. जेवण्याची व झोपण्याची उत्तम व्यवस्था होती. दुसर्या दिवशी सकाळी जंगल सफारी करण्याचा कार्यक्रम आखण्यात आला. मी माजुली बेटाला जाऊन येण्याबद्दल इच्छा व्यक्त केली. १५ ला कसेही करुन गोहाटीला पोचायचे आहे हे ही त्याला आवर्जुन सांगीतले. १२ ला सफारी आटपुन तेथुन ५ तास अंतरावर असलेल्या जोरहाट व तेथुन २ तासावरिल माजुली त्यात निमानीघाट हुन शेवटची बोट हि ३ वाजता माजुलीसाठी सुटते ही माहिती घेउन आम्ही १२ ला सुरुवात केली. सफारी ९ वाजता आटोपली. त्याचे घर काझीरंगा पासुन १० कि.मि वर असलेल्या खेड्यात होते. १० वाजता घरी जाउन जेवण करुन लगेच जोरहाट साठी प्रवास सुरु केला. मधे दोनदा सुमो बदलवुन जोरहाट ला २ वाजता पोचलो. निमानीघाट ला जाणारी बस खचाखच भरली होती शेवटची बोट पकडण्यासाठी. आम्ही मग आटो रिक्षा शोधला १५० रुपयात तो तयार झाला व ते ७ कि.मि.चे अंतर कापुन आम्ही कसेतरी ३ वाजता निमानीघाट ला पोचलो तेंव्हा बोट निघण्यासाठी तयार होती. आम्ही बोटित पाय ठेवल्याबरोबर बोट सुटली.
![]() |
Journey from Gauhati to Kaziranga |
![]() |
long stretch of Avenues from Gauhati to Kaziranga |
beautiful cottage of Sapanda in the adjoining village where I stayed |
Board displaying the statistics of kaziranga National Park on National Highway=Gauhati-Golaghat |
Entry gate to Kaziranga Park |
Sapanda my guide |
![]() |
Tourist returning from Safari in the evening |
![]() |
way from Highway leading to the cottage of Sapanda |
morning walk on National Highway |
Living Room of Sapanda my host |
![]() |
Vehicles waiting for their turn for Jungle safari |
Tea Estate at Kohora |
Booking Office at the Entry of Jungle Safari |
Elephant an forest Deptt. employee off the duty. |
Jeep ready with armed guard for Safari |
Water body and elephant grass in the Jungle |
view of inner Jungle |
Safari route in the Jungle |
residence of forest guard in the centre of the Jungle |
![]() |
Jungle view with Rhino, if you can cite |
View of Jungle |
Temple in the Jungle |
![]() |
treasure recovered from poachers at display |
![]() |
view point in the mid of Jungle |
![]() |
water body in the jungle. |
काझीरंगा नॅशनल हेरीटेज पार्क हा ४३० चौ.कि.मी मध्ये पसरलेला असुन एक शिगाच्या र्हायनो साठी जगप्रसिध्द आहे. या जंगलात ब्रम्हपुत्रेचे पुराचे पाणी दरवर्षि पसरते त्यामुळे येथील वनस्पती ना खत सम प्रमाणात मिळुन जंगली जनावरांच्या भोजनाची व्यवस्था होते. पुरामुळे जंगलात जनावरांनी केलेल्या मलाचे सम प्रमाणात वितरण होते आणी हेच खताचे काम करते. दरवर्षी हत्ती गवत जाळण्यात येते जेणे करुन त्याची योग्य प्रमाणात वाढ होते. गेल्या दोन वर्षापासुन ब्रम्हपुत्रेला पुर न आल्यामुळे ही खत वितरणाची प्रक्रीया थांबली आहे. त्यामुले गवताच्या सुद्रुढ् वाढीला आळा बसला आहे. र्हायनो चे व ईतर शाकाहारी प्राण्याचे मुख्य खाद्य हेच असल्याने त्यांना नीट भोजन मिळत नाही त्यामुळे ते प्राणी चिडचिडे होतात व आक्रमक देखिल होण्याचा संभव असतो. र्हायनो जवळुन पहाण्यासाठी हत्तीची सफारी योग्य असते. मी गेलो तेंव्हा सिझन नुकताच म्हणजे १ तारखेपासुन सुरु झाला असल्याकारणाने हत्ती सफारी सुरु झाली नव्हती त्यामुळे खर्चीक अशी जिप सफारी करावी लागली. र्हायनो चे फोटो काढले असले तरी लांब अंतरामुळे व त्यांच्या राखाडी रंगाने ते फोटोत झुम करुन पाहिल्यानंतर् देखील ठीपक्यासारखे दिसतात. कींवा एकदम लक्षात येत् नाहित. त्याबद्दल क्षमस्व.