३० दिवसात दोनदा आपल्याला साडेसाती येते त्याला काय म्हणतात

र्वग क्रंमाक तीन:- अश्विनी नक्षत्र
कुंडलीशास्त्रात गोचर ग्रहांचा जसा आपण विचार करतो तसा गोचर नक्षत्राचा विचार करुन जर जातकास सल्ला का देऊ नये? साडेसाती आपण चंद्र-शनी भ्रमणाचा विचार करतो. पण ३० दिवसात दोनदा आपल्याला साडेसाती येते त्याला काय म्हणतात? हा विषय सष्टकरुन सांगण्यास बराच अवकाश आहे. फ़क्त शनि मंगळ ज्या स्थानात असतात त्या स्थानाची फ़ळे देताना विरुध घटना का घडतात?

आकाशात २७ नक्षत्र भ्रमणाचा मार्ग ठरलेला आहे.

उदा. मूळ नक्षत्रास सर्वजण घाबरतात, पण ह्या नक्षत्राचे काही चांगले परिणाम आहेत. हे नक्षत्र फ़ाल्गुन, जेष्ठ, वैशाख, मार्गशिर्ष ह्या वेळी पाताळी असते. आषाढ, अश्विन, माघ, भाद्रपद ह्या वेळी स्वर्गी असते. श्रावण कार्तिक, चैत्र, पौष ह्या वेळी नक्षत्र मृत्यूलोकी असते. त्या प्रमाणे प्रत्येक नक्षत्र डोक्यावरती, पायाखाली, उजव्याबाजूस, डाव्याबाजूस असल्याने आपणास वेगवेगळी फ़ळे देताना दिसतात.

ज्या जातकाची जी दशा चालु असते त्या प्रमाणे त्या जातकास फ़ळे मिळतात, जरा दशा बद्दल झाला म्हणजे कळेल. दिलेल्या फ़ळाचे कसे विपरीत परिणाम होतात ते. नक्षत्राचे किती महत्व असते ते तुम्हीच स्वतावर प्रयोग करुन बघा. आपल्या जन्मपत्रिकेत ताराचक्र ते कसे बघायाचे ते आज पर्यत काही ज्योतिष मंडळी आपल्या जातकास सांगत नाही ह्याचा जर उपयोग आपल्या दैनदिनी जिवनात केल्यास कसा चागला परिणाम साधता येतो ते बघा. उदा. श्रीमती सोनिया गांधी चे ताराचक्र आपणास दिले आहे. (नक्षत्राचा समाप्ती काळ प्रत्येक दिनदर्शिकेत तसेच काही वर्तमान पत्रात आपणास मिळेल).

ताराचक्राची सुरुवात आपल्या जन्मनक्षत्रापासुन होते. १. उत्पत्तीकारक २. संपत्तीकारक ३. विपत संकटदायक ४. शुभकारक ५. अशुभ ६. साधक, ७. वधकारक ८ मित्रता दर्शक, ९. परम मैत्री ह्या प्रमाणे प्रत्येक घरात तीन नक्षत्रे ज्याचे स्वामी एक आहे असे येतात. यातील ३,५,७ या घरातील नक्षत्रात कोणताही निर्णय घेताना विचार पुर्वक निर्णय घ्यावा.
उदा. कार्यालयातिल एकद्या प्रश्नाला उत्तर देऊद्या. कोणताही विषय समाप्त करावयाचा असेल तर या दिवशी आपण पत्र देऊन बघा, त्याचा योग्य परिणाम आपणास मिळेल. व काही वाद न होता केस सामोपचार किंवा ती केस बंद केली जाईल. पण ह्याच बरोबर आपली दशा व ग्रह पाठबळ सुध्दा महत्वाचे आहे. (पण या शास्त्राच्या मते वध नक्षत्राच्या दिवशी आपणास कमीत कमी ९०% फ़ळे आपल्या बाजुनी मिळतात.)

अश्विनी नक्षत्र आज आपल्या पुर्व ईशान्य दिशेकडे आहे. श्री सचिन पिळणकर ह्याच्या लेखातील माहीती व काही फ़ोटो आपणास देत आहे त्याचा अभ्यास करावा. कुपया फ़ोटो http://vastuclass.blogspot.com वर बघा.

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्त !

>>३० दिवसात दोनदा आपल्याला साडेसाती येते त्याला काय म्हणतात
च्यायला दुर्दैव आपले. बाकी दुसरे काय ! :(

>>नक्षत्राचे किती महत्व असते ते तुम्हीच स्वतावर प्रयोग करुन बघा.
हम्म, आमच्यावर प्रयोग करुन पाहा हो नाईकसाहेब. नक्षत्र आणि त्यांचे स्वामी आमच्या भविष्यकाळ काय दाखवतात आम्हालाही जरा सांगा. उत्सूकता लागली आहे.

लेखन माहितीपूर्ण आहे, अजून येऊ द्या....!!!

-दिलीप बिरुटे

तुम्हीच स्वतावर प्रयोग करुन बघा

श्री दिलीप बिरुटे यांस
अहो ही एक कला आहे आणि कलेत हार जीत होणार नाही का?
श्री प्रकाशजी घाटपांडेचा संदेश बघा त्यांना सुध्दा बरे वाटले की ज्योतिष हा विषय एक कला या सदरात मी सादर करण्याचा प्रयत्न केला.
( २९ वे नक्षत्र ) संजीव

मग काय् कामाचे ते ग्रह आणि साडेसाती...

>>अहो ही एक कला आहे आणि कलेत हार जीत होणार नाही का?
हम्म ! तेही आहे म्हणा.
>>श्री प्रकाशजी घाटपांडेचा संदेश बघा त्यांना सुध्दा बरे वाटले
अहो, मलाही बरेच वाटले आहे.

असो, पुलेशु.......!

-दिलीप बिरुटे

असो, पुलेशु.......!

श्रीमांन दिलीप बिरुटे यांस
हि कला आहे, जसे गायन करताना जो पर्यंत गळा गरम किंवा तानपु-यावर "सा" योग स्वर लागत नाही तो पर्यंत गायकाला आपली गायन कला लोंकाच्या समोर सादर करण्यास वेळ लागतो. नहीतर सचिन ला बघा कधी पहील्या चेंडुवर नाहीतर लगे रहो मुन्नाभाई
आपला आद्न्याधारक
संजीव

जन्म संपत

ताराचक्राचे महत्त्व वादातीत आहे.
३० दिवसाचेच नाही तर पण ग्रहांचेही ताराचक्र मांडावे. यातून ग्रहबळ कुंडलीला कसे आहे आणी ग्रहदशा कशी जाईल पण कळते.

हा लेख बराच मोठा होवू शकेल असे वाटते.
ते वाचता आले पाहिजे. काही वाक्ये एकमेकतून गुंतली आहेत त्यामुळे मुद्दा कळत नाहीये.

आपला
गुंडोपंत

साडेसाती?

ते वाचता आले पाहिजे. काही वाक्ये एकमेकतून गुंतली आहेत त्यामुळे मुद्दा कळत नाहीये.

साडेसाती मुळे असेल!

ग्रहदशा

साडेसाती मुळे असेल!
शक्य आहे आणि नाहीही. कुंडली आणि गोचरीचे ग्रह कसे आहेत यावर अवलंबून आहे.
लेखक साहेब प्रवासातला वेळ कारणी लावून लेखन करत आहेत.
हा खरोखरच कौतुकाचा विषय आहे.
तेंव्हा कधी कधी असे होते, असे मी म्हणेन.

जसे लिखाण हातून होण्यासाठी बुध आणि त्याची दशा महत्त्वाची ठरते.
चांगले लिखाण होण्यात गुरूचे बळ पण काही भुमिका बजावते.
शुक्र यात गुंतला तर त्यातून लेखकाला प्रसिद्धीही मिळते.

मात्र गोचरीने काय ग्रह आणि कसे आहेत हे पाहिले तर कळेल.

असो,
तूर्तास इतकेच!

आपला
गुंडोपंत

अंधश्रद्धा

असल्या वेडगळ आणि भोंदू समजुतींना अंधश्रद्धा एवढे एकच नाव आहे.
चन्द्रशेखर

हा हा हा

प्रतिसाद संपादित.

असो,
तुमचे म्हणणे बरोबर असावे.
तुम्ही अजिबात या वेडगळ प्रकाराच्या नादी लागू नका!

आपला
गुंडोपंत

अंधश्रद्धा ह्या शब्दाची सर्वमान्य व्याख्या काय?

अंधश्रद्धा ह्या शब्दाची सर्वमान्य व्याख्या काय?

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

अंधश्रद्धा ह्या शब्दाची सर्वमान्य व्याख्या काय?

मा. श्री. हैयो हैयैयो!

जुन्या भोळसट लोंकानी दगडावर लिहलेल्या लेखाचे वाचन करणे

चित्रदुर्ग (बेगरुल दुतमार्गवरील एक प्रसिध्द स्थान ) वाचन करता
संजीव

सही

वा!
या संदर्भात तुम्ही स्वतंत्रपणे बाबासाहेबांशी चर्चा का करत नाही.

आपला
गुंडोपंत

 
^ वर