आणखी शब्द- अतिमानवी शक्ती

'अतिमानवी शक्ती' हा शब्दप्रयोग वाचून घाबरू नका. जिवंत माणसांच्या पलीकडील संकल्पना इथे अभिप्रेत आहेत. थोडक्यात काय, तर भूता-खेतांचे प्रकार, राक्षस, देव- देवता या संकल्पना आणि त्यांची नावे हवी आहेत. लक्षात घेण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उपक्रमाद्वारे अंधश्रद्धा पसरवण्याचा उद्देश नाही. आपण जेव्हा या संकल्पनांना नावे देतो, व ती गोळा करतो, तेव्हा त्या संकल्पना खरोखर अस्तित्त्वात आहेत, असे मुळीच म्हणायचे नाही. पण काल्पनिक पातळीवर आपल्याकडे या संकल्पना आहेत, व त्यांना आपण नावेही दिली आहेत. ही नावे मनोरंजनाच्या हेतूने का होईना, पण कधी-ना-कधी आपण वापरतोच. आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहेत या संकल्पना. म्हणून त्यांचं संकलन करायचं.

दुसरी गोष्ट म्हणजे, या उपक्रमातून केवळ शब्दांचं संकलन करायचं आहे, अध्यातिम्क किंवा तात्त्विक चर्चा नव्हे.

ठीक आहे मग, करा चालू. संकल्पनेचं नाव सांगा, आणि त्या भूताचं डिस्टिंग्विशिंग कॅरॅक्टरिस्टिक सांगा.

उदा.- मुंजा- १- लहान मुलांचं भूत २- हे पिंपळाच्या झाडावर असतं असं मानलं जातं.

राधिका

लेखनविषय: दुवे:

Comments

संपादकांना विनंती

चर्चा प्रस्तावाचे नाव बघूनच उपक्रमी चर्चा उघडत नाही आहेत, असे दिसते आहे. तरी कृपया चर्चा प्रस्तावाचे शीर्षक बदलून "आणखी शब्द- भुतांची नावे" असे करता येईल का?

राधिका

भुतेखेते

वा!वा! सध्या फक्त नावे देते, विस्तार नंतर किंवा इतरांनी करावा.

१. समंध
२. हडळ
३. देवचार
४. प्रेत (म्हणजे शव नाही, असा एक भुतांचा प्रकार असल्याचे वाचले आहे.)
५. गिरा
६. ब्रह्मराक्षस
७. खवीस - हे मुसलमान भूत असते. :-)
८. वेताळ - हा भूतांचा राजा, दिसताना माणसासारखा दिसतो पण त्याचे पाय उलटे असतात. याचे डोळे हिरवट असून, केस उभे राहिलेले असतात. त्याच्या उजव्या हातात वेताची छडी आणि डाव्या हातात शंख असतो.
९. आग्या-वेताळ (या दोघांतील फरक माहित नाही)
१०. सटवाई
११. जखीण - इच्छा अपूर्ण राहिलेल्या सवाष्ण बाईच्या भुताला जखीण म्हणतात.
१२. चेटकीण
१३. पिशाच्च
१४. आसरा - हे पाण्यापाशी राहणारे भूत असते.
१५. ब्रह्मसमंध - हे ब्राह्मणाचे भूत असते.
१६. झोटिंग - हे शूद्राचे भूत असते.
१७. अळवंतीण - हे लहान मुलीचे भूत असते.

बाकीचे नंतर

इब्लिस

खवीसवरून इब्लिस कार्टं.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

चुडैल

चुडैल ही बहुधा मुसलमानी हडळ असावी. :-)

हम्म! इब्लिस कार्ट कुठे संचारत होतं ते आठवलं.

अरबी

इब्लीस, खवीस, सैतान, चुडैल हे अरबी /फारशी शब्द असावेत.
त्यामुळे ते मुसलमान वाटत असावेत. (डॅम्बिस हा कुठल्याभाषेतील शब्द असावा?)

नितिन थत्ते

डॅम्बीस : अवांतर

डॅम्बीस हा शब्द मॅकॉलेच्या पोरांच्या बोलीभाषेतला असावा. उगीच माझा कयास.

पण त्यात अतिमानवी काही नाही. ;-) अतिशय मानवी शब्द आहे. आपण सर्वच कधीना कधी डॅम्बीस असतो. त्यामुळे डॅम्बीस अवांतर.

डॅम्बिस् बद्दल

डॅम्बिस ह्या शब्दाची उपपत्ती मी अशी ऐकली होती - तो इंग्रजीतल्या damned beast ह्या शब्दाचे देशीकरण आहे. त्याचप्रमाणे 'डांबरट' हा सुद्धा damned rat ह्या शब्दाचे देशीकरण...

भूतावळ आणि डॅम्बिसगिरी!!

ही व्युत्पत्ती नकीच खरी असावी. कारण ती वाचून मी एकटीच खूप वेळ हसले. मराठी शब्द (इंग्रजीतून आलेले असले तरी) अगदी चपखलपणे वर्णनात बसतात. बाकीच्या भाषांत ही मजा नसते. आणखी काही शब्द.......

उदा. गुन्तवळ, भूतावळ, टमरेल(व्युत्पत्ती माहित नाही) , टीनपाट(टीनचे भांडे ), तकाटणे(अगदीच 'टुकार ' द्रव्यापासून् बनवलेली वस्तू),

गौरी

टमरेल

टमरेल हा tumbril चा अपभ्रंश आहे.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

टंबलर?

टमरेल हा Tumbrilचा की Tumblerचा अपभ्रंश? मला वाटते मिलिटरीमध्ये जो इनॅमल कोटेड(?) सर्वोपयोगी मग(Mug) असतो त्याला टंबलर म्हणतात.

लिंक

ही बघा लिंक. (चायला काय् कट्कट् आहे या १०% रोमन अक्षरे कटऑफ्ची)

http://www.thefreedictionary.com/tumbril

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

टंबलर

टंबलर
टंबलर
टंब्रिल
टंब्रिल

विसुनानांची उपपत्ति अधिक पटण्याजोगी आहे. वर डावी कडे बिअरचा प्यूटर धातूमध्ये बनविलेला टंबलर आहे आणि त्याच्या शेजारी टंब्रिल गाडीचे चित्र आहे. ही गाडी एका घोडयाने ओढली जाते आणि फ्रेंच राज्यक्रान्तीनंतरच्या काळात उमरावांना गिलोटिनकडे 'टंब्रिल'मध्ये घालून नेत असत अशा संदर्भात हा शब्द नेहमी वाचनात येतो.

महाराष्ट्रातील सर्वसामान्य वाचकाला टंब्रिलची माहिती असणे अवघड वाटते पण सैन्यात काम केलेल्या शिपायांमुळे विस्की/बिअर टंबलर त्यांच्या अधिक माहितीचा असणार. तेव्हा 'टमरेल' हे 'टंबलर' ह्याचा अपभ्रंश असणे अधिक शक्य वाटते.

(चित्रश्रेय स्वत: आणि विकिपीडिया.)

माझ्या मते टंब्रिल-->टमरेल, कारण-

आता येकच शंका: इंग्रजी शब्दांचे मराठी अपभ्रंश ज्या पद्धतीने होतात, तिथे वर्णविपर्ययाचे उदाहरण मला तरी नाही दिसले कधी फारसे. जर टमरेल हा टंबलर चा अपभ्रंश असेल, तर ते वर्णविपर्ययाचे उदाहरण आहे. त्यामुळे माझ्या मते टंब्रिल-->टमरेल. असो. यात काही चूक असेल, तर सांगावी, ही विनंती.

अपडेट:
तुमचा मुद्दा पटला. कारण "सैन्यातील टमरेले" असे कुठेतरी मराठी साहित्यातच वाचलेले आठवले.धन्यवाद.

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

अप्सरा, यक्ष, गंधर्व

१. अप्सरा
२. यक्ष
३. गंधर्व
४. तुंबरू
५. किन्नर
६. राक्षस
७. असूर
८. नाग

बाकीचे आठवले की.

भुतांची नावे असे शीर्षक नको. अमानवी शक्ती यापेक्षाही अधिक आहेत.

थोडी 'स्ट्रक्चर्ड्' पद्धत

असायला हवी ह्या प्रकारच्या उपक्रमांसाठी - म्हणजे त्यातून खरेच काही मिळवायचे असेल तर. (शब्दसाठा इत्यादी) - कारण चर्चाप्रस्ताव फॉर्म (साचा?) मधे
- पुनरुक्ती
- शब्द शोध शक्य नसणे
- अकारविल्हे अनुक्रमाचा अभाव
- शब्द अर्थ एकसंधता (शब्द आणि त्याचा अर्थ एकत्र) नसणे
- एकत्रिकरणाचा अभाव
असे दोष दिसून येतात. उपक्रमाच्या चालकांकडे ह्यासाठी काही उपाय असेल तर उत्तमच पण नसेल तर गुगल डॉक्स वगैरे वापरले जाउ शकतील.

कृपया विचार व्हावा.

म्हणजे?

शब्द अर्थ एकसंधता (शब्द आणि त्याचा अर्थ एकत्र) नसणे

म्हणजे काय ते कळले नाही.

राधिका

म्हणजे - शब्द आणि त्याच्यापुढेच त्याचा अर्थ

काही प्रतिसादात लेखकाने शब्दाचा अर्थ विचारलेला असतो, तो ३/४ प्रतिसादांनंतर दुसर्‍याकडून मिळतो - ते एकत्र उपलब्ध होणे गरजेचे आहे असे वाटते.

अच्छा

बरोबर आहे. विकिपिडिया वर जो धागा सुरु केला गेला आहे, त्यावर हे सर्व करता येईल असे वाटते.

राधिका

खेचर

खेचर = पिचाच्च, अज्ञानी योनी

खेचराचियाही मना | आणी सात्त्विकाचा पान्हा |
श्रवणासवे सुमना | समाधि जोडे || ज्ञानेश्वरी अ. १३ ओवी ११५८

अर्थ (दांडेकर प्रतीवरून) - पिशाच्यादी अज्ञानी योनी आहेत, त्यांच्या मनालाही माझा शब्द ऐकला की सात्त्विकाचा पान्हा फुटेल आणि चांगल्या मनाच्या मनुष्याची तर ऐकताक्षणीच समाधी लागेल.

डिस्क्लेमर १ - खेचर शब्दावर कुठल्याही प्रकारचा श्लेष (माझा) नाही, ज्ञानेश्वरांचाही नसावा. खेचर = गाढव आणि घोडा यांच्या संकरातून जन्मलेला प्राणी अशी कल्पना इ. स. १२९० मध्ये नसल्याने हा अर्थ नसावा.

डिस्क्लेमर २ - हा शब्द त्याकाळच्या "ओरिजिनल"विसोबा खेचरांना उद्देशून असावा किंवा कसे याबद्दल कल्पना नाही. खेचराच्या विरुद्ध "सुमन" म्हणजे चांगल्या मनाचा अशी योजना आहे. "ओरिजिनल"विसोबा खेचर संत असल्याने तेही सुमन असावेत. त्यामुळे खेचर शब्दाने त्यांचा निर्देश नसावा.

डिस्क्लेमर ३ - हा प्रतिसाद कोणाही सदस्याच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने लिहिलेला नसून केवळ विषयाशी सुसंगत वाटल्यानेच दिला आहे.

डिस्क्लेमर ४ - चर्चाप्रस्ताविकेला माझ्याकडून प्रतिसादाची अपेक्षा नाही तरीही चर्चाप्रस्ताविकेने ज्या हेतूने लिहिलेला आहे त्याच्याशी सुसंबद्ध आहे असे वाटल्याने सदर प्रतिसाद दिला आहे. तिला न पटल्यास ती कचर्‍याची पेटी दाखवायला मुखत्यार आहे.

विनायक

नुसती नावे चालतील?

रोचक विषय.. नावे अनेक ऐकली आहेत.. मात्र प्रत्यक्ष अनुभव अथवा "कॅरेक्टरीस्टीक्स" माहित नसल्याने इथे द्यावी की नाहि समजत नाहि

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

उपक्रम भारी आहे

१. गिर्‍हा / गिर्‍होबा - नक्की कुठल्या प्रकारचा माणूस मेला की त्याचा गिर्‍हा होतो हे माहीत नाही. पण हा कोकणातला शब्द. दांडेकरांच्या 'पडघवली'त हे भूत असल्याचं अस्पष्ट आठवतं आहे. हे भूत आकारानं लहान असावं, कारण अगदी चिमुकले तळपाय असलेल्या एका मैत्रिणीच्या चपला बघून 'अगदी गिर्‍होबाचे पाय दिसतायत तुझे' असं आजी म्हणाल्याचं आठवतं आहे.
२. मूळपुरुष - हेही तसं भूत प्रकारातच मोडणारं प्रकरण. घराण्याचा पहिला पुरुष (हे आपल्याच धोतरात अडकून पडणारं वाक्य आहे खरं. पण बहुधा वस्तीची सुरुवात करणारा, गाव वसवणारा पुरुष असं त्यात अभिप्रेत असावं) म्हणजे मूळपुरुष. गावकरी एकत्र जमत त्या आनंदाच्या प्रसंगी तो दिसून गायब होई, असं मानलं जात असे. रात्री गावातून फेरी मारून, आपल्या वहाणांचा करकर आवाज करत सगळं नीट चाललं आहे ना, याची खात्रीही करून घेत असे! त्याची भीती बाळगायचं कारण नसे. वाटलाच तर धाक.
३. परी - ही संकल्पना भारतीय नाही असं म्हणतात. पण ती संपूर्णपणे पाश्चात्त्यही नसावी. कारण खालिद हुसैनींच्या अफगाणी लोकांच्या तोंडी 'परी' 'नूर' असले शब्द सहजी असतात. ही बाई दिसायला कमालीची सुंदर हा तिचा विशेष. पाश्चात्त्य परीला जादू येते, तिच्याकडे जादूची छडी (वॉण्ड!) असते. पण असलं काही आशियाई परीकडे असतं की नाही कल्पना नाही.

वर मुंजा म्हणजे लहान मुलाचं भूत असं लिहिलं आहे. त्यात थोडी भर घालते. मुंज्या म्हणजे ज्याची मुंज झाली आहे, पण सोडमुंज झालेली नसता जो मुलगा मरण पावतो, त्याचं भूत.

उपक्रम भारी आहे! आठवेल तशी भर घालीनच. पण असेच अनेक भाग येऊ देत.

'हूर'

कारण खालिद हुसैनींच्या अफगाणी लोकांच्या तोंडी 'परी' 'नूर' असले शब्द सहजी असतात.

'नूर' म्हणजे 'प्रकाश', तो शब्द 'हूर' असावा.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

हो की!

अरेच्चा, हो की!

शिवाय -

(--- ने --- ला) पछाडणे,
(--- ने --- ला) धरणे,
(--- ने --- ला) घोळसणे,
(--- ने --- ला) झपाटणे,
(भुताचा एखादा प्रकार उदा. जखीण --- ला) लागणे,
(भुताचा एखादा प्रकार उदा. जखीण ---च्या) मानगुटीवर बसणे,
(----ला) बाहेरची बाधा असणे / होणे

शिवाय -

१. ज्या माणसाला भूत धरतं, तो माणूस म्हणजे 'झाड' ('भौतिकी' परिभाषेत!). उदाहरणार्थ ही म्हण - जखणीकडे बघायचं, की झाडाकडे बघायचं? (अर्थ- प्राधान्यक्रम ठरवा आणि निर्णय घ्या. वैर्‍याला तोट्यात घालताना आपल्याच माणसाचा तोटा होत नाही ना, हे बघा.)
२. लासवट / लावसट - लहान मुलांना खाणारी / त्यांचं रक्त पिणारी अतिमानवी स्त्री. तिच्या ओठांना रक्त लागलेले असून ती गलथान असते, असं वर्णन सापडतं.

शिवाय -

भानामती
करणी
जारण-मारण
मूठ मारणे

यांना काही शब्द आहेत का?

आमच्या गावी एकदा लग्नाच्या आधी हळद लागलेल्या मुलीने आत्महत्या केली होती. तेव्हा तिचं भूत रोज संध्याकाळी गावात फिरतं अशी वावडी उठली होती. अशा हळद लागलेल्या मुलीच्या भूताला वेगळा शब्द आहे का?

त्याचप्रमाणे मध्यंतरी मी कुठेतरी लांबच लांब पाय असलेल्या एका भूताचं वर्णन वाचलं होतं. त्याला काहीतरी वेगळं नाव असतं. आठवतंय का?

चकवा या नावाचं भूत आहे का? या भूताची बाधा झालेला माणूस एकाच रस्त्यावर फिरत राहतो, आणि त्याला पुढचा रस्ता सापडत नाही असं काहीसं अंधूक आठवतं.

मध्यंतरी 'मालवणी डेज' या मालिकेच्या एका भागात 'चाला/ चाळा' हे भूताचं नाव ऐकलं होतं. कुणाला माहित आहे का?

बाकी नुसती नावे सुद्धा चालतील, म्हणजे ज्यांना त्या भूताची माहिती असेल, त्या व्यक्ती ती माहिती इथे देतील.

राधिका

हाकमारी

मालवणी डेजमधे कोकणातील "हाकमारी" ह्या भूताचाही (स्त्री भूत)चा उल्लेख होता. ही (?) भूत रिकाम्या रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍याला हाक मारते आणि त्याला ओ दिली तर रक्ताच्या उलट्या होऊन मनुष्य मरून जातो

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

बख्ख्नन्

लांब पायाच्या भुताला बख्खन म्हणतात असे ऐकले आहे!!

हाकमारी..

आमच्या शाळेतल्या बाईंनी सांगीतल्या गोष्टीत ह्या हाकमारी चा उल्लेख होता.ती म्हणे नावाने हाक मारते तिला ओ दिली तर तिच्यामागे ती आपल्याला नेते.अन् अंगात येणारे ही स्वतःला देवाचे झाडच म्हणतानाही मी ऐकलं आहे.

परी आणि चकवा

परी ही भारतीय संकल्पना नसावी. पर्‍यांचा उगम बहुधा केल्टिक किंवा आयरिश लोककथांतून झाला असावा. हूर ही परी मानली जाते का अप्सरा ते नेमके माहित नाही.

चकवा ही परिस्थिती आहे. ती नेमकी कोणत्या अतिमानवी शक्तीमुळे अस्तित्वात येते ते माहित नाही. चकव्यात सापडलेली माणसे फिरून फिरून एकाच जागी येतात. मागे कधीतरी मनोगतावर चकवा हे भूत असते असेही सांगितल्याचे आठवते. असो.

चकवा

१. चकवा ही एक काळी विद्या आहे असे आमच्या शेजारच्या आज्जी सांगयच्या. ही विद्या असणारी व्यक्ती एखाद्या गोष्टीवर चकवा अप्ल्याय करते. जसे पत्त्याचा कागद वगैरे. मग तो कागद (वस्तु) जो बघेल तो चकव्यात सापडतो आणि फिरत रहातो.

२. एकदा एका ट्रेकिंगला आमच्या बरोबरच्या गावकरी वाटाड्याने चकव्याची फुले दाखवली होती. ही फुले सूर्यास्ताला फुलतात व त्याच्या गंधाने माणूस गुंगीत जातो व भरकटतो - जंगलात वाट चुकतो. त्याने एकतर दरीत पडतो, नाहितर जंगली श्वापदे खातात.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

चकवा

चकवा लागतो असे म्हणतात ना? चकवा म्हणजे भूत वगरे नसावे असा माझा समज आहे.
चकव्याच्या कथा विशेषकरून ट्रेक बिकला गेल्यावर रात्री बसून सांगायला जाम मजा येते. एका मित्राच्या बायकोला पुण्याच्या सदाशिव पेठेत चकवा लागल्याची सुरस आणि चमत्कारिक कथा वाचून मी पोट धरून हसले होते. पुण्याबाहेरच्या लोकांना कदाचित सदाशिव पेठेत गांगरल्यासारखं होईल कारण इवल्याश्या रस्त्यांवर दुतर्फा चारचाकी गाड्या उभ्या करून शिवाय दुपदरी वाहतूक अव्याहतपणे सुरू असते. पण पक्क्या पुणेकराला स. पेठेत चकवा बिकवा लागणं म्हणजे टू मच!
बाकी बैलांना वगरे हा चकवा दिसतो म्हणतात. रात्रीच्या वेळी एखाद्या वाटेवर जायला बैलाने ठाम नकार दिला तर त्या वाटेवर चकवा असू शकतो असे म्हणतात म्हणे.

बाकी भूत आणि घोस्ट यांच्यात नक्की फरक कोणते असावेत? व्हाईट हाऊसमधल्या भुताला कॅमेर्‍यात पकडण्यात यश आले होते असे वाचनात आले. ते काय असावे?

--अदिती

-------------------------------------
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती
झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
कलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने

अतिमानवी..

बाकी सूक्ष्मदेह - लिंगदेह या योगातल्या कल्पना अतिमानवी असू शकतील का?
झाडाच्यणर्ध्या पानाभोवतीही पूर्ण पानाच्या आकाराचा ऑरा असतो , फक्त तोडलेल्या भागाचा ऑरा क्षीण दिसतो असे वाचलेले आहे. हा ऑरा वगरे याही गोष्टी अतिमानवी मानायच्या की मानवी?
एकूणात चर्चाविषय फारच मनोरंजक आहे. चालू द्या!

--अदिती

-------------------------------------
वीज कडाडुन पडता तरुवर कंपित हृदयांतरि होती
टक्कर देता फत्तर फुटती डोंगर मातीला मिळती
झंझावातापोटी येऊन पान हलेना हाताने
कलंक असला धूऊन टाकणे शिवरायाच्या राष्ट्राने

आणखी काही प्रश्न

आत्मा, परमात्मा, महात्मा हे शब्दसुद्धा या अर्थाने अतिमानवी काय ? "निर्मिक" हा (म. फुल्यांचा पेटंट असणारा) "क्रिएटर" या अर्थाने वापरलेला शब्दसुद्धा अतिमानवीच काय ?
"देव दानवा नरे निर्मिले" असले तरी ते दोन्ही शब्द मानवी नसून अमानवीच आहेत याची गंमत वाटली.
थोडक्यात , "अतिमानवी" या सदरात ज्याप्रमाणे "डार्क टेरीटरी" मधल्या गोष्टींची सर्वसाधारणपणे कल्पना आपण करत असलो तरी परमेश्वराची संकल्पनाही अतिमानवी आहे असा विचार करता येईल.

थोडे मूळ धाग्याच्या अनुषंगाने : "जादू-टोना/टोणा" या जोडशब्दातल्या टोन्या/टोण्याला काही अर्थ आहे काय ?

जादूटोणा

जो करतो तो जादूगार आणि ज्याच्यावर ती होते तो टोण्या - त्यामुळे शब्द जादूटोणा! ;)

(पीसी)चतुरंग

टोनुवा

टोणा/टोना शब्द हिंदीतून आलेला असावा असे वाटते. पूरिया धनाश्री रागातील एका पारंपरिक ख्यालाचे शब्द 'टोनुवा (म्हणजे टोणा) माई री कर दे, जो बस (म्हणजे वश) होवे पिया मोरा' असे आहेत. आता यातला टोनुवा म्हणजे टोणा असावा असे पूर्ण वाक्याच्या संदर्भात समजते.

-- येडा बांटू

माणसे खाणारी

लावसट - माणसे खाणार्‍या व्यक्तीला लावसट म्हणतात.

थोडक्यात तुमच्या नव्या भाषेत व्हँपायर का काय म्हणताते ते.
हा एक अनवट शब्द हल्ली फारसा वापरात नसलेला, हल्ली वाचनातही आला नाही.
फार मागे भालबा केळकरांनी भाषांतरीत केलेल्या शेरलॉक होम्स च्या एका कथेचे नाव लावसट होते .

आपला
गुंडोपंत

देव

उपक्रम आवडला.

देव, देवी, देवता वगैरे यादीत आलेले दिसत नाहीयेत.

परी हे फेऽरीचेच रूप असावे काय?

इब्लिस

माझ्या माहितीप्रमाणे "इब्लिस" म्हणजे ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल (की सॉक्रेटिस नक्की आठवत नाही) चे अरबी नाव आहे.

नितीन

ऍरिस्टॉटल = अरस्तू; इब्लिस हे शैतानाचे नाव

ऍरिस्टॉटल = अरस्तू; इब्लिस हे शैतानाचे नाव

अरस्तुलबाई

ग्रामीणभागात अरस्तुल बाई असे नांव आजही प्रचलित आहे.
याचा इब्लिसशी काय संबंध असावा?

इब्लिस हा एक 'जिन्न्' होता, आधी देवा/अल्लाचा लाडका सेवक अन् नंतर देवाने हाकलून दिल्यामुळे सैतान झालेला. त्याचं काम साधारणतः सैतानाच्या सर्पाने(सर्परूपाने) गार्डन ऑफ ईडनमधे ऍडम अन इव्ह दरम्यान जे केलं, तेच आदम अन् हव्वा यांचेदरम्यान करण्याचं होतं, असं वाचनात आहे.

 
^ वर