कुंडलीत कोठेही मंगळ व शनिची एकत्र पणाने संचार म्हणजे जातकाच्य आयुष्यात स्थांनाच्या फ़ळा प्रमाणे विरुध्द घटना.
वर्ग क्रंमाक दोन :-
अश्विनी नक्षत्राची वैशिष्ट्ये:- केतू शुभ ग्रहाबरोबर नसेल व दूषित असेल तर हे नक्षत्र संतती प्रदान करत नाही. स्त्रियांना गर्भधारण झाल्यास गर्भपाताची शक्यता असते. कोणत्याही उपचाराचा फायदा होत नाही. त्यामुळे बर्याच स्त्रियांना संतती प्रापतीचा उपभोग घेता येत नाही. काम शक्ति क्षीण असते. पण याच्यावर जर शुभ ग्रहाची दृष्टी असेल तर किंवा ह्या नक्षत्राच्या खोल्या मध्ये शुभ ग्रह किंवा गोचरीचे शुभ ग्रह असल्यास कुप्रभाव कमी होतो.
या नक्षत्रावर जन्मझालेल्या व्यक्ति विचारशिल, अध्ययनशील, अध्यपानाचे कार्य करणारे. ज्योतिषी, वैद्यकीय शास्त्रा रुची असणारे, ( हैयो हैयोयो ) लेखक, इमादार, चंचल प्रकृतीचे, निसर्ग भ्रमण प्रिय, आंगावर चामखीळ व त्वचेचे विकार असणारे, गृहकलह माजवणारे, महत्त्वाकांक्षी विचारांचे असतात.
विशोत्तरी मतानुसार ही व्यक्तीच्या जन्मताच केतूच्या महादशेच्या चरणात येते. केतूची दशाचा काळ सात वर्षचा मानला जातो. केतूच्या दशेत मंगळ प्रभावी असेल याच्या उलट मंगळाची दशा चालु असून केतू प्रभावी असेल तर लग्न कुंडलीच्या ग्रह स्थांना नुसार फलप्राप्ती होईल. त्या व्यतिरिक्त नाडी ( चड्डीची नाही ) पध्दतीनुसार फलप्राप्ती होईल. (आकृती पाहा http://vastuclass.blogspot.com) प्रत्येक नक्षत्राची नाडीचा उल्लेख केलेला आहे. ह्या नक्षत्रावरुन कोणताही ग्रह गेला तर त्या ग्रहानुसार व स्थाना नुसार जातकास फल प्राती होईल
आपणास दरोज दिसणार रविग्रह दरवर्षी वैशाख महिन्याच्या सुरवातीला ह्या नक्षत्रा कडे तेरा दिवसाच्या पहुणचारासाठी येतो. चे,चु,चो,ला याच्या कडे एका पाठोपाठ तीन ते साडे तीन दिवस प्रत्येक खोलित आपला मुक्काम करत असतो. त्याच वेळी तो कुणाला चांगली फळे देतो किंवा त्यांच वेळी दुसरा कोणताही ग्रह तेथे मुक्काम करत असेल तर तो त्याच मित्र शत्रु सम प्रमाणात जो जसे असेल त्या प्रमाणे आपल्या जवळील अस्त्राचा उपयोग करुन जातकास त्याप्रमाणे फळे देतो.
रवीचे मित्र चंद्र, मंगळ, गुरु ह्याच्या बरोबर असताना त्याची जंगी पार्टी होत असते. शनि आणि शुक्राला तो आपला शत्रु मानत असतो. बुधाला तो आव जाव घर तुम्हारा सम मानतो.
हा वर्गत्तम नवंमाश असल्यामुळे या ठिकाणी शुभ किंवा अशुभ ग्रह फ़लिताच्या दृष्टीने अतिशय बलवान असतात. शनि हा शत्रु असल्याने तो नीच असतो. रवि व मंगळ या नवमांशात बलवान व राजयोगकारक ठरतात. हे ग्रह शौर्य, धैर्य, सत्ता, अधिकार, कीर्ति अथवा लौकिक अशि फ़ळे देताना अनुभवास येतात. जन्मकुंडली मध्ये केन्द्र कोणांत १,४,७,१०,५,९, स्थनचे रवि व मंगळ या नवमांशी राजयोगकारक ठरतात. नवमांश कुंडलीत क्रेद्रांत हा नवमांश वर्गोत्तम असतां व्यक्ति भेद क्ररुन पुढे येतात.
मेषराशीतील मेष नवमांशी कुंडलीत कोणतेही ग्रह असता ( शनि सोडुन ) तमोगुण शीघ्रकोपी, दीघोंद्योंग व महत्वाकांक्ष हे गुण सामान्यत: आयुश्यात अविष्कृत होत्तांना दिसतात. प्रयत्न व पाराकाष्ठा हा गुण या नवमांशात आढळतो.
ह्या स्थांना मंगळ व शनि एकत्र असल्यास गंभीर परिणाम जातकाच्या जिवन शैलित त्यास अनुभवास येतात. तसेच कुंडलीत कोठेही मंगळ व शनिची एकत्र पणाने संचार म्हणजे जातकाच्य आयुष्यात स्थांनाच्या फ़ळा प्रमाणे विरुध्द घटना.
सर्वतोभद्र चक्र प्रमाणॆ पहिला सूक्ष्मांश म्हणजे “ तस्करांश “ जर जातकाला हा अंश प्राप्त झाला असेल तर जातकाची वर्तणुक तस्कराप्रमाणे म्हणजेच चोरी, कुमामार्गची असते.
( जर अभ्यासा साठी सर्वतोभद्र चक्र हे दुर्मिळ पुस्तक पाहिजे असल्यास आपण माझ्ये पारंपरिक ज्योतिषशास्त्र गुरु सौ. मिनल कुलकर्णी ( ज्योतिष शास्त्री ) यांनी मराठीतून लिहिलेले हे पहिले व एकमेव पुस्तक आपण त्यांच्याशी संप्रर्क करुअन प्राप्त करु शकतात. टेलिफ़ोन नं 022-28695120 / Mob. 9322030404 )
संजीव
http://vastuclass.blogspot.com
Comments
मंगळ व शनि एकत्र
ह्या स्थांना मंगळ व शनि एकत्र असल्यास गंभीर परिणाम जातकाच्या जिवन शैलित त्यास अनुभवास येतात. तसेच कुंडलीत कोठेही मंगळ व शनिची एकत्र पणाने संचार म्हणजे जातकाच्य आयुष्यात स्थांनाच्या फ़ळा प्रमाणे विरुध्द घटना.
का?
कारण यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत आणि ते एकमेकांच्या विरुद्ध आहेत.
शनि संकुचन करवतो तर मंगळ स्फोट.
शनि थंड - मंगळ उष्ण
शनि पापग्रह - मंगळ शुभग्रह
यामुळे दोन विरुद्ध गुणधर्माचे ग्रह एकत्र आल्यास विनाश संभवतो.
असे योग सप्तमातून आल्यास लग्नाची वाट लागते.
चंद्रा सोबत आल्यास व्यक्ति आपल्याच मनोवोकारांनी ग्रस्त असते, वगैरे वगैरे.
मात्र यात ग्रहांचे अंश आणि त्यांचे नक्षत्र कोणते आहे हे पाहणे महत्त्वाचे असते.
अन्यथा फल वर्तवण्यात गडबड होते.
हे फार ताकदवान ग्रह आहेत.
वाणीस्थानात मंगळ असेल अथवा त्याचा चांगला प्रभाव असेल तर ती व्यक्ति बोलण्यात हार जात नाही. तडफेने आणि इतरांनाही स्फूर्ती देणारे ही व्यक्ति बोलू शकते. येथे भाषण लिहुण आणावे लागतच नाही. उत्तम बुध असेल तर सरस्वती जिव्हा नर्तन पाहायला मिलते.
मात्र यावर शनिचा प्रभाव असेल तर...? तर अशी व्यक्ती कधीतरीच बोलते पण जेव्हा बोलते तेंव्हा ते असे लागट असते बास! काही वेळा अशी व्यक्ती भांदकुदळही असु शकते. मात्र असे निष्कर्ष काढण्या आधी ग्रहांची सर्वमार्गे माहिती काढलेली बरी.
असो,
मंगळ व शनि चंद्रा बरोबर एकत्र असल्यास किंवा चंद्र पाप कर्तरीत सापडल्यास बायपोलर डिप्रेशन ने माणूस हैराण असेल का?
संजीवराव,
लेख जरा विस्तारीत लिहाल काय?
कदाचित शीर्षके टाकलीत तर अजून सोपे होइल.
आपला
गुंडोपंत
मंगळही पापग्रहच
शनि पापग्रह - मंगळ शुभग्रह
हे चुकीचे आहे. हे दोन्ही पापग्रहच आहेत. शुभग्रह फक्त दोनच आहेत ते म्हणजे गुरु आ॑णि चंद्र
मंगळ हा पापग्रहच आहे.
आपला
गुंडोपंत