उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
पर्पल डेझी
वैद्य
November 1, 2009 - 12:34 am
जांभळट गुलाबी रंगाची डेझीची फुले फार आकर्षक दिसतात.
बाजारत ही फुले दिसली आणि लगेच घरी आणुन कामाला लागलो. ह्यावेळेस चित्र 'टॅक शार्प' येणे आणि थोडीशी नाविन्यपूर्ण मांडणी करणे ह्यावर भर द्यायचे ठरवले होते. फुलाच्या गाभ्यापासून ते प्रत्येक पाकळीचा नाजूकपणा 'क्रिस्प शार्प' आला पाहिजे हे मनाशी ठरवुन क्यामेराचे सेटींग लावले. त्यासाठी अतीशय बारीक ऍपर्चर आणि मंद शटरस्पीड आवश्यक असल्याने ट्रायपॉडवर क्यामेरा स्थानापन्न करुन केबल रिलिजच्या सहाय्याने काळी पार्श्वभुमी लावुन चित्रे काढली.
उपक्रमाच्या दिवाळीअंकाच्या मु़खपृष्ठासाठी काढलेले चित्र पांढर्या डेझीचे आहे. त्यावेळेस गाभ्यावर फोकस केंद्रित करुन पाकळ्यांना थोडे धुसर केले होते इथे सर्व चित्र शार्प ठेवले आहे.
दुवे:
Comments
आवडले
प्रकाशचित्र आवडले!
मलाही
छायाचित्र आवडले. एकदम कुरकुरीत (क्रिस्प)! :)
मस्त
आणि उपक्रम दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावरील चित्राशी तुलनाही रोचक.
त्या दोन चित्रांची तांत्रिक तुलना थोडी अधिक करावी ही विनंती. मांडणी, रंगसंगती, कॅमेर्याच्या सेटिंग्स, पोस्टप्रोसेसिंग, वगैरे.
टवटवीत
सुरेख टवटवीत चित्र आहे.
वाह्..
एकदम फ्रेश प्रचि !!
आवडले
सुंदर आहे फोटो! रंग, मांडणी आणि शार्पनेस छान आहे.
मस्त.
फोटो मस्त आहे.. नेहमीसारखाच.
>>>केबल रिलिजच्या सहाय्याने काळी पार्श्वभुमी लावुन
म्हणजे काय्? ते कसे केले ते सांगाल का?
- सूर्य.
प्रसन्नचित्र
प्रसन्नचित्र.
(भोचक)
कृत्रिम
फारच सुंदर रंग मात्र फुले (फोटोसाठी?) जास्तच ओली असल्याने (केल्याने?) कृत्रिमपणा आला आहे असे मला वाटते
ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे