फॉल

भारतात जसा 'नेमेची येतो मग पावसाळा' म्हणतो तसे अमेरिकेत 'नेमेची येतो मग फॉल असे' म्हणावेसे वाटते. उन्हाळा संपून थंडीचा कडाका वाढणार ह्याने उदास वाटत असले तरी चहुबाजुंनी चाललेही ही रंगांची उधळण बघून प्रसन्न वाटायला लागते. पूर्वी दक्षीणेकडील राज्यात मुक्कामी असल्याने ही रंगांची उधळण तितकी दिसायची नाही. आता उत्तरेकडे स्थलांतरीत झाल्यावर अक्षरशः थक्क करणारा रंगांचा सोहळा पाहायला मिळाला.

पानगळती होण्यापूर्वी खुलुन येणारे हे रंग टिपण्याचा प्रयत्न ह्या चित्रात केला आहे. अमेरिकेतील ओहायो राज्यातील सिल्वेनिया येथे हे चित्र टिपले आहे. झाडांचे नाव माहित नाही. 'सिकॅमोर' असावे असे वाटते आहे. झाडाची पाने अगदी 'मोहब्बते' चित्रपटात सजावटी साठी वापरलेल्या पानांसारखीच होती. :)

लेखनविषय: दुवे:

Comments

जबरा

काय खत्रा फोटू हाय राव
निव्वळ जबरा

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

वा मनोहारी चित्र! सुरेख आलाय फोटो!

ह्याच फॉल सीझनला सुवर्णकांती लेऊन झळाळून उठलेले एक झाड

चतुरंग

खोडांच्या उभ्या तिरप्या रेषा कथा सांगतात

पण काय कथा आहे, ते नेमके कळत नाही, हे गूढ उत्तम चितारलेले आहे.
पायवाटेवरून जावेसे वाटते.

(उगाच आणखी: कोलबेर यांची अन्य निसर्गदृश्ये/क्षितिजदृश्ये कधीकधी ग्रीटिंगकार्डसारखी सफाईदार असतात. सफाई असली तरी माझे मन कित्येकदा गुंतत नाही. चित्रकाराशी संवाद साधत नाही. तसे या चित्राबद्दल झालेले नाही. तांत्रिक सफाई असली तरी चित्रकाराची वैयक्तिक छाप उमटलेली आहे, माझ्याशी बोलते. म्हणूनच कोलबेर यांच्या दर्जेदार चित्रांपैकी हे चित्र मला विशेष आठवत राहील.)

मस्तच!

मस्त चित्र."रंगूनी रंगात सार्‍या संग माझा वेगळा" असं जणू प्रत्येक झाड गातंय

हे चित्र बघुन एकदा दिसलेलं, एकटंच रंगलेलं, वेगवेगळ्या रंगात रंगलेलं मजेशीर झाड आठवलं.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

छान

चित्र. शाळेत असतांना वह्यांवर केव्हा केव्हा परदेशातील छान छान निसर्गचित्रे असत, त्यांची आठवण झाली.
मागच्या वर्षी फॉल कलर्स पाहण्यासाठी वरमाँटला गेलो होतो तेही आठवले. धन्यवाद.

आहाहा!

ओहायोत लाल, पिवळी, केशरी झाडे डवरली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा कमानी करून उभी राहणारी झाडही मला खुप आवडतात.

आठवणी

फॉलची सुरेख छायाचित्रे पाहून गेल्या वर्षीच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांचे शब्दचित्रण मी या जागी केले आहे.
हेमंताचे दिवस मजेचे
दुरून डोंगर साजिरे
वृक्षांची रंगसंगती

सुंदर

मस्त फोटो आहे! रंग फारच मस्त टिपले आहेत. कंपोझिशन सुद्धा मस्त! एकूणच टोनल काँट्रास्ट बेष्ट जमलाय!

आवडले

छायाचित्र एकदम आवडले. खास भित्तीचित्र स्टाईल.


वॉलपेपर

वॉलपेपर म्हणून जतन करावे असे सुरेख छायाचित्र.

सन्जोप राव
होगा कोई ऐसा भी, कि 'गालिब' को न जाने?
शाइर तो वो अच्छा है, प' बदनाम बहोत है

 
^ वर