तर्कक्रीडा क्र. १

(स ब ब )वर्ग =त ब क र स.
यात तीन अंकी संख्या (स ब ब ) चा वर्ग पाच अंकी संख्या (त ब क र स ) आहे.
इथे अंकांच्या जागी अक्षरे वापरली आहेत. (एक अंक-एक अक्षर)
तर (स ब ब ) ही संख्या शोधा. त्यासाठी लेखी आकडेमोडीची आवश्यकता नाही.केवळ गणितीयुक्तिवादाने कोडे तोंडी सुटते.
उत्तर कसे काढले याचे संक्षिप्त विवरण द्यावे अशी अपेक्षा आहे.

..........यनावाला

लेखनविषय: दुवे:

Comments

हे घ्या

१९९? बरोबर आहे का सान्गा, मग (माझा) लोगिक सान्गते

उत्तर

१. ३०० चा वर्ग ९०००० होतो. म्हणजे ३०० च्या पुढील बहुतेक संख्यांचा वर्ग सहा आकदी होणार्. ह्याचा अर्थ स = १,२ वा ३ पैकी असावे.
२. एककस्थानी २, वा ३ असलेली वर्गसंख्या अस्तित्वात असू शकत नाही. म्हणजे स = १, हाच पर्याय उरतो.
३. वर्गाच्या एककस्थानी १ असल्यास ज्या संख्येचा वर्ग केला आहे तिच्या एककस्थानी १ वा ९ असायला हवे. स = १ असल्याने ब = १ असू शकत नाही. म्हणजेच ब = ९.

म्हणून उत्तर = १९९

छान

छान

मलाही हेच म्हणायच होत पण योग्य शब्दच नाही सापडले

मराठी मध्ये जरा problem येतो आजकाल. हे बदलण्याचा प्रयत्न सुरु आहे

अरे वा!

म्हणून उत्तर = १९९

अरे वा! मीही असंच उत्तर लिहिणार होतो! पण आपण लिहिल्यामुळे आता परत लिहीत नाही! ;)

तात्या.

प्रशंसनीय

१/वरदा यांचे पूर्णवर्ग संख्यांविषयीचे निरीक्षण अचूक आहे. अशा संख्येचा एककांक (२,३,७,८) यांपैकी असू शकत नाही याचा उपयोग करून त्यांनी योग्य युक्तिवाद केला आणि अपेक्षित उत्तर शोधले. धन्यवाद.
२/ तत्पूर्वी आवडाबाईंनी उत्तर काढलेच होते. त्यांनी युक्तिवाद मांडला नाही इतकेच.

३/ तात्यासाहेबांनीही उत्तर शोधले. त्यांना काहीच अगम्य नाही.
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

.......... यनावाला

कोडे

कोडे आवडले. विचार करायला मजा आली. चौथीच्या स्कॉलरशिपची आठवण झाली.

किंचीत दुरुस्ती !

वरदा यांच्या तर्क शक्तीला सलाम ! पण एक विधान थोडे दुरुस्त करुया .
' ३०० च्या पुढील संख्यांचे वर्ग सहा आकडी असणार. ' असे नसते.
उदा. : ३०१ वर्ग = ९०६०१
३०२ वर्ग = ९१२०४
.
.
.
३०९ वर्ग = ९५४८१ या सर्व ३०० च्या पुढील संख्यांचे वर्ग पाच अंकीच आहेत, पण संख्या आणि तिची वर्गसंख्या यातिल पहिला अंक [एकक स्थानचा नव्हे .] सारखा असणार नाही. ते फक्त १ च्या बाबतीतच खरे ठरते.
वरदा याना खोडुन काढण्याचा उद्देश नाही. गैरसमज नसावा.

बहुतेक

तुमचे म्हणणे बरोबर आहे, म्हणूनच उत्तराच्या प्रतिसादामध्ये " ३०० च्या पुढील बहुतेक संख्यांचा वर्ग सहा आकडी असणार" असे म्हटले होते. सर्व संख्यांचा नाही.

१९९

उशिरा पण उत्तर न बघता :)
स = वर्गाचे एकं स्थान म्हणजे २,३,६,७ हे शक्य नाहीत
>४०० चा वर्ग सहा आकडी म्हणून स = १
ब^२ च्या एकं स्थानी १ म्हणून म्हणून १११ किंवा १९९ पण् स ब ब म्हणून १९९

 
^ वर