चायनिज् दिवाळी?

झी मराठी वाहिनीवरच्या 'हप्त्ता बंद' ह्या कार्यक्रमाच्या वेळी स्पर्धकाला एक प्रश्न विचारला जातो. फटाक्याचा शोध कोणत्या देशाने लावला? चीन, जपान, ईटली, स्पेन असे पर्याय होते. महिला स्पर्धक होती. तीने चीन हा पर्याय निवडला. हा पर्याय का निवडला असे निर्मिती सावंत विचारते. आदेश बांदेकर भावजीची जागा आता निर्मिती सावंतने घेतली आहे. ती हा कार्यक्रम 'होस्ट' करते!

महिला स्पर्धकीने मला नक्की कोणत्या देशाने शोध लावला हे माहीत नाही. मी तर्क लाढवला असे प्रामाणीकपणे सांगते. तर्क असा आहे की आजकाल अमके काय तर चीनचे, तमके काय तर चीनचे. असे सगळी कडे चीनचं नाव घेतल्या जात. म्हणून मला चीन ह्याच देशाने फटाक्याचा शोध लावला असेल असे वाटते.

निर्मिती सावंतपण ह्या तर्काला दूजारे देत म्हणते, खरेच आजकाल स्वस्त म्हणून चायनिज वस्तू वापरल्या जातात. खातांनापण चायनिज भेळ, नूडलस्, आकाश कंदिल पण चायनिज् . काही वर्षांनी दिवाळीपण चायनिज् होणार असे वाटते.

वर वर पाहाता हे विधान हसण्यावारी नेल्या जाते. पण खरच आकाश कंदिल, दिव्यांच्या माळा, कृत्रिम झेंडूची फूले, शोभेच्या वस्तू, भेट वस्तू ह्या चायनिज मिळतात ग्राहकांची पसंतीपण ह्या चायनिज वस्तू घेण्याकडे असते.

मला खालील प्रश्ने पडली आहेत. वाचकांनकडे ह्यावर काही उत्तरे सापडतील अशी अपेक्षा करते.

आपले सण जर चायनिजमय होऊ नये असे वाटत असेल तर आपल्याला ह्यासाठी काय करता येईल?
आपण ग्राहकांनींच चायनिज वस्तू विकत घेतल्या नाहीतर चालणार नाहीत का?
खरे तर ह्या वस्तू भारतात बिकण्यासाठी येणारच नाही ह्यावर भारत सरकार काही ठोस उपाय योजना राबवतील का?

लेखनविषय: दुवे:

Comments

चिनी वस्तू

आपण फार महत्वाचा विषय निवडला आहे. चिनी लोकांनी संपूर्ण जगभर आपल्या मालाचे वर्चस्व स्थापन केले आहे. अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया सारख्या देशात तर उत्पादक उद्योग जवळपास बंदच पडण्याच्या मार्गावर आहेत. भारतात परिस्थिती एवढी वाईट नाही. कमी किंमतीच्या उत्पादनामधे चिनी माल जास्त प्रमाणात आहे. जास्त किंमतीच्या उत्पादनात त्यांना अजून तितका शिरकाव करता आलेला नाही. त्यांचे प्रयत्न चालू आहेत. भारतीय उत्पादकांनी जर वेळीच पावले उचलली नाहीत तर त्यांचे गिर्‍हाईक चिनी मालाकडे वळल्याशिवाय रहाणार नाही. चिनी मालाच्या यशाची मला वाटणारी दोन तीन प्रमुख कारणे अशी आहेत.
१. मालाची विक्री किंमत अतिशय कमी असते. दर्जा बाजारात चालू माल म्हणतात तसा असतो.
२. बाजारात काय हवे आहे याची अचूक माहिती ते काढतात. वाय .एस रेड्डी यांचे अपघाती निधन झाल्यावर १ आठवड्यात चिनी उत्पादकांनी त्यांचे फोटो असलेली विविध उत्पादने आंध्र प्रदेशच्या बाजारात आणली होती.
३. बाजारात त्यांच्या उत्पादनांचा पूर येईल अशा संख्येने उत्पादनाची व वितरणाची क्षमता.
या सगळ्या प्रक्रियेत चिनी सरकार उत्पादकांना भरपूर मदत करते. भांडवल, कच्चा माल या सगळ्या गोष्टी चिनी उत्पादकांना स्वस्तात उपलब्ध होतात.
थोडक्यात म्हणजे एखादा रोड रोलर यावा तशी चिनी उत्पादने जगभरच्या बाजारंत येत आहेत.त्यांना अडवणे कठिण असले तरी अशक्य नाही. नुसती भावनात्मक आव्हाने करून काहीही साध्य होणार नाही. स्पर्धात्मक किंमतीत दर्जेदार उत्पादने भारतीय उत्पादकानी बनवली तर ते वाचतील नाहीत बाकीच्या देशांमधील उत्पादकांसारखीच भारतीय उत्पादकांची गत होणार आहे.
चन्द्रशेखर

माझी उत्तरे..

आपले सण जर चायनिजमय होऊ नये असे वाटत असेल तर आपल्याला ह्यासाठी काय करता येईल?

सर्व भारतीयांनी अगदी जाणीवपूर्वक ठरवून चायनीज वस्तूंवर बहिष्कार घालायला हवा. चीन आपला दुश्मन आहे, त्यांची एकही वस्तू खरेदी करायची नाही असा प्रचार होणे आवश्यक आहे. चायनीज वस्तूंची रस्तोरस्ती, गल्लोगल्ली सार्वजनिक होळी झाली पाहिजे.

आपण ग्राहकांनींच चायनिज वस्तू विकत घेतल्या नाहीतर चालणार नाहीत का?

काहीच बिघडणार नाही...

खरे तर ह्या वस्तू भारतात बिकण्यासाठी येणारच नाही ह्यावर भारत सरकार काही ठोस उपाय योजना राबवतील का?

खरं तर राबवायला हवेत. चीनला भारतासारखी एवढी मोठी बाजारपेठ उपल्ब्ध असतानादेखील चुपचाप धंदा न करता ती मंडळी मुजोरपणे भारतावर आक्रमण करू पहात आहेत, भारताच्या सीमा खात आहेत, त्यावर हक्क सांगत आहेत!

त्या मिचमिच्या डोळेवाल्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे..

आपला,
(चीनद्वेष्टा) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

बहिष्कार

जागतिकीकरणाच्या या काळात कोणतीही देश दुसर्‍या देशाच्या उत्पादनावर बंदी घालू शकत नाही. डब्ल्यू.टी.ओ. अशा गोष्टींकडे डोळ्यात तेल घालून बघत असते. शिवाय आपण अशी बंदी घातली तर दुसरे देश् आपल्या उत्पादनांवर बंदी घालू शकतात.
चन्द्रशेखर

सरकारी बंदी नव्हे

तशी सरकारी बंदी घालता येणार नाही हे जरी खरे असले तरी आयातीवर बंदी नव्हे तर - ग्राहकांनी ती उत्पादने वापरण्यावर आणि ती उत्पादने विकणार्‍या दुकानांवर बहिष्कार घालावा असे विसोबांचे म्हणणे असावे.(खरेतर) ग्राहकांनी अमुक देशाची उत्पादने खरेदी केलीच पाहिजेत असे डब्ल्युटिओ म्हणू शकणार नाही.

पण मूळा मुद्दा दुसराच आहे. त्याबद्दल वेगळा प्रतिसाद.

हो,

ग्राहकांनी ती उत्पादने वापरण्यावर आणि ती उत्पादने विकणार्‍या दुकानांवर बहिष्कार घालावा असे विसोबांचे म्हणणे असावे.

हो, मला तेच म्हणायचे आहे.

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

दर्जा

सरकारने भारतात येणार्‍या वस्तूच्या दर्जे बद्दल काही अटी घालाव्यात.

अमेरिका, युरोपमध्येज्या चायनिज् वस्तू मिळतात त्या वस्तूंचा दर्जा उत्तम असतो. त्या मानाने भारतात येणार्‍या वस्तूचा दर्जा साधारण असतो.

दिवाळीच्या २-३ दिवसा आधी माझ्या एका मैत्रिणीकडे 'लाइट'- विद्युत प्रवाह खंडीत झाला आणि घरातील, फ्रिज, टिव्ही सारख्या महाग वस्तू खराब झाल्या. विद्युत मंडळाकडे तक्रार केली तर त्यांच्या अधिकार्‍याने पाहणी केल्यावर तूमच्या घरात तूम्ही 'चायनिज' बल्ब वापरले त्यामूळे असे झाले असे सांगितले. .. दिवाळीच्या दिवसांनमधे असा फटका त्यांना ह्या चायनिज् बल्बमूळे बसला.

दिशाभूल

विद्युत मंडळाच्या अधिकार्‍याने दिशाभूल केली असे वाटते.
कुठल्याही उपकरणाचा विद्युत् प्रवाह खंडित झाला तरी असे होणार नाही.
तरीसुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनिअरांनी यावर चायनीज प्रकाश टाकावा.

नितिन थत्ते

फसवणूक

चर्चेत अवांतर असला तरी प्रतिसाद देतो.
ग्राहक न्यायालयात विद्युत महामंडळावर नुकसानभरपाईचा दावा लागू नये म्हणून दिलेली लोणकढी थाप आहे.

घरात चायनीज दिवे/ चायनीज विद्युत उपकरणे वापरल्याने फ्रीज , टीव्ही कसा जळू शकतो? याचे शास्त्रीय स्पष्टीकरण लेखी स्वरूपात त्यांनी महामंडळाकडून मागावे. (उगाच वडाची साल पिंपळाला... )
ट्रान्स्फॉर्मर (११००० वोल्ट ते ४४० वोल्ट) मधील बिघाडामुळे (प्रायमरी - सेकंडरी शॉर्ट सर्किट) असे होऊ शकते अथवा वादळवार्‍यात वीज कडाडल्यास/ तारा एकमेकांना घासल्यास इ. इ. असे होऊ शकते.

लेखी

सहमत. स्पष्टीकरण लेखी मागावे.

नितिन थत्ते

लेखी माहीती

अशी सहजासहजी लेखी माहीती देणार नाहीत ते.

माहीतीच्या अधीकाराचा वापर करावा.

...........
अजुन कच्चाच आहे

असेच वाटते

माहीतीच्या अधीकाराचा वापर करावा.

मला ही असेच वाटते. त्यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करावा.

तुमच्या मैत्रिणीच्या घराप्रमाणेच

इतर शेजारी कोणाकोणाकडे अशी आपत्ती आली आहे त्यांनाही ह्यात सहभागी करुन घेता आले तर पहा. एकगठ्ठा बर्‍याच लोकांना एकच समस्या आली असेल तर निदान 'चायनीज बल्ब'सारखे गमतीदार फसवणारे दावे वीजमंडळाचे लोक करणार नाहीत. तक्रार सर्वांनी लेखी स्वरुपात जास्तितजास्त वरिष्ठ अधिकार्‍याला सुपूर्त करा. नुकसानभरपाईसाठी अर्ज आणि पाठपुरावा करणे अतिशय जिकिरीचे असते पण त्याला इलाज नाही. आपल्याकडची व्यवस्था तशीच आहे.

चतुरंग

प्रयत्न

अजून ३-४ जणांना असा अनुभव आला आहे. त्यांनी लेखी तक्रार केली आहे. अजून त्यावर काही कार्यवाही झाली नाही.

बागुलबोवा

आंतरराष्ट्रीय व्यापार गुंतागुंतीचा आहे. चीनी वस्तुंच्या दर्जाच्या तुलनेत त्यांच्या किंमती भारतीय ग्राहकास किफायतशीर वाटत असल्यास तो चीनी वस्तुच वापरणार. यात काहीच गैर वाटत नाही. चीन सरकार किंवा कंपन्या डंपिंगसारखे कुठले गैरप्रकार करत असल्यास तक्रार करणे योग्य आहे. ग्राहकांनी चीनी वस्तु घेऊ नये असे फतवे काढणे हे अमेरिकेत आउटसोर्सिंगविरुद्ध लु डॉब्ज किंवा तत्सम लोकांनी माजवलेल्या झेनोफोबियासारखे आहे. आपल्या मताचा आदर करुन या चर्चेच्या प्रस्तावास विरोध करावासा वाटतो. भारतीय कंपन्या चीनी कंपन्यांशी स्पर्धा करण्यात अयशस्वी होत आहेत काय? यावर चर्चा करता येईल. जागतिक स्पर्धेच्या युगात भारतीय ग्राहकांना वेठीस धरणे भारतीय उत्पादकांना शक्य नाही, हा मला सर्वात महत्त्वाचा बदल वाटतो.

चीनचे अर्थकारण

चीनमध्ये केवळ तकलादू, कचकड्या,कमी दर्जाच्याच वस्तू बनतात असे मानण्याचे कारण नाही.
चीनी उत्पादनांमध्ये किंमतीप्रमाणे दर्जा आढळतो, किंमती रास्त असतात आणि अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या आपले उत्पादन (उत्पादन खर्च कमी आहे म्हणून) चीनमध्ये करतात.
अर्थकारणात एकाधिकारशाही वापरून चीनने अनेक गोष्टी साध्य केलेल्या आहेत.
१. तंत्रज्ञान हस्तांतरणाचे गुंतागुंतीचे कायदे निर्माण करून तेथे निर्माण होणार्‍या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या वस्तूंचे मूळ आराखडे स्थानिक कंपन्यांना मिळतील आणि स्वतःच्या निर्मितीसाठी वापरता येतील अशी सोय केली. त्यामुळे स्थानिक कंपन्यांचा 'संशोधन आणि विकास' यावरील खर्च वाचला आणि फुकटात नवे तंत्रज्ञान हाताला लागले.
२. मानवी हक्क गुंडाळून ठेवून उत्पादनासाठी स्वस्त कामगार मिळवले.
३. अमेरिकेसारख्या देशाच्या कर्जरोख्यात मोठी गुंतवणूक करून तेथील ग्राहकाला वस्तू खरेदीसाठी (कर्जाऊ) चलन उपलब्ध करून दिले. (उत्पादनांसाठी सोपी बाजारपेठ निर्माण केली.) याचा दोन्हीकडून फायदा - अमेरिकेच्या सरकारी कर्जरोख्यांवरील व्याज आणि उत्पादनांच्या विक्रीतून होणारा फायदा.
४. उत्पादन वाढवल्यास जास्तीचे खर्च (ओव्हरहेड्स) विभागतात. त्यामुळे कमीतकमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी नवनवीन स्वयंचलित उत्पादक यंत्रे बनवली.
५. केवळ वापरयोग्य तयार वस्तूंच्या उत्पादनावरच भर न देता त्यासाठी लागणारे उच्च तंत्रज्ञानाचे यांत्रिक सुटे भाग बनवण्यावरही भर दिला. त्यामुळे तयार वस्तूंची किंमत कमी होऊ शकली. (जसे मेम्स् टेक्नॉलॉजी वापरून बनवलेले सेन्सर्स्, वेगवेगळ्या आयसीज्)(-इथे भारताचे उलट उदाहरण आहे. अजूनही भारतात अनेक मूलभूत यांत्रिक भागांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत नाही. वापरयोग्य वस्तू बनतात. पण त्यात वापरलेले सुटे भाग आयातीत असतात.)

अशा अनेक मुद्द्यांबबत बोलता येईल.
भारतात केंद्र सरकारची मजल केवळ समित्या स्थापून वर्षानुवर्षे बैठका घेत रहाणे इथपर्यंतच गेलेली आहे. चीनच्या उत्पादनांना जर भारतीय आणि जागतिक बाजारपेठेत टक्कर द्यायची असेल तर जबरदस्त राजकीय इच्छाशक्ती आणि प्रत्यक्ष कृतीची गरज आहे.

आज आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्याही नकळत आपण चीनमध्ये उत्पादित अनेक वस्तू वापरतो ही वस्तुस्थिती आहे.
दिवाळीचे विशेष काय?

काही असहमती

१. तंत्रज्ञान हस्तांतरणाचे गुंतागुंतीचे कायदे निर्माण करून तेथे निर्माण होणार्‍या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या वस्तूंचे मूळ आराखडे स्थानिक कंपन्यांना मिळतील आणि स्वतःच्या निर्मितीसाठी वापरता येतील अशी सोय केली. त्यामुळे स्थानिक कंपन्यांचा 'संशोधन आणि विकास' यावरील खर्च वाचला आणि फुकटात नवे तंत्रज्ञान हाताला लागले.

भारतीय औषध कंपन्यांबाबत असेच म्हणता येईल असे वाटते.

२. मानवी हक्क गुंडाळून ठेवून उत्पादनासाठी स्वस्त कामगार मिळवले.

मानवी हक्कांमध्ये किमान वेतनाचे काही परिमाण नाही. स्वस्त कामगारांपेक्षा स्वेटशॉपसदृश कामाच्या जागा आणि कामाचे दीर्घ तास ही मानवी हक्क गुंडाळून ठेवल्याची उदाहरणे आहेत. भारतात असे घडतच नाही असे मला वाटत नाही.

३. अमेरिकेसारख्या देशाच्या कर्जरोख्यात मोठी गुंतवणूक करून तेथील ग्राहकाला वस्तू खरेदीसाठी (कर्जाऊ) चलन उपलब्ध करून दिले. (उत्पादनांसाठी सोपी बाजारपेठ निर्माण केली.) याचा दोन्हीकडून फायदा - अमेरिकेच्या सरकारी कर्जरोख्यांवरील व्याज आणि उत्पादनांच्या विक्रीतून होणारा फायदा.

भारतानेही अमेरिकेच्या कर्जरोख्यात गुंतवणूक केलेली आहे. चीनी चलनाचे जाणूनबुजून अवमुल्यन हे मात्र भारतीय धोरणापेक्षा थोडे वेगळे आहे. भारतातही विनिमय दर पूर्णपणे बाजारात ठरत नसल्याने (रिझर्व बँक वेळोवेळी हस्तक्षेप करते) आपले धोरण थोडेसे सैल पण फारसे वेगळे नाही.

श्री विसुनाना, एकाधिकारशाहीमुळे चीनला स्पर्धेच्या युगात यशस्वी होता येत आहे, हे फारसे पटत नाही. इतर कारणे जसे पायाभुत सुविधा यावर मात्र विचार करता येईल. दीर्घकालिन विचार करता एकाधिकारशाहीपेक्षा लोकशाही जास्त उपयुक्त ठरल्यास आश्चर्य वाटणार नाही.

काय हरकत आहे?

भारतात चीनइतकेच लोक आहेत (जवळपास). त्यांनी दिवाळी चीनमय केली तर आपण त्यांचं चीनी नव वर्ष भारतमय का नाही करू शकत?

बर्‍याच वर्षांपूर्वी जपानी गणपतींच्या मूर्ती आल्या व त्या उजव्या सोंडेच्या निघाल्यामुळे गणेशोत्सव जपानी होण्यापासून कसा वाचला ही वदंता ऐकली होती...

पण संस्कृतीच्या समारंभासाठी दुसर्‍या संस्कृतीची मदत घेणे - त्यांना कामाला लावणे व त्यांना योग्य मोबदला देऊन त्यात आपलाही फायदा करून घेणे - हे भारतीय संस्कृतीविरोधी केव्हा ठरायला लागले?

विसूनानांची एकाधिकारशाही विरुद्ध लोकशाही ही कारणं पटत नाहीत. मानवी हक्कांबाबतीत भारतात औश्ट्य - सेवे पलिकडे काय चालते?
भारत चीनच्या सुमारे दहा ते पंधरा वर्षे मागे आहे. पण ही सर्वच अंतरे कमी होणार कधी तरी, नाही का?

 
^ वर