सूर्यास्त

दिवाळीच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी हाजीअलीजवळून जात असताना हा सूर्यास्त दिसला.
पॉईंट आणि शूट कॅमे-याने प्रकाशचित्र टिपल्यामुळे चित्रात थोडी 'खसखस' (नॉईज) दिसतेय. ती साफ करताना पाण्याचे टेक्श्चर निघून गेले आहे :-(

दुसरा फोटो इथे पाहा.

ही चित्रं कॅमे-यातील vivid color mode मध्ये टिपली आहेत. तसेच, नॉईजचा प्रभाव कमी दिसण्यासाठी फोटो एडिटरमध्ये हलकासा सॉफ्ट फिल्टर इफेक्ट वापरला आहे.

कंपोझिशन, एक्सपोजर आणि इतर तांत्रीक बाबींमध्ये अजून काही त्रुटी आढळल्यास जरूर निदर्शनास आणून द्याव्यात.
धन्यवाद!

लेखनविषय: दुवे:

Comments

वा!

वेधक

वेधक!

आवडले पण..

आवडले पण चित्राच्या गोष्टीत काहितरी कमी आहे असे राहून राहून वाटते आहे. हाजिआलीचा पाढराशुभ्र दर्गा फारच चिमुकला आल्याने मजा कमी झाल्यासारखी वाटली.
बाकी तांत्रिक गोष्टीबद्दल ज्ञान इल्ले :)

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

केशरी रंगाच्या छटांची उधळण

हे चित्र फारच सुंदर आहे. दुव्यावरचे मोठे चित्र ९९% उत्तम आहे.

पण टाचणी टोचल्याइतका छोटा सूर्य (खरा असूनही) डोळ्यांना/मनाला पटत नाही. प्रत्यक्ष बघताना सूर्याचे आकारमान भौतिक (कोनीय) आकारमानापेक्षा खूपच मोठे दिसते, हा दृष्टि"भ्रम" बहुचर्चित आहे. जर "त्या सूर्यास्ताच्या वेळी आपण खुद्द तिथे आहोत" असा भास प्रेक्षकात निर्माण करायचा असेल तर सूर्याचा आकार वाढवावा लागतो, असे मी एके ठिकाणी बघितले आहे. त्याचित्रात ढग तर फारच सुंदर आहेत.

धन्यवाद

प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे आभार!

आवडले

मस्त आहे सूर्यास्त!
दुव्यावरचा सूर्यास्त नाट्यमय आभाळामुळं अजूनच आवडला..धनंजय ह्यांची सुचवणी पण छान!
अवांतरः नॉइजसाठी 'खसखस' शब्द सहीच :)

 
^ वर