चोर, डाकु तोच हिन्दू ?
असा अर्थ लोगाथ - ए - डिक्शनरी, लखनौ येथे प्रकाशित १९६४ च्या पर्शियन डिक्शनरीत आहे. असाच काहीसा अर्थ उर्दू - फिरोझ - उल - लोगाथ पान ६१५ वर देखील आहे.
मी महाजालावर एक पान शोधत होतो तेव्हा मला एक पान मिळाले. बरीच माहिती वाचायला मिळाली. सतत सतावणार्या प्रश्नांची उत्तरे सापडली. ३डब्ल्यू.स्टीफेन.नॅप.कॉम ( के एन ए पी पी ) इथेच पुढे साईट डीसक्रिपशन ह्या भागात - हिंदू नावा विषयी - असा एक लेख आहे. ह्या लेखात फार चांगली माहिती उपलब्ध आहे.
असेच दुसरे पान ३डब्ल्यू.हिन्दूनेट.ऑर्ग / हिंदू _हिस्टरि / मॉडर्न / हिंदू _कुश.एच्टीएमेल इथे अफगाणिस्थानातील हिंदुकुश पर्वताची माहिती मिळते. लाखोच्या संखेने हिंदू मारले गेले आहेत ( कतलेआम ). ह्या पानावरील माहिती वाचून माझ्या मतांना दुजोरा मिळतो, आपण आज ह्या घटकेला प्रत्यक्षात पारतंत्र्यातच आहोत.
झाइटगिस्ट दी मूव्ही माझ्या जवळ ही ७१० एम्बी ची डीव्हीडी आहे ज्यांना ही हवी असेल त्यांनी संपर्क साधावा. मो. ९९६० ६३७ ६४६. भाग एक - क्रिश्चन धर्म व इजिप्त मधील फेरोचा धर्म ह्यामधील शब्दाला शब्द साम्य असलेले सिद्ध केले आहे. तसेच श्रीकृष्ण जन्माचा व त्या घटनांचा उपयोग, साम्य प्रत्येक धर्मग्रंथातून कसा आहे हे दाखवले आहे. भाग दोन - जगातील वाणिज्य पद्धतीतून मिळवलेला ताबा तसेच पहिल्या जागतिक माहायुध्द्दा पासून रॉकरफेलो व इतर घराणी कशा प्रकारांनी जगावर ताबा, आपले नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झाले व होत आहेत, तसेच कोणते प्रयत्न करीत आहेत ते पुराव्या सहित आहे. भाग तीन - ९/११ चा अमेरिकेतील हल्ल्यातील सूत्रधार व घटनांचे पुरावे अभ्यासूंना फार महत्त्वाचे आहेत. कोणावर, केव्हा, का, कसा विश्वास असावा ह्याचे मार्गदर्शन ह्या डीव्हीडीत मिळते.
ह्यावर वाचकांनी अवश्य विचार करावा अशी विनंती मी करतो.
Comments
संस्कृती
श्री व्हीके
आपण हे पोस्ट कशासाठी लिहिले आहे किंवा यातून आपल्याला यातून काय सांगायचे आहे हे अजिबात समजले नाही.
हिंदूकुश पर्वतावर लाखोँनी हिन्दू मारले गेले याचा अर्थ आपण अजुन पारतंत्र्यात आहोत असा कसा काय होऊ शकतो? पर्शियन डिक्शनरीत हिंदूचा अर्थ काहीही दिलेला असो तुम्हा आम्हाला हिंदू म्हणजे काय हे माहिती आहे ना? मग काळजी कशाची? कृपया खुलासा करावा
चन्द्रशेखर
कॉन्स्पीरसी थिअरी
व्हीके महोदय,
अहो अश्याप्रकारचे लेखन/चित्रपट/माहितीपट ह्याला 'कॉन्स्पीरसी थिअरी' असे म्हणतात. कुठलेतरी बादरायण समंध जोडून सगळे जग कसे धोक्यात आहे अशी असुरक्षीततेची भावना सतत निर्माण करणे हे सोडून दुसरे काही ह्या प्रकारातुन निष्पन्न होत नाही.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
माझा रक्तदोष ?
माझी दोन्ही मुले परदेशात जन्मली. बायको परदेशिय. ह्याना माझे रूटस ( मूळ ) समजवणे हे मी माझे कर्तव्य समजतो. हा दोष असावा.
मराठीतील कुंडी मल्याळी भाषेत पार्श्वभाग होतो. ह्या शब्दाशी आस्था, माझे स्वत्व जोडलेले नाही. परंतु हिन्दू ह्या शब्दात माझा मी चा डोलारा उभा आहे. परदेशात त्याचा दुसर्याच अर्थाचा अनुभव मी फार जवळून भोगला आहे.
बोर्न व्हिटा क्वीझ मध्ये डेरीक ओब्रायन जॉर्ज बुशच्या कुत्र्याचे नाव इंडीया आहे हे टीव्ही वर हसत सांगू शकतो. एखादा टॉयलेटच्या बोल मध्ये देवी देवतांचे फोटो छापण्याची हींमत दाखवतो. ह्याच, स्वातंत्र्य मिळालेल्या देशातून प्रसिध्द होणार्या डिक्शनरीत हिन्दू ह्या शब्दाचा अर्थ चोर हा प्रसिध्द व्हावा. ह्यालाच पारतंत्र्य म्हणतात असे मी म्युनसिपालीटिच्या पाचवीच्या वर्गात शिकलो होतो. हा माझा रक्त दोष का ज्यांना हे समजून घ्यायचे नाही त्यांचा ? म्हणुनच की काय मी माझी दोघं मुले " नॉन् रिक्वायर्ड इंडीयन " गणले जातो.
काही महत्वाचे दुवे -
http://www.hinduwebsite.com/hinduism/h_meaning.asp
http://hinduism.about.com/od/basics/p/hinduismbasics.htm
http://www.stephen-knapp.com/
http://www.hindunet.org/hindu_history/modern/hindu_kush.html
http://www.zeitgeistmovie.com/
http://en.wikipedia.org/wiki/Zeitgeist
पारतंत्र्य
हिंदू या पर्शियन शब्दाचा पर्शियन भाषेतील अर्थ चोर असा आहे काय?
तसा असेल तर सिंधूवरून हिंदू झाले वगैरे गप्पाच म्हणाव्या लागतील.
तसा असेल तर पुढे
मराठी भाषेतील नागडा या शब्दाचा अर्थ विवस्त्र असा आहे. गुजरातमध्ये त्या नावाचे एक गाव आहे आणि त्यांच्यात तसे आडनावही असते.
उद्या गुजरातमधून प्रसिद्ध होणार्या मराठी-गुजराती किंवा मराठी- हिंदी डिक्शनरीत नागडा शब्दाचा अर्थ विवस्त्र (अशा अर्थाचा गुजराती शब्द) असा छापला असेल तर गुजराती लोक पारतंत्र्यात आहेत असे म्हणायचे काय?
स्टीफन. नॅप. कॉम ही साइट पाहून आपण पु. ना. ओकांचे लिखाण वाचत असल्याचा भास झाला.
नितिन थत्ते
अवांतर
उद्या गुजरातमधून प्रसिद्ध होणार्या मराठी-गुजराती किंवा मराठी- हिंदी डिक्शनरीत...
गुजराथीत "आई" ला "बा" म्हणतात हे समजल्यावर भाषे-भाषेतील फरकांवरून मजा वाटली होती :)
हिंदु चा अर्थ
अर्थजरा निराळा श्री.व्हीके बरोबर आहेत. श्री राजारामशास्त्री भागवतांचा पुढील उतारा मी देणारच होतो.
"हिन्दू" शब्दाचा अर्थ फारशीत गुलाम होतो. हिन्दू म्हणजे "सिन्धु(नदी वाहणारा उत्तरेकडचा मुलुख)". सिन्धु-सिन्ध व हिन्दु हे दोन्ही शब्द सिंधु शब्दापासून आहेत; इतकेच की "हिंदु" शब्द केवळ मुसलमानांनी जन्मविलेला असून त्यांच्यापासून पुढे इकडच्या लोकांनी उचललेला आहे."हिंद व हिंदु " हे शब्द सख्ख बंधु होत. दोघांसही जन्मविणारेमुसलमान होते.गझनीकर महमूद वगैरे तुर्क मंडळी पहिल्याने पेशावर किंवा या भरतखंडावर स्वारी करू लागली ती सगळी जातीने तुर्क असून फार्सी
भाषा समजणारी व दर्वारी बोलणारी होती; या हिंद पलिकडच्यांनी हिंद अलिकडचे इतके लोक
कैदी करून नेले व गुलाम करून विकले की "हिंदु" शब्द अफगाण लोकांत "गुलाम " चा वाचक होवून राहिला. हा शब्द त्यांच्यामधून रूम प्रांती म्हणजे आशिया मायनारमध्ये गेला; व इ.स. १४शतकातल्या जलालुद्दीन कवीनी तो आपल्या काव्यात दाखल करून ठेविला आहे. "हिंदुस्थान" म्हणजे "हिंदू"चे म्हणजे "मुसलमानी गुलामगिरी करणारांचे स्थान". हिंदुधर्म म्हणजे मुसलमानांची गुलामगिरी करणारांचा धर्म हिंदु, हिंदुधर्म या दोन शब्दांचे रहस्य आहे.
जर "हिंदु" शब्दच संस्कृत सारस्वतात कोठेही येत नाही तर हिंदुधर्म शब्द तरी कोठून येणार ? हिंदु शब्द इ.स.१००० पुढे जन्मलेला आहे.
लेखसंग्रह - २.
शरद
अर्थ
मग हे कोणाच्याच कसे लक्षात आले नाही? हिंदू हृदय सम्राट तात्याराव सावरकरांचे ह्यावर मत काय होते? हिंदूराष्ट्र असा शब्दप्रयोग ते करण्यामागे त्यांची भूमिका काय असावी?
तुम्ही म्हणता असे खरंच असेल तर हिंदूत्ववाद्यांनी हा शब्द त्यागणे योग्य नाही का?
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
अर्थ थोडासा निराळा
अर्थ जरा निराळा. श्री.व्हीके बरोबर आहेत. श्री राजारामशास्त्री भागवतांचा पुढील उतारा मी देणारच होतो.
"हिन्दू" शब्दाचा अर्थ फारशीत गुलाम होतो. हिन्दू म्हणजे "सिन्धु(नदी वाहणारा उत्तरेकडचा मुलुख)". सिन्धु-सिन्ध व हिन्दु हे दोन्ही शब्द सिंधु शब्दापासून आहेत; इतकेच की "हिंदु" शब्द केवळ मुसलमानांनी जन्मविलेला असून त्यांच्यापासून पुढे इकडच्या लोकांनी उचललेला आहे."हिंद व हिंदु " हे शब्द सख्ख बंधु होत. दोघांसही जन्मविणारेमुसलमान होते.गझनीकर महमूद वगैरे तुर्क मंडळी पहिल्याने पेशावर किंवा या भरतखंडावर स्वारी करू लागली ती सगळी जातीने तुर्क असून फार्सी
भाषा समजणारी व दर्वारी बोलणारी होती; या हिंद पलिकडच्यांनी हिंद अलिकडचे इतके लोक
कैदी करून नेले व गुलाम करून विकले की "हिंदु" शब्द अफगाण लोकांत "गुलाम " चा वाचक होवून राहिला. हा शब्द त्यांच्यामधून रूम प्रांती म्हणजे आशिया मायनारमध्ये गेला; व इ.स. १४शतकातल्या जलालुद्दीन कवीनी तो आपल्या काव्यात दाखल करून ठेविला आहे. "हिंदुस्थान" म्हणजे "हिंदू"चे म्हणजे "मुसलमानी गुलामगिरी करणारांचे स्थान". हिंदुधर्म म्हणजे मुसलमानांची गुलामगिरी करणारांचा धर्म हिंदु, हिंदुधर्म या दोन शब्दांचे रहस्य आहे.
जर "हिंदु" शब्दच संस्कृत सारस्वतात कोठेही येत नाही तर हिंदुधर्म शब्द तरी कोठून येणार ? हिंदु शब्द इ.स.१००० पुढे
जन्मलेला आहे.
लेखसंग्रह - २.
शरद
शरद म्हणतात तसा अर्थ असेल तर
मराठी- इंग्रजी असा कुठलाही शब्दकोष घेतला तर त्यात "लांडा" या शब्दाचा अर्थ insufficient in length असा दिलेला असेल. जर परिपूर्ण शब्दकोष असेल तर या अर्थाबरोबरच 'a slang term used to refer to a man of ....... असाही दिलेला असेल. हा शब्द मराठी माणसे हीनत्वदर्शक उल्लेख करण्यासाठी वापरतात.
तो तसा शब्दकोषात लिहिला असेल तर त्याचा संदर्भ देऊन उत्तरप्रदेशातील किंवा औरंगाबादेतील/अहमदनगरातील कोणा मनुष्याने महाराष्ट्रात आपल्याबद्दल काय बोलतात पहा असे म्हणून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करावा तसे काहीसे प्रस्तावकाचे लेखन वाटते.
(असेच सरदार या शब्दाबद्दलही म्हणता येईल)
नितिन थत्ते