उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
वास्तूचित्र
अभिजा
October 7, 2009 - 6:59 am
मुंबईतील वांद्रे उपनगरात हे प्रसिद्ध माऊट मेरी चर्च वसलेलं आहे. १९व्या शतकात मदर मेरीच्या सन्मानार्थ हे रोमन कॅथॉलिक शैलीतील चर्च बांधण्यात आले.
चित्रातील दिसणारा क्रॉस आणि चर्च यांमधून एक रस्ता जातो. चित्राला डेप्थ मिळावी म्हणून क्रॉस फोरग्राऊंडमध्ये घेतला आहे. मूळ चित्रात चर्च समोरून आडव्या-तिडव्या जाणा-या केबल्स आहेत, त्या आकाशाच्या पार्श्वभूमीवरील केबल्स फोटो एडिटरच्या सहाय्याने खोडून टाकल्या आहेत. चर्चच्या पार्शभूमीवरील केबल्स तश्याच ठेवल्या आहेत. तसेच, कृष्ण-धवल रूपांतरणही संगणकातच केले आहे.
सदर चित्र निकॉन एफएम फिल्म कॅमेरा आणि २४ एमएम लेन्स वापरून टिपलेलं आहे. फुजीकलर १०० एएसए फिल्म वापरली. लेन्सवर लिनीयर पोलॅरायझर फिल्टर वापरल्यामुळे आकाश निळंशार दिसतय.
धन्यवाद!
दुवे:
Comments
ज ह ब ह रा
ज ह ब ह रा चित्र!!
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मस्त!
मस्त चित्र अभिजा! चर्चची इमारत आणि क्रॉस मस्त आहे.
किस्टोन इफेक्ट बराच आला आहे, त्यामूळे उजवीकडचा मनोरा चर्चवर झुकतो आहे (पिसाच्या कलत्या मनोर्या सारखा) असा आभास निर्माण झाला आहे. माझ्या माहितीप्रमाणे फोटोशॉपमधे क्रॉप मधील पर्स्पेक्टीव हे फंक्शन वापरुन ते सुधारता येते.
डिस्टॉर्शन
धन्यवाद कोलबेर! :-)
डिस्टॉर्शन हे वाईड अँगल लेन्स वरच्या बाजूला टिल्ट करून, अगदी जवळून फोटो काढल्यामुळे आले आहे. पण खरं सांगायचं तर मला तो इफेक्ट आवडतो. अर्थात, ही माझी वैयक्तिक आवड आहे. पर्स्पेक्टिव्ह कन्ट्रोल लेन्स (PC Lens) वापरून सम प्रतलात फोटो नक्की काढता येईल. तसेच, फोटोशॉपमध्ये लेन्स करेक्शन फिल्टर वापरूनसुद्धा ते काम करता येईल. पण त्यासाठी फोटो काढतानाच थोडे अधिक मार्जिन ठेवावे लागेल.
माझ्या अनुदिनीवर मुद्दाम डिस्टॉर्टेड ठेवलेल्या अजून काही इमेजेस इथे किंवा इथे पाहाता येतील.
सुरेख
सुरेख चित्र. मला किस्टोन इफेक्ट थोडा कमी असता तर अधिक आवडले असते. उदा. दुव्यातील ट्वाइलाइट सागात जसा आला आहे तसा. अर्थात ही वैयक्तिक आवड आहे. चित्र क्लासच आहे.
---
सुरेख
सुरेख चर्च. क्रॉस जणू काही रक्षणकर्ता असल्यासारखा वाटतो आहे.
समोरच्या भागातील लहानसे कापडी छत आले नसते तर अधिक आवडले असते. ते असल्यामुळे शहरात असल्याचे कळते आहे, नसते तर निव्वळ चर्च आणि क्रॉस अधिक चांगला दिसला असता असे वाटते. पण बहुदा चित्र अशा ठिकाणी आडवे कातरलेले चांगले दिसणार नाहीच.
धन्यवाद!
प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार!
चित्रा, तुमचे मत ग्राह्य आहे. खरच त्या टपरीचे छत चित्रामध्ये अस्थानी वाटतय. पण काही इलाज नव्हता. तेवढे येणारच होते.
उत्तम प्रयोग
अग्रभूमी (फोरग्राउंड) मधल्या क्रुसाचा पहिल्या चित्रामध्ये निळ्या आभाळाशी ठळकपणा (कॉन्ट्रास्ट) चांगला आहे. तो कृष्णधवल चित्रात तितका उठून दिसत नाही. पण कृष्णधवल चित्रात वास्तूचे वीटकाम अधिक खुलून दिसते.
मला स्वतःला किरणध्रुवक (पोलरायझर) अर्धाच फिरवून आकाशाचा निळा रंग थोडा गडद केलेला आवडतो. ग्रीटिंग कार्ड कंपन्यांनी या अतिगडद ध्रुवितकिरण निळ्याला फारच स्वस्त केलेले आहे. पण पसंद अपनी अपनी.
किरणध्रुवक वापरताना आणखी एक लक्ष द्यावे लागते - परावर्तक अशा सर्व वस्तूंमध्ये बदल होतात. वास्तूवरील काचेच्या खिडक्या किरणांच्या ध्रुवीकरणामुळे वेगळ्या दिसत असाव्यात असा माझा कयास आहे. खिडक्या रंगीत चित्रापेक्षा कृष्णधवल चित्रात अधिक सौम्य वाटतात - त्यांची निळी चकचक निघून गेल्यामुळे.
चित्रे मस्तच आहेत, हे पुन्हा.
किरणध्रुवक
धनंजय, तुम्ही आणि कोलबेरनी फार छान निरिक्षण केलय. मी पोलरायझर पूर्ण क्षमतेनं वापरला, त्यामुळे आकाश गडद निळं झालय. खिडक्यांची तकाकी मूळ चित्रातच गायब आहे. :-( स्कॅन केल्यावर एडिटरमध्ये डस्ट/नॉईज काढताना तसे झाले. पण थेट प्रिंट घेतली तर तकाकी छान दिसते. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
बापरे....
चित्र अतिशयच सुंदर आले आहे. भयंकर आवडले.
तुमच्याकडून खूप काही शिकता येईल असे वाटते. हे वाक्य उपक्रमावर माहितीप्रद लेख लिहायला घ्या असे वाचावे :-)
शुभेच्छा आणि आणखी काही चित्रे पहायला आवडतील......
-सौरभ.
==================
एकदम बरोबर्
तुमच्याकडून खूप काही शिकता येईल असे वाटते. हे वाक्य उपक्रमावर माहितीप्रद लेख लिहायला घ्या असे वाचावे :-)
एकदम बरोबर आहे सौरभदा... बायदवे... दिवाळी अंकात काही आहे का तुमच्या कडून?
दिवाळी अंक
धन्यवाद, चाणक्य! दिवाळी अंकासाठी प्रकाशचित्र पाठवलं आहे. :-)
आभार
प्रतिक्रियेबद्दल सर्वांचे आभार! :-)
वाहवा!
उत्तम छायाचित्र. तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. तुम्ही यावर जर एक लेखमाला लिहू शकलात तर बहुत बहुत उत्तम होईल्.
-- येडा बांटू
छान.. फारच छान!
वा! छान!
पहिला फोटो फारच छान!
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव