छायाचित्रः नामदेव आणि टायगर

नामदेव आणि टायगर.

नामदेव त्यचं नवं पिल्लू दाखवायला घरी आला तेव्हा पिल्लू कुडकुडत होतं. पिलाला गुंडाळायला फडकं देताना ते काँबिनेशन इतकं छान दिसलं की म्हटलं फोटो काढावा. पिल्लू आणखी चुळबुळायच्या आत नामदेवला घरभर फिरवून, मागे कमीत कमी अनावश्यक गोष्टी दिसतील असा कोपरा निवडला (तरी डावीकडे खिडकीचा कठडा आणि मागे वेताची खुर्ची आलीच). नामदेवचे पिंगट डोळे दिसावेत म्हणून त्याच्या बाजूने प्रकाश घेतला. त्याच्या ओठांवरचे "फोटोसाठी पोज देणारे" भाव जात नव्हते म्हणून शेवटी पिलाला जरा वर उचलायला लावून ओठ पूर्णपणे झाकून टाकले. या धावपळीत फोकस त्याच्यावरून हलून पिलावर आला.

मला या फोटोत सर्वात आवडलेला भाग म्हणजे पिलाला कवटाळणारा नामदेवचा हात, आणि पिलाचे निश्चिंत भाव.

- कोंबडी

लेखनविषय: दुवे:

Comments

सुरेख

चित्र आवडले. नामदेवचे डोळेच सर्व काही बोलून जातात. सुरेख.

---
"बोले तो.. जंगल मे मंगल और अंधेरी मे दंगल. क्या?"--- पैचान कोन?

चांगला

फोटो चांगला आहे. अहो, पण हे तर कुत्र्याचे पिल्लू वाटते आहे. नामदेवाचे नाही. :)
बाकी तज्ञ लोक काय म्हणाताय या बद्दल उत्सुक आहे.






फारच छान

आणि चित्राखाली लिहिलेला परिच्छेद उत्तम.
(उपक्रमाच्या धोरणात बसण्यासाठी चित्राचा आस्वाद हवा. चित्राखाली एक्झिफ माहितीबरोबर अशीच माहिती सर्वच चित्रकारांनी दिल्यास उत्तम होईल.)
@चाणक्य : माणसाचे पिल्लू!

सुंदर चित्र

सुंदर चित्र. चित्राचा विषय त्याची मांडणी आणि आस्वाद सगळेच खूप आवडले.

सुचवणी आहे ती निव्वळ तांत्रिक बाजूवरती. फोटोचा फोकस किंचीत गंडला आहे. तो नामदेवच्या हातावर न ठेवता डोळ्यावर ठेवला असतातर चित्र अजून परिणामकारक झाले असते (पाहा हातावरील बारकावे आणि डोळ्यांच्या बाजूचे).

या धावपळीत फोकस त्याच्यावरून हलून पिलावर आला.

हे गडबडीत वाचलेच नाही :)

दुसरी गोष्ट म्हणजे प्रकाश योजना. खिडकीचा वापर बाजूने प्रकाश येण्यासाठी केलेला असला तरी फारच प्रखर प्रकाश आला आहे. एखादा पातल पडदा वापरुन हा लाईट डीफ्यूज केला असता परफेक्ट एक्सोपजर झाले असते असे वाटते.

छान

छान आहेत टायगर आणि नामदेव. टायगरच्या पांघरूणाला सोयराबाईंचे केस चिकटलेले दिसतायत. टायगरची ताई म्हणून तिचाही फोटो टाकायचा.

बरोब्बर...

सोयराबाईंचे केस चिकटलेले दिसताहेत हे मात्र खरे आहे. मी विचार करत होतोच की हा टायगर तर आहे काळोबा आणि हे एवढे पांढरे केस आले कुठून?
पण सोयरा टायगरची आई की ताई? छायाचित्राला जसा प्रकाश लागतो तसा यावरही जरा प्रकाश टाकावा.

असो. छायाचित्राला त्या काळोबाकुमार आणि नामदेवाचा इतका निरागस आणि कोमल टच आहे की तांत्रिक गोष्टी बघायलाही नकोत.

-सौरभ.

==================

ताईच

टायगरची ताईच.
काळोबाकुमार नाव कानाला गोड लागते आहे.

मस्तच!

नामदेवाचे डोळे अतिशय बोलके आहेत! निष्पाप जिवाच्या कडेवर आश्वस्तपणे विसावलेला दुसरा एक जीव! वा. फारच छान.
फोटोसोबतची टिप्पणीही खासच. फोटोमागचा विचार समजल्याने फोटोची खुमारी वाढली! :)
(कोलबेरशी सहमत प्रकाश किंचित् कमी हवा होता.)

चतुरंग

लै भारी!

वा! लै भारी फोटु
नामदेवाच्या डोळ्यातील भाव तर लै म्हणजे लैच भारी
अजून येऊ द्यात

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

प्रकाशाबाबत किंचित असहमत

माझ्या मते चित्रात उजेडाचा खूप अधिक फरक वेगवेगळ्या भावना जागृत करू शकतो. हे हवे असल्यास अशी अतिरेकी छायातेजी (कॉन्ट्रास्ट असलेली) प्रकाशयोजना मुद्दामून केली पाहिजे. पण हा प्रकार कृष्णधवलमध्ये अधिक खुलून दिसतो:

इथे मुद्दामून छायातेजी (कॉन्ट्रास्ट) कमी केली आहे. थोडासा मुलायम (सॉफ्ट फोकस) परिणाम साधला जातो आहे :

हे आणखी वेगळ्या प्रकारे (अगदी काळ्याजवळ [कुत्र्याचे केस] आणि अगदी पांढर्‍याजवळ [मुलाचा उजवा गाल] छायातेजी वाढवली आहे, पण मधल्या सावल्यांत छायातेजी कमी केली आहे, त्यामुळे कमाल आणि किमान काळा-पांढरा रंग आधीइतकाच आहे.) :

इथे तर चक्क छायातेजी खूप अधिक वाढवली आहे. इथे चेहर्‍यावरची भावना थोडी अस्वस्थ होते आहे. कथावस्तू बदलली आहे. मुलाने पिलाला धगधगणार्‍या उन्हातून वाचवले आहे, खरे. पण हे टिकेल की नाही याची अशाश्वती त्याच्या एकच पाणीदार डोळ्यात दिसत आहे. (या प्रकारचे तंत्र फिल्म न्वार मध्ये वापरतात आणि साध्यासुध्या प्रसंगात नाट्यमय गूढता, अस्वस्थता आणतात.)

खरे तर मूळ चित्र रंगीत का ते मला पूर्ण पटलेच नाही आहे. त्यात एकच लालसर-पिवळ्या (भगवा?) रंगाचे साम्राज्य आहे - पण हा रंग खूपच उष्ण वाटतो आहे. निरागसता, बाहेरच्या भगभगीतून पिलाला झाकणारी छायेची पाखर/पांघरूण, असा काही भाव चित्रात आहे, त्याविरुद्ध हा उष्ण रंग जातो. मुलाच्या कांतीवर हा रंग परावर्तित झाल्यामुळे मुलाचा चेहरा हळदलेला दिसतो आहे.

(हे सर्व जर कथावस्तूला पोषक असते, तर उत्तम - पण शांत निरागस कथावस्तूला हे धक्का देते. किंवा कुठलातरी विरोधाभास, ही कथावस्तू असती, तरी या प्रकारचा रंग-विरोध योग्य होता. पण तशी विरोधाभासी कथावस्तू या चित्रात मला भावत नाही आहे.)

हे चित्र कृष्णधवल असावे असे मला वाटते.

मस्तच

फोटो आणि वर्णन - दोन्ही एकदम मस्त!

सुरेख

मस्त आलाय फोटो...
नामदेवचे बोलके डोळे आणि त्याच्या कुशीत आश्वस्त झोपलेला टायगर, दोघंही छान साधले आहेत.

चांगलाच अपेक्षाभंग

नामदेव ढसाळ (पँथर) आणि शिवसेना (टायगर) ह्यांच्यातील संबंधांवर एखादा लेख असणार म्हणून आत शिरलो तर बघतो काय....
चित्र छानच आहे हं...

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

छान

फोटू आवडला.

छान

फोटू आवडला.

धन्यवाद

सगळ्या प्रतिसादांबाबत धन्यवाद.

धनंजयराव, आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार. डावीकडून प्रकाश जास्त आहे हे मान्य. तुमच्या तीन चित्रांपैकी मला मधलं जास्त आवडलं. मीही पिकासात हे छायाचित्र कृष्णधवल करून आणि काँट्रास्ट शी खेळून पाहिले होतं, पण तरी शेवटी मला ते रंगीतच ठेवावंसं वाटलं.

होय. पांढरे केस सोयराचेच आहेत. पिलाला सोयराच्या वासाने जरा अधिक आश्वस्त वाटावं हा उद्देश होता.

चित्राताई, ओळखल्याबद्दल तुम्हाला मार्क मिळणार नाहीत, कारण तुमच्यासाठी "पेपर फुटला होता". किंबहुना, "याला सोयराशिवाय दुसरं काही सुचत नाही का?" असं लोकांना वाटू नये म्हणून तिचा उल्लेख आवर्जून टाळला होता - तो तुम्ही केलात, म्हणून तुमचा एक मार्क कापत आहे :) !

- कोंबडी.

वजा एक

"पेपर फुटला" पेक्षा पेपरात परिक्षक खूष होतील असे वाटून मुद्दाम निर्देश केला होता :)
पण फोटो खरेच छान आणि लक्षात राहील असा आहे.

अजून एक मार्क कापा.....

वर चित्रा यांनी म्हटले आहे की सोयरा टायगरची ताईच आणि आता कोंबडी लिहतात पिलाला सोयराच्या वासाने आश्वस्त वाटावे म्हणूनच कापडात ठेवले होते.

अजून प्रकाश टाकण्याची गरज आहे. :-)

-सौरभ.

==================

बहुतेक

यावरून बोलण्याचा अधिकार कोंबडी यांचाच आहे.
पण मार्क कापला म्हणून लिहावे लागते आहे - आमच्या विधानाचा उगम हा, सोयरा माझ्या मैत्रिणीचे "दुसरे" पिल्लू आहे, त्यामुळे "असे" काही असते तर एव्हाना नक्कीच कळले असते, या विश्वासामध्ये आहे. आणि दुसरे म्हणजे वरील पिल्लू नामदेवांचे आहे असे कोंबडी यांनी म्हटले आहेच. :)
असो. आता असे सर्व उघडकीला आणल्याबद्दल अजून मार्क नका कापू.

खुलासा

सोयराबाईंना पिले नाहीत आणि होणारही नाहीत. शस्त्रक्रिया झालेली आहे :(

टायगर (नामदेवच्या भाषेत टायगल) लॅब्रॅडॉर जातीचा नाही. सोयरा लॅब्रॅडॉर आहे.

टायगरला शांत करण्यासाठी कुत्र्याचा वास असलेलं फडकं वापरलं, इतकंच.

- कोंबडी

धन्यु...

आता सगळे स्पष्ट झाले.

==================

सुंदर चित्र

सुंदर चित्र. अतिशय आवडलं..

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

 
^ वर