उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
तर्कक्रीडा:७३:विधानसभा उमेवारांचे चारित्र्य
यनावाला
October 4, 2009 - 4:11 pm
तर्कक्रीडा:७३
महाराष्ट्रविधानसभेच्या २८८ जागांसाठी तीन हजारांवर उमेदवार उभे आहेत.त्यांतील प्रातिनिधिक अशा १२०(एकशेवीस) उमेदवारांची सांगोपांग माहिती एका अभ्यास संस्थेने मिळवली. त्या महितीचे पूर्ण विश्लेषण करून अनेक संख्याशास्त्रीय निष्कर्ष काढले.त्यांतील दोन पुढील प्रमाणे:
१) या एकशे वीस उमेदवारांत किमान सहाजण तरी सज्जन म्हणजे शुद्ध चारित्र्याचे आहेत.
२) या एकशे वीस उमेदवारांतील कोणतेही दहा उमेदवार घेतले तर त्यांत
२) या एकशे वीस उमेदवारांतील कोणतेही दहा उमेदवार घेतले तर त्यांत
किमान चारजण तरी दुर्जन म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत.
वरील दोन्ही विधाने सत्य आहेत.
तर या एकशे वीस उमेदवारांत दुर्जन उमेदवारांची टक्केवारी किती आहे?
(कृपया उत्तर व्यनि. ने)
दुवे:
Comments
तर्कः७३:व्य. नि. उत्तरे १,२
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.अक्षय आणि श्री. कर्क यांनी कोड्याची अचूक उत्तरे पाठविली आहेत. उत्तर एकमेव आहे.
"कोडे सोपे आहे." असे श्री.अक्षय यांनी म्हटले आहे, ते योग्यच आहे.
व्य. नि.उत्तरः३
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आजानुकर्ण यांनी कळविलेले उत्तर अचूक आहे. या आकडेवारी विषयी त्यांनी चिंता व्यक्त केली आहे !!.
व्य. नि. उत्तरः४
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या एकशेवीस(१२०) जणांत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची नेमकी संख्या किती ते श्री. धनंजय यांनी अचूकपणे शोधले आहे.सहज पटावे असे विवेचनही लिहिले आहे.
काहीही
सहाजण तरी सज्जन म्हणजे शुद्ध चारित्र्याचे आहेत हेच खरं वाटत नाही.
काहीही
सहाजण तरी सज्जन म्हणजे शुद्ध चारित्र्याचे आहेत हेच खरं वाटत नाही.
व्य. नि. उत्तर:५:
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.भाऊराव यांनी दुर्जन उमेदवारांची टक्केवारी बरोबर काढली आहे.मात्र काही कारणमीमांसा दिली नाही. तशी त्यांना आवश्यकता वाटली नाही ते ठीकच आहे.कोड्यात विचारलेही नव्हते.
व्य. नि. उत्तरः६
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.पर्स्पेक्टिव यांनी उत्तर पाठविले आहे. त्यांत ते लिहितातः''तर्कात, उत्तरात किंवा आणखी कशातही काही चूक निघाल्यास कृपया जाहीर खरडावे. कृपया व्यनि अथवा खरडीने पोच देऊ नये."
श्री.पर्स्पेक्टिव यांचे उत्तर अचूक आहे. तर्क परिपूर्ण आहे. कुठे काहीही त्रुटी नाही.
व्य. नि.उत्तरे:७ आणि ८
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.चिनार आणि श्री.अडाणी यांचे व्य्. नि. आले. दोघांचीही उत्तरे बरोबर आहेत. तर्क लिहिला नाही. पण तो चालवलाच असणार.अन्यथा बरोबर उत्तर येणे शक्य नाही.
व्य. नि. उत्तरे: ९ आणि १०
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.अमित कुलकर्णी आणि श्री.सौरभदा यांनी उत्तरे कळवली आहेत.प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला आहे. मात्र दोघांनीही दुर्जन उमेदवारांची टक्केवारी अचूक शोधली आहे. धन्यवाद!
तर्कक्रीडा:७३:विधानसभा उमेदवारांचे चारित्र्यः उत्तर
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्याचे श्री.पर्स्पेक्टिव यांचे उत्तर पुढील प्रमाणे:
प्रेषक: पर्स्पेक्टिव
प्रति: यनावाला
विषय: उ: तर्कक्रीडा:७३:विधानसभा उमेवारांचे चारित्र्य
दिनांक: सोम, 10/05/2009 - 21:43
गृहीतक १) या एकशे वीस उमेदवारांत किमान सहाजण तरी सज्जन म्हणजे शुद्ध चारित्र्याचे आहेत.
पैकी कोणते तरी सहा सज्जन (सज्जन क्र. १ ते सज्जन क्र. ६) पुढील प्रयोगांसाठी निवडू. या सहाजणांव्यतिरिक्त त्या एकशेवीस जणांमध्ये इतर सज्जन आहेत किंवा नाहीत, आणि असल्यास किती, ते शोधावयाचे आहे.
गृहीतक २) या एकशे वीस उमेदवारांतील कोणतेही दहा उमेदवार घेतले तर त्यांत किमान चारजण तरी दुर्जन म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आहेत.
वर्स्ट केस सिनॅरियोचा अभ्यास केल्यास, वरील सहा पूर्वनिर्वाचित सज्जन अंतर्भूत असलेला कोणताही दहा जणांचा गट घेतल्यास उर्वरित चार जण कोणीही निवडले, तरी या गृहीतकास धरून ते चारही जण दुर्जन असणे प्राप्त आहे.
अर्थात, वरील सहा सज्जन वगळल्यास या एकशेवीस जणांत आणखी सज्जन सापडणे अशक्य. म्हणजेच या एकशेविसांपैकी दुर्जनांची संख्या एकशेचौदा.
अर्थातच, या एकशेविसाच्या गटात दुर्जनांची टक्केवारी पंचाण्णव टक्के.
अवांतर: एकशेविसांच्या निवडक प्रातिनिधिक गटात निदान पाच टक्के तरी सज्जन सापडले हे चित्र आशादायी मानावे काय? की 'प्रातिनिधिक' गट निवडणारी व्यक्ती ही शितावरून भाताच्या परीक्षेने निष्कर्षाच्या सरसकटीकरणाला विरोध असणारी 'पर्स्पेक्टिव'पंथी असून, उलटपक्षी 'फोले पाखडिता तुम्ही, निवडतो ते सत्त्व आम्ही निके' हे आपले आवडते (केशवसुतप्रणित) तत्त्व पुढे दामटण्यासाठी ते सहा सज्जन उमेदवार त्या (निवडकर्त्या) व्यक्तीने या एकशेविसांत मुद्दाम पेरले असावेत असा निष्कर्ष यावरून काढता यावा?
...................................................
सर्व आकडेवारी काल्पनिकच आहे,पण ती वास्तवाहून फारशी भिन्न नसावी.....यनावाला
तरकः७३: आणखी एक उत्तर्
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या कोड्यावर श्री.अमित कुलकर्णी यांनी केलेला विचार असा:
प्रेषक: अमित.कुलकर्णी
प्रति: यनावाला
विषय: विधानसभा उमेवारांचे चारित्र्य - ९५% दुर्जन
दिनांक: मंगळ, 10/06/2009 - 14:43
सज्जनांची संख्या कमीत कमी ६ आहे असे दिले आहे.
समजा ती ७ असेल तर १० उमेदवारांचा १ गट असा करता येईल की ज्यात ७ सज्जन आणि ३ दुर्जन आहेत. म्हणजे कोड्यातले दुसरे विधान खोटे ठरते.
म्हणून सज्जन उमेदवारांची संख्या ६ पेक्षा जास्त असू शकत नाही.
(वास्तवात हा आकडा ० असावा असे वाटते)
(तसेच सज्जन उमेदवारांची संख्या ६ पेक्षा कमीही असू शकत नाही असे दिल्यामुळे) सज्जन उमेदवारांची संख्या = ६ आणि दुर्जन उमेदवारांची संख्या = १२० - ६ = ११४ (९५%) आहे.