बिकानेर चा राजवाडा
काही दिवसांपूर्वी बिकानेरला गेलो होतो. तिथल्या राजवाड्याची ही छायाचित्र.
संपूर्ण राजवाडा पाहायला किमान दोन तास तरी लागतात. जर भेट द्यायची झाली तर सकाळची वेळ चांगली (संध्याकाळी गाइड लोक पळवतात, त्यामुळ नीट बघता येत नाही आणि त्यांच्याकडून फार माहीतीची देखील अपेक्षा नको.)
छायाचित्र जरा गडबडीत काढली आहेत त्यामुळ यथातथाच आहेत पण तरी त्यावरून राजवाड्याच्या वैभवाची कल्पना यावी.
__________________________________________________________________________________________________

ह्यातली प्रत्येक खीडकी एकेका राणीसाठी होती. (५१ - ५२ खिडक्या आहेत)

ह्या पात्यांवरती कलाकार नाच करत असत.
__________________________________________________________________________________________________
Comments
धन्यवाद
धन्यवाद सातारकर.
डकवलेली छायाचित्रे चांगली आहेत. माहि मरातिब आणी कलाकार नाचायचे ते पाते याबद्दल अजुन माहिती आली असती तर लेख अजुन चांगला झाला असता.
छान
फोटू. गरीब जनतेची पिळवणूक करून चांगलाच भव्य राजवाडा बांधला की.
बिकानेर चा राजवाडा....
बिकानेर चा राजवाडा
फोटो छान आलेत, वास्तू भव्य , कलाकुसरही सुन्दर. आपल्या भारतातील वास्तुकलेचा प्रेक्षणीय नमुना म्हणून बघाल तर छान आहे. महाराष्ट्रातील ऐतिहसिक वास्तुंच्या वाईट अवस्थेबद्द्ल एका परप्रान्तीय मित्राने विचारले होते.त्याला मी सांगीतले, राणाप्रताप/छत्रसाल सारखे अपवाद वगळले तर राजस्थान माळव्यातील राजे मुगलांचे मांडलीक झाले, माझ्या महाराष्ट्रात मात्र शिवरायांची प्रेरणा/ महानता अशी कि शिवाजी महाराजां नंतरही मराठे लढत आपल्या स्वराज्यासाठी लढत राहिले. साहजिकच लढायांमधे वास्तूंचा विध्वंस झाला. आणि नंतरच्या काळात आमची अनास्था!!
(मनात पूजिन रायगडा... असे म्हणणारे..)
उंटावरचे शहाणे.
शनिवार वाडा
शनिवार वाडा काही टीकला नाही. कुठल्या लढाईत विध्वंस झाला याची काही माहिती आहे का?
शिवरायांची प्रेरणा/ महानतेबद्दल एकमत. त्यानंतरच्या मराठ्यांच्या इतिहासाविषयी असहमत. लढले काही काळ पण नंतर मांडलिकत्व पत्करलेच.
शनिवार वाडा
सुंदर महाल आहेत. प्रियालीसारखेच प्रश्न मलाही पडले आहेत.
शनिवारवाड्याबद्दल विकीवर लिहीलेलं आहे की बांधल्यानंतर जवळजवळ १०० वर्षांनी तिथे प्रचंड आग लागली. ही आग विझवायला १५ दिवस लागले. या आगीमधे एकेकाळी असलेली सातमजली इमारत आता आहे तेवढीच उरली.
अदिती
पुढच्या वेळेस...
@ आनंदयात्री,
ह्या वेळेस वेळ कमी असल्याकारणाने आणि उपलब्ध वेळात गाइड न माहीती नीट न दिल्यान जास्त माहीती आत्ता माझ्याकडे नाही. पण परत जाणेचे आहे तेंव्हा नक्की.
@ शहाणे
ऐतिहासिक वास्तूंबद्दलची उदासिनता ही बहुधा भारतीय समाजाच्या व्यक्तीमत्वाचा भाग असावी (अपवाद दक्षिणेचा). राजस्थानात परिस्थीती महाराष्ट्रापेक्षा वेगळी असावी असा माझा समज होता. पण असं काही नाही, याबाबतीत हम सब एक है. इथे आतमध्ये तर संगमरवरावरती पान खाउन रंगरंगोटी केली आहे. गाइड लोक आपण परिक्षेला अभ्यास करतो तशा पद्धतीन पाठ केलेली माहीती देतात, देशी पर्यटकांना.
राजपूतांची मात्रूभाषा (हे कस लिहायच?) इंग्रजी होती की काय अशी शंका यावी इतका हिंदीला फाटा दिलेला आहे.
आता इंग्रजांना आपला इतिहास कळावा म्हणून इतक्या कळकळीन प्रयत्न केल्यावर ५०० वर्षांनंतरच्या पुस्तकातले देशी इतिहास सिद्ध करण्यासाठीचे पुरावे पुन्हा इंग्रजी असल्यावर आश्चर्य वाटायला नको.
असो, महाराष्ट्राबाहेर थोडस फिरल्यावर आता मला अस वाटायला लागल आहे की आपल्याला एकमेकांच्या प्रांताविषयीच्या इतिहासाची अजिबात माहीती नाही.
_____________________________________________________________________________________
सुतो वा सूतपुत्रोवा यो वा को वा भवाम्यहम् |
दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरूषम्॥
भव्य दिव्य!
भव्य दिव्य!
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
छान
चित्रे पाहून राजवाड्याच्या भव्यतेची कल्पना येते. ऐतिहासिक वास्तूंबद्दल अनास्था आपल्याकडे सर्वत्रच आहे. पर्यटन अर्थार्जनाचा एक मोठा मार्ग असू शकतो हे आपल्या शासनाला कळले नसावे किंवा वळले नसावे. पाश्चिमात्य देश पर्यंटनावर धो-धो पैसे कमावत असताना आपण त्याकडे इतके दुर्लक्ष का करावे कळत नाही.
---
"बोले तो.. जंगल मे मंगल और अंधेरी मे दंगल. क्या?"--- पैचान कोन?
माहि मरातिब
राजवाड्याचे फोटो आवडले. एवढा मोठा राजवाडा साफ करायला किती वेळ लागत असावा आणि किती नोकर लागत असावे आणि छतांवरची कोळीष्टके कशी साफ केली जात असावीत असे प्रश्नही पडले.
माहि मरातिबचे फोटो काही दिसले नाहीत परंतु माहिती रोचक आहे. मुसलमानी पद्धतीतही राशींची चिन्हे (का मूर्ती?) वापरली जात याविषयी विशेष माहिती नव्हती.
भव्य
छायाचित्रांवरून महाल भव्य वाटला
मात्र फोटुंबरोबर अधिक माहिती असती तर जास्त मजा आलली असती
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव