तर्कक्रीडा:७०:कळीचा प्रश्न

तर्क.७०: कळीचा प्रश्न.
"हा पहा.या खोलीत हा टेबलदिवा आहे.त्याला बल्ब आहे."
"बटण चालू आहे.पण दिवा पेटलेला दिसत नाही. बल्ब गेला आहे की काय?"
"नाही.त्याची आणखी एक कळ( बटण) आहे. ती तुम्हाला शोधायची आहे."
"खोलीतच आहे काय?"
"नाही. दाराच्या बाहेर क्रमांक १, २ आणि ३ अशी तीन बटणे आहेत.त्यांतील एक या दिव्याचे आहे.आता तुम्ही बाहेर जायचे.मी दार लावून घेईन.बाहेरच्या तीन बटणांतील कोणतीही बटणे बंद,चालू काय ते करायचे.दिवा लागला आहे की नाही हे तुम्हाला बाहेर समजणार नाही. "
"बरे पुढे? कोडे काय आहे?"
"तुमचे बटणांशी खेळून झाले की मग पुन्हा त्यांना हात लावायचा नाही.कडी वाजवायची. आत आल्यावर काय ते निरी़क्षण करायचे.आणि या दिव्यासाठी बटण क्रमांक किती ते नेमके सांगायचे.मी इथे दिव्याला हात लावणार नाही."
"बरे. थोडा विचार करतो."
...तुमचा विचार करून झाला असेल तर तो व्य.नि.ने कळवावा.
(कोडे नवीन नाही.अनेकांना ठाऊक असण्याची शक्यता आहे.)

लेखनविषय: दुवे:

Comments

तर्क.:७०:व्यनि. उत्तर १

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
सर्वप्रथम श्री.धनंजय यांनी या कोड्याचे अचूक उत्तर कळविले आहे.धन्यवाद!

व्यनि उत्तरः२

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
टेबल दिव्याचे बटण कोणते ते शोधण्यात स्मिता या यशस्वी ठरल्या आहेत. अभिनंदन!

तर्क.७०.व्यनि. ३,४

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.कर्क तसेच श्री. आजानुकर्ण यांनी या कोड्याची अचूक उत्तरे कळविली आहेत.

व्यनि.उत्तरे ४,५

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.चतुरंग आणि श्री.विसुनाना यांनी उत्तरे पाठविली आहेत. दोन्ही उत्तरे बरोबर आहेतच. पण श्री.विसुनाना यांनी या कोड्यातील एक त्रुटी निदर्शनाला आणून दिली आहे.धन्यवाद!

व्यनि.उत्तरे ६,७

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
हे कोडे सोडविण्यात श्री.भाऊराव यशस्वी झाले आहेत. त्यांनी अगदी मोजक्या शब्दात परिपूर्ण उत्तर लिहिले आहे. अभिनंदन!

व्यनि उत्तरे:८,९

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आणखी दोन अचूक उत्तरे श्री.सुनील आणि श्री.सौरभदा यांनी पाठविली आहेत. धन्यवाद!

वाट पहात आहे

उत्तराची वाट पहात आहे

(तर्कदुष्ट) ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

तर्कक्रीडा:७०: उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कळीचा प्रश्न
*हे कोडे तर्कशास्त्राशी संबंधित नाही. वीजदिवा प्रकाशित झाला की गरम होतो हे सुपरिचित आहे.
*विद्युतप्रवाहामुळे न तापणारे दिवे असतील याची कल्पना होती. म्हणून कोड्यात बल्ब असा जुना शब्द हेतुत: वापरला होता. नवीन दिव्यांना आता लॅंप म्हणतात.तरी श्री.विसुनाना यांनी शंका काढलीच. ती योग्यच आहे. कोड्यात कोणतीही त्रुटी नसावी.
*श्री. आनंद यांनी शंका काढली:बाहेर जी बटणे आहेत ती दुसर्‍या कशाची तरी असतीलच. उगीचच कोणी बटणे ठेवणार नाही."शंका रास्त आहे. त्यासाठी कोड्यात असा बदल करता येईल की:"खोलीत अ,ब, आणि क असे तीन टेबल दिवे आहेत.खोली बाहेर एकदाच जाऊन यायचे. अ,ब,क आणि १,२,३ यांची संगती लावायची."

....
* श्री.भाऊराव यांनी पाठविलेले उत्तर असे:
प्रेषक: भाऊराव
प्रति: यनावाला
विषय: कळीचे उत्तर
दिनांक: शुक्र, 09/18/2009 - 14:53
बाहेर जाऊन कळ १ चालू करून काही वेळ (५ मिनीटे) वाट पाहा. मग ती कळ बन्द करून कळ २ चालू करा व लगेच आत जा.
१) दिवा बन्द व थन्ड : कळ ३
२) दिवा बन्द व गरम : कळ १
३) दिवा चालू : कळ २

चार कळी आणि चार दिवे

दिवा तापायला वेळ लागतो. त्यामुळे चार कळी असत्या तरी ओळखता आले असते.

१. गार+पेटलेला (अगदी खोलीत जाण्यापूर्वी चालू केलेली कळ)
२. गार+विझलेला (कधीच चालू न केलेली कळ)
३. गरम+पेटलेला (पाच मिनिटे तरी चालू ठेवलेली कळ)
४. गरम+विझलेला (पाच मिनिटे चालू ठेवून बंद केलेली कळ)

आणखी एक व्य. नि.उत्तर

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
केशवी यांनी या कोड्याचे अचूक उत्तर पाठविले आहे.त्यांच्या व्यक्तिगत निरोपी उत्तराला थोडा विलंब झाला असला तरी त्यांनी कोडे स्वयंप्रज्ञेने सोडवले आहे हे दिसून येते.

 
^ वर