उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
छायाचित्र : चिमुरडी
वैद्य
September 12, 2009 - 1:54 am
लहान मुलांचे फोटो काढण्या इतका आनंददायी दुसरा प्रकार नाही. असेच भटकत असताना अचानक ही चिमुरडी दिसली. डोळ्यातील भाव स्पष्ट येण्यासाठी थोडेसे ओवरएक्स्पोज करुन हे चित्र काढले. घरी जाऊन बघीतल्यावर लक्षात आले फारच छान भाव टिपले गेले. लगेच इथे टाकले.
![]() |
दुवे:
Comments
छान
छान आहे :-)
छान आहे :-)
छान आहे :-)
- गौरी
छानच!
वा! छानच आहे!
हल्ली उपक्रमावर गोड मुलींचे विडीयो-चित्रे यांची मालिकाच आहे जणु :) ;)
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
छान
चित्र आवडले. :) बाजूचे कोपर काढून टाकता येईल असे वाटते.
---
गोड
सो स्वीईईईईट!!! का कुणास ठाऊक, पण स्वीटनेसमधला गोडवा 'गोड' या शब्दात येत नाही! 'लय् ग्वाड' जरा जास्त जवळ जाते.
वाहवा!!
अत्यंत उत्तम फोटो. चिमुरडीच्या डोळ्यांतला निरागसपणा अगदी व्यवस्थित पकडला गेला आहे.
अवांतरः 'स्वीट' साठी 'गोंडस' हा शब्द कसा वाटतो? त्यात थोडी 'क्यूट' अशा अर्थाची छटाही आहे.
-- येडा बांटू
+१
अत्यंत उत्तम फोटो. चिमुरडीच्या डोळ्यांतला निरागसपणा अगदी व्यवस्थित पकडला गेला आहे.
-- सहमत आहे. सुरेख फोटो!
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्तच
मस्त आहे फोटो. आरागॉर्न यांच्याशी सहमत.
लईच गोड
मुलगी लईच गोड आहे. आणि 'कूल'ही दिसते. पॅपराझ्झींना कसे तोंड द्यायचे हे तिला ठाऊक असावे. फोटो आवडला.
गोड
लई गोड आहे ही मुलगी... डोळ्यातले भाव खरंच छान टिपले आहेत. गाल तर कित्ती छान, गोबरे आहेत. :)
आरागॉर्न म्हणतात तसे बाजूचे कोपर काढून टाकले तर फोकस तिच्यावरच राहील.
मस्त
साग कधि कलनार तुला भाव माझ्या मनातला ? असे तर सान्गत नाही ना ही .....
तयार
मला ही मुलगी गोड, गोंडस पेक्षा 'तयार' वाटते. तिच्या डोळ्यात निरागसतेपेक्षा एक खट्याळ आव्हानच दिसते की काय कुणास ठाऊक!
कोपर असले तरी चालेल. उगीच कुणावर तरी शस्त्रक्रिया करुन कुणाला अपंग करण्याचा आपल्याला काय अधिकार आहे?
पण फोटो आवडला.
सन्जोप राव
ये सारा जिस्म बोझ से झुककर दोहरा हुवा है
मैं सजदे में नही था, आपको धोखा हुवा है
सुंदर चित्र
चित्र फारच छान आले आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
क्यूट
डोळे, सोनेरी केस खूपच छान.
पोरगी किती कुतुहलाने बघते आहे असे वाटले. खेळायची जागा वगैरे समोर काही होते का?
ओव्हरएक्स्पोझरमुळे ग्लॅमर
ओव्हरएक्स्पोझरमुळे ग्लॅमरशॉट झाला आहे.
छान.
आभारी आहे
अभिप्राय नोंदवणार्या सर्वांचे आभार!
कोपर काढून टाकायचा विचार केला होता पण त्याखाली चिमुरडीची बोटे असल्याने कोपर क्रॉप केले तर ती बोटे पण क्रॉप करावी लागतील म्हणून ठेवले.
पण पुन्हा विचार करताना ते काढून टाकणेच अधिक योग्य वाटत आहे.
लहान मुलांचा एक प्रकारचा पाळणा होता हा. पाळणा सुरू होण्यापुर्वी काढलेले चित्र आहे.
पाळणा सुरू झाला की काय होईल ह्याचे कुतुहल असावे.
क्रॉप्
कोपर काढून टाकायचा विचार केला होता पण त्याखाली चिमुरडीची बोटे असल्याने कोपर क्रॉप केले तर ती बोटे पण क्रॉप करावी लागतील म्हणून ठेवले.
पण पुन्हा विचार करताना ते काढून टाकणेच अधिक योग्य वाटत आहे.
हा विचार माझ्याही मनात आला होता. नेहेमीसारखे क्रॉप करण्याऐवजी फोटोशॉपमध्ये कोपरावर ब्याकग्राउंडचा निळा रंग देता येईल की नाही माहीत नाही. (फोटोशॉपचा अनुभव नाही) तसे करता आल्यास दोन्ही गोष्टी साध्य व्हाव्यात.
---
फोटोशॉप
फोटोशॉपमध्ये कोपरावर ब्याकग्राउंडचा निळा रंग देता येईल की नाही माहीत नाही.
तसे करता येते. तो निळा रंग कॉपि करून (त्याआधी ते टूल सेलेक्ट करून) आणि मग कोपर सेलेक्ट करून तिथे तोच निळा रंग भरता येईल.
विलोभनीय भाव
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
चिमुरडीच्या चेहर्यावरील भाव विलोभनीय आहेत.डोळे बोलके आहेत. मात्र निरागसता तितकीशी दिसत नाही.(श्री.सन्जोप राव यांच्या निरीक्षणाशी सहमत आहे.) आपला फोटो काढत आहेत याची तिला जाणीव आहे असे वाटते. जिवणी आणि नाकपुड्या यांतील अंतर खूप दिसते. नाक अजून लांब हवे होते.मग अधिक छान दिसली असती. अर्थात छायचित्र लक्षवेधकच आहे.
बिचारा छायाचित्रकार काय करणार?
ह्यात बिचारा छायाचित्रकार काय करू शकणार? यनाकाका, नाक फोटोशॉपमध्ये लांबवायचे की काय? बाकी ह्या हिरण्यकेशी मुलीचा फोटो उत्तमच!
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"