उपक्रम दिवाळी अंक २००९

मागील वर्षीप्रमाणे यंदाही उपक्रमचा दिवाळी अंक काढण्याचा विचार आहे! विविध विषयांवर माहितीपूर्ण लेख आणि चर्चांनी उपक्रम या आपल्या संकेतस्थळाने आपले वेगळेपण जपले आहे. उपक्रमींच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आणि उत्साहपूर्ण सहभागामुळे उपक्रम दिवाळी अंक २००८ वैशिष्ट्यपूर्ण झाला आहे. यावर्षीचा दिवाळी अंकही असाच वैशिष्ट्यपूर्ण व्हावा यासाठी सर्व उपक्रम सदस्यांना आवाहन आहे की त्यांनी आपले लेखन उपक्रम दिवाळी अंक २००९ साठी पाठवावे.

लेखांचे विषय आणि प्रकार

भाषा, अर्थकारण, वाणिज्य, व्यवस्थापन, गणित, विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान, शिक्षण, संस्कृती, कला, क्रीडा, चित्रपट, पर्यावरण, प्रवास, व्यक्तिमत्व, साहित्य व साहित्यिक, राजकारण इ. कोणत्याही विषयावर अनुभव, अनुवाद, आस्वाद, प्रवासवर्णन, बातमी, माहिती, विचार, व्यक्तिचित्र, संदर्भ, स्फुट, कोडी/तर्कक्रीडा, छायाचित्रे, चलचित्रे आणि पानपूरके (वरील विषयांवरील थोडक्यात पण रंजक माहिती, घटना, 'तुम्हाला हे माहीत आहे का?' वगैरे) अश्या प्रकारचे लेखन पाठवावे.

लेख पाठवताना

  • कृपया या अंकासाठी उपक्रमच्या लेखनविषयक धोरणात बसणारे लेखनच पाठवावे.
  • सदस्यांनी एकाहून अधिक लेख पाठवण्यास हरकत नाही.
  • उपक्रमचे सदस्य नसलेल्यांचे उपक्रमच्या धोरणात बसणारे लेखन त्यांच्या अनुमतीने पाठवण्यासही हरकत नाही.
  • लेखन प्रताधिकार कायद्याचा भंग करणारे किंवा उपक्रमवर किंवा इतरत्र पूर्वप्रकाशित झालेले नसावे.
  • लेखन शक्यतो ३० सप्टेंबरच्या आधी पाठवावे. आणखी थोडा वेळ हवा असल्यास ३० सप्टेंबर पूर्वी लेख पाठवण्याचा मनोदय कळवावा.

लेखनाविषयी मार्गदर्शन

  • लेख साधारणपणे किमान ५०० शब्दांचा असावा. (यथोचित अपवाद वगळता)
  • लेख मोठा असेल तर दोन किंवा जास्तीत जास्त तीन भागात प्रकाशित करणे शक्य आहे.
  • पारिभाषिक शब्दांच्या बरोबर मूळ शब्द देवनागरी आणि रोमन लिपीत कंसात द्यावा.
  • आवश्यक तेथे संदर्भ, दुवे वगैरे द्यावेत.
  • आवश्यक तेथे चित्रे, आकृत्या, छायाचित्रे, तक्ते द्यावेत. याविषयी कोणतीही संपादकीय मदत लागल्यास कळवावे.
  • स्वतःविषयी थोडक्यात माहिती द्यावी, शक्य असल्यास छायाचित्रही. (वैकल्पिक)

लेखन upakramdiwali @ gmail . com या पत्त्यावर पाठवावे. लेखन टेक्स्ट स्वरूपात किंवा थेट विरोपात चिकटवून पाठवावे. लेखनाची एक प्रत स्वतःजवळही ठेवावी. उपक्रम दिवाळी अंकाविषयी सर्व पत्रव्यवहार दिवाळी अंक या सदस्यनामाशी करावा.

अंकनिर्मिती (मुद्रितशोधन, संपादन इ.), अंकाची सजावट, मुखपृष्ठ, चित्रे याबाबतीत सहभागी होण्याची इच्छा असेल तर आपले स्वागत आहे, लागलीच कळवावे.

तेव्हा झटपट लिहायला लागा आणि वरील सूचनांप्रमाणे शक्य तितके लेखन पाठवा! आपल्या उत्स्फूर्त आणि भरघोस प्रतिसादाची अपेक्षा आहे!

कळावे, लोभ असावा,
उपक्रम दिवाळी अंक २००९

लेखनविषय: दुवे:

Comments

भरघोस शुभेच्छा!

ह्या अंकाला शक्य तेवढी सर्व मदत करीनच. तूर्तास अंकास भरघोस शुभेच्छा!

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

असेच

असेच म्हणतो.






सहमत आहे

ह्या अंकाला शक्य तेवढी सर्व मदत करीनच. तूर्तास अंकास भरघोस शुभेच्छा!

सहमत आहे.


पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

याच्याशीही सहमत आहे. ;-)

सहमत आहे!

दिवाळी अंकासाठी एखादे छायाचित्र तरी नक्की पाठवणार.
तूर्तास अंकास भरघोस शुभेच्छा!

+१

ह्या अंकाला शक्य तेवढी सर्व मदत करीनच. तूर्तास अंकास भरघोस शुभेच्छा!

- असेच म्हणतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

+२

ह्या अंकाला शक्य तेवढी सर्व मदत करीनच. तूर्तास अंकास भरघोस शुभेच्छा!

असेच म्हणतो

-- येडा बांटू

मनोरंजन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
*माहितीपूर्ण आणि विचारपरिप्लुत लेख हे उपक्रम स्थळाचे वैशिष्ट्य आहे. पण दिवाळी अंक मनोरंजक हवाच असे वाटते.कथा, कविता इ.ललित लेखन नसले तरी लहान सहान चमकदार विनोदी लेख, किस्से, चुटके,इ.विपुल प्रमाणात असावे.
*लेखांसाठी किमान शब्दसंख्या ५०० सांगितली आहे.इथे कमाल शब्दमर्यादाही असावी.लांबलचक लेखांचे वाचन कंटाळवाणे होते.
* भरभरून लेख येतीलच. निवड करताना वाचनीयता आणि मनोरंजन या निकषांना प्राधान्य असावे.

शुभेच्छा.

दिवाळी अंकाला शुभेच्छा.

श्री यनावाला लिव्हतात ''दिवाळी अंक मनोरंजक हवाच असे वाटते.कथा, कविता इ.ललित लेखन नसले तरी लहान सहान चमकदार विनोदी लेख, किस्से, चुटके,इ.विपुल प्रमाणात असावे.'' त्यायच्याशी मी सम्मत हाये. उपक्रमचा दिवाळी अंक मनोरंजक व्हायला पाह्यजेन.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

शुभेच्छा...

आमच्याही भरघोस शुभेच्छा!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

धन्यवाद आणि अधिक!

उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल उपक्रमींचे मनःपूर्वक आभार!! आतापर्यंत काही लेख मिळाले असून, अनेकांनी लेख पाठवण्याविषयी कळवले आहे. इतरांनीही कृपया वेळात वेळ काढून एखादा लेख किंवा शक्य न झाल्यास काही थोडक्यात पण मनोरंजक माहिती पानपूरके म्हणून पाठवावी. पानपूरके दिवाळी अंकात वेगवेगळ्या पानांवर दाखवली जातील. याशिवाय कोडी, किस्से, प्रसंग, चित्रे, छायाचित्रे, आपणांस हे ठाऊक आहे का? इ. इ. स्वरूपाच्या साहित्यामुळे दिवाळी अंक रंगतदार होईल! तेव्हा लगेचच लिहायला लागा आणि कळवा!!

प्रश्न/शंका/सूचना/मदत/माहिती इ. साठी दिवाळी अंक या सदस्यनामाशी संपर्क साधावा.

कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक २००९

लेख, पानपूरके, वाढीव मुदत

उपक्रम दिवाळी अंक २००९ साठी लेखन आणि पानपूरके पाठवलेल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!

ज्या उपक्रमींनी लेख पाठवण्याचा मनोदय कळवला आहे, तुमच्या लेखांची आम्ही वाट पाहात आहोत.

लेख पाठवण्याची इच्छा असूनही वेळेअभावी शक्य झाले नसले तरी लेखनाचा प्रयत्न अवश्य करावा अशी आग्रहाची विनंती! लेखाचा विषय आणि अंदाजे शब्दसंख्या कळवून थोडी वाढीव मुदत घेता येईल!

पानपूरकांसाठी थोडक्यात पण मनोरंजक माहिती अवश्य पाठवावी.

प्रश्न/शंका/सूचना/मदत/माहिती इ. साठी दिवाळी अंक या सदस्यनामाशी संपर्क साधावा.

कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक २००९

शुभेच्छा

उपक्रम चा प्रथमच सदस्य झालो आहे, परन्तु आतापर्यत सन्गनकावर इतकि उत्तम वेबसाइत् प्रथमच् पाहात आहे परन्तू मला अजुनहि अनुस्वार कसा द्यावा व त कसा लिहावा ते जमत नाहि.
असो उपक्रम् च्या दिवलि अन्काला अनेक शुभेच्छा.

अनुस्वार

अक्षरानंतर शिफ्ट-एम दाबल्यास अनुस्वार येतो. शिफ्ट-टी ने ट येतो.

---
"बोले तो.. जंगल मे मंगल और अंधेरी मे दंगल. क्या?"--- पैचान कोन?

धन्यवाद

तुम्हि दिलेल्या उपयुक्त माहितिबद्दल धन्यवाद.
चिन्ता मितलि.... माफ करा, चिंता मिटलि.

दीपावली २०१० चे कसे काय?

दीपावली २०१० चे कसे काय?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

२०१० चा दिवाळी अंक ?

२०१० चा दिवाळी अंक निघणार आहे का ?

 
^ वर