ब्लडहाऊंड

नमस्कार संगणकतज्ञहो,

माझ्या संगणकामध्ये (विस्टा) काही दिवसांपूर्वी ब्लडहाउंड एक्स्प्लॉइट १९६ शिरला आहे. सिमँटिक अँटिवायरस ब्लडहाउंडाच्या प्रत्येक इन्स्टन्सला क्वारंटाईन करतो, मात्र काढून टाकू शकत नाही. इन्स्टन्स पुन्हापुन्हा येतच राहतो आणि परिणामी माझा संगणक दोन प्रोसेसर्स असूनही फार मंद गतीने काम करतो.

जालावर उपायांचा शोध घेऊन हा विषाणू काढण्याचा प्रयत्न करून पाहिला, मात्र फायदा झाला नाही. तसेच एक्सपीसाठी काय करावे ह्याबद्दल चर्चा उपलब्ध असली तरी विस्टासाठी काय करावे ह्याबाबत फारसे काही सापडले नाही. रजिस्ट्री मध्ये हा विषाणू दडून बसला असणार. मात्र तो कसा शोधावा व कसा काढावा कळत नाही.

कोणाला काही उपाय माहीत असल्यास कृपया कळवावे.
आगाऊ धन्यवाद.

लेखनविषय: दुवे:

Comments

हम्म

सिमँटेकचा अनुभव फारसा चांगला नाही. आणि तुम्ही आत्ता नवीन अँटी व्हायरस उतरवून घेतला तरी तो बाधित होण्याची शक्यता जास्त.
या लेखात सांगितल्याप्रमाणे ग्लॅडिएटर फोरमवर विचारून बघावे.
मात्र त्यांच्या सूचना तंतोतंत पाळायला हव्यात.

---

इतर अँटीवायरस

इतर अँटीवायरस वापरुन पाहिलेत का? एवीजी वगैरे?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

एविजी

काल एविजी उतरवून घेतला. त्याच्या वायरस वॉल्ट मध्ये जरी ब्लडहाउंड सापडल्याची नोंद नसली तरी काल पहिला स्कॅन केल्यापासून आता वीसेक तास होत आले, अजून तरी ब्लडहाउंडाचा इन्स्टन्स आलेला नाही. पुढे बघू काय होते. आरागॉर्न आणि आजानुकर्णाला धन्यवाद.

विषाणू

हा विषाणू तुमच्या संगणकात कसा घुसला त्याविषयी देखिल माहिती द्या. म्हणजे इतरांना सावध होता येईल.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

सॉफ्टवेअर

'मॅलवेअर-बाईटस्'चे अँटिमॅलवेअर नामक् सॉफ्टवेअर वापरून पहा. फुकट आहे आणि ब्लडहाऊंड काढू शकते (मी वापरले/वापरतो आहे). फक्त डाउनलोड करून् इन्स्टॉल केल्यावर अपडेट करावयास विसरू नका.

-- येडा बांटू

 
^ वर