दिवाळी अंक

या वर्षी उपक्रमाचा दिवाळी अंक निघण्याची चिन्हे (अजून तरी) दिसत नाहीत. संपादक - मालक मंडळी याबद्दल जास्त खुलासा करू शकतील का? श्री. विनायक यांना नसत्या उठाठेवी कशाला हव्यात असा प्रश्न ज्यांच्या मनात येईल त्यांच्यासाठी आधीच खुलासा करतो की दिवाळी अंक २००८ मध्ये मी एक लेख (अनुवादित) लिहिला होता. या वर्षी अंक निघणार असल्यास एखाद्या विषयावर लिहायचा विचार करत होतो. पण आता नवरात्र बसायची वेळ आली तरी दिवाळी अंकाची अधिसूचना जारी झाली नाही यावरून या वर्षी बेत नसावा असे वाटते.

जाता जाता - दिवाळी अंकातल्या लेखनाबद्दलचा श्री. ज. जोशी आणि ग. वा. बेहेरे यांच्यातला एक संवाद आठवतो जो खुद्द श्रीजंनीच सांगितला होता (मला नाही दुसर्‍या कोणाला मी फक्त वाचला, ज्याने लिहिला त्याचे नाव आठवत नाही). गवाबे एकदा श्रीजंना म्हणाले " दिवाळी अंकासाठी एका कथेचे किती पैसे मिळतात?" श्रीज म्हणाले " साधारण शंभर रुपये.तुम्हाला सोबतच्या दिवाळी अंकाकरता कथा वगैरे हवी आहे का?" यावर गवाबे म्हणाले" मी तुम्हाला दोनशे रुपये देतो पण तुम्ही लेखन थांबवा."

असो. उपक्रमपंत दोनशे डॉलर्सची ऑफर द्यायच्या आत काढता पाय घेतो.

विनायक

लेखनविषय: दुवे:

Comments

कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा

उपक्रमातर्फे अधिसूचना जाहीर व्हायला हवी होती. उपक्रमपंतांशी ह्याबाबत बोलणेही झाले होते. त्यानंतर बोलणे झालेले नाही. देर आयद मगर दुरुस्त आयद असे समजून अंकाच्या जुळवाजुळवीला सुरवात करायला हरकत नसावी. लेखन जमवायला सुरवात करायला हवी. कुणीतरी पुढाकार घ्यायला हवा. मागच्या वर्षीसारखा ऑनलाइन अंक काढायला फारसा वेळ लागू नये.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

उपक्रमशेठ,

काय उपक्रमशेठ, दिवाळी अंकाची घोषणा केव्हा करणार? तुम्हीही दिवाळी अंकाचे लौकरच जाहीर करा ही विनंती. उपक्रमाचा दिवाळी अंक आणि त्यात येणारा विनायकरावांचा लेख वाचायला उत्सुक..

(उपक्रमी) तात्या.
[प्रतिसाद संपादितः संपादक]
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

मिसळपाव?

तात्या मिसळपावचा दिवाळी अंक/ शिमगा अंक काहीच निघाले नाही.२ वर्षे होऊन गेली. ह्यावर्षी काही शक्यता? (मला नाही वाटत) मिपावर नियमीत लिहिणार्‍यांमध्ये दिवाळी अंक वगैरे काढण्याची कुवत आहे. त्यापेक्षा अवांतर अंक/ शिव्यांची मंगळागौर असले काहीतरी काढा मिसळपावचे वेगळेपण/युनिकनेस् त्यात दिसुन येइल.
किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पेश्शल (खास तुमचा शब्द) असा अंक/पुस्तिका काढा.

अनावश्यक मजकूर संपादित.

(वाग्दत्त) बेसनलाडू

मिपाचा अंक काढला असता

(मला नाही वाटत) मिपावर नियमीत लिहिणार्‍यांमध्ये दिवाळी अंक वगैरे काढण्याची कुवत आहे.

मिपावर नियमित लिहिणार्‍यांच्या कुवतीचे माहित नाही. खरं म्हणजे कुवत काढणे म्हणजे लैच झाले. असो, आपल्या विचारांचा आदर करुन मिपावर वावरणारा म्हणून आपल्याला सांगतो. मिपाचा ऑनलाइन दिवाळी अंक काढण्यासाठी जे तांत्रिक कसब आवश्यक असते, ते जर माझ्याकडे असते तर मिपाचा एक दिवाळी अंक.. उत्तम झाला असता की माहित नाही, पण नक्की काढला असता. अगदी मिपाच्या खास वैशिष्ट्यांसह ! असो,...

उपक्रमच्या दिवाळी अंकाची घोषणा लवकर व्हावी. एखादा संशोधनात्मक लेख देईन म्हणतो.

-दिलीप बिरुटे

मग कुणी अडवले आहे?

तांत्रिक बाब हा अतिशय दुय्यम/कमी महत्वाचा मुद्दा आहे. मूळात सकस लेखन येणे म्हत्वाचे. मिपाच्या मुख्यपानावरील लेख वाचले की ओकारी येते (म्हणून सध्या तिथे जाणे बंद केले आहे, त्यामुळे सध्याचे माहीत नाही). वारंवार सांगुन (कधी सौम्य शब्दात कधी कठोर) तात्याना त्याची काहीही पर्वा/काळजी/फिकीर नाही हेच दिसुन आले आहे. आणि त्यावर उपक्रमावर येऊन तुमचा दिवाळी अंक कधी येणार हे विचारणे म्हणजे खटकण्याजोगेच आहे.

उपक्रमच्या दिवाळी अंकाची घोषणा लवकर व्हावी. एखादा माहितीप्रधान लेख द्यावा म्हणतो.

(स्पष्ट) बेसनलाडू

शोधा म्हणजे सापडेल.

>>मूळात सकस लेखन येणे म्हत्वाचे
मिपावर चांगल्या कथा, लेख, कविता, विडंबने, आणि दर्जेदार चर्चा, नितळ मनाने शोधल्या तर खूप सापडतील. असो, (ओकारी-बिकारी येते म्हटल्यावर काय बोलायचे) मिपाचा वाचक म्हणुन माझ्यापूर्ता हा विषय संपला.

-दिलीप बिरुटे

माझ्यासाठीही विषय संपला

माफ करा जे खरे वाटले ते लिहिले. तुमच्या भावना दुखावायचा हेतू/उद्देश नव्हता. चांगले लेख कसे शोधायचे तेही सांगा (नितळ मनाने प्रयत्न करुन झाला आहे.)
संपादकिय सदर चालू ठेवण्यासाठी जेमतेम एक लेख/लेखक तात्यांना मिळेना म्हणून ते बंद पडले तर दिवाळीं अंक कुठून/कसा येणार? इतकाच माझा मुद्दा आहे. त्यासाठी तांत्रिक क्षमता वगैरे लंगडी कारणे (कृपया) पुढे करू नका.

(नितळ मनाचा) बेसनलाडू

उत्तम..

मिपाच्या मुख्यपानावरील लेख वाचले की ओकारी येते (म्हणून सध्या तिथे जाणे बंद केले आहे,

अगदी उत्तम केलेत! आभारी आहे... :)

तात्या.

--
आंतरजालीय अस्तित्व! हम्म! आहे खरा महत्वाचा प्रश्न! :)

स्वागतार्ह

उपक्रमपंतांनी मला गाशा गुंडाळायला सांगितला आहे येथपासून दिवाळी अंकात आपला लेख देण्याची कळकळ हा आपला प्रवास आम्हाला स्वागतार्ह वाटतो.

अभिनंदन!

-राजीव.

हा हा हा

उपक्रमपंतांनी मला गाशा गुंडाळायला सांगितला आहे येथपासून दिवाळी अंकात आपला लेख देण्याची कळकळ हा आपला प्रवास आम्हाला स्वागतार्ह वाटतो.

हा हा हा आम्हीही या बदलाचे स्वागत करतो.

-दिलीप बिरुटे

विसोबा आणि लेक्स

विसोबा

उपक्रम दिवाळी २००८ मधल्या माझ्या लेखावर अगदी आत्ता पाहिले तोपर्यंत तरी आपला प्रतिसाद नव्हता. त्यामुळे "विनायकरावांचा लेख वाचण्यास उत्सुक" हे खरेच मनापासून आहे का?

लेक्स

उपक्रम दिवाळी २००८ मध्ये आपला लेख सापडला नाही. असल्यास जरूर दुवा द्यावा. नसल्यास स्वतः काही विधायक न करता माझ्या नावाने शिमगा करायचे सोडावे. पूर्वी एकदा अशोक शहाण्यांनी लोकमान्य टिळकांवर टीका केली त्यावेळी त्यांचा समाचार घेताना ना. सी. फडके म्हणाले होते "हे कसले शहाणे? हे तर नुसते नावाचेच शहाणे!" त्याची आठवण झाली.

विनायक

खरं!

उपक्रम दिवाळी २००८ मधल्या माझ्या लेखावर अगदी आत्ता पाहिले तोपर्यंत तरी आपला प्रतिसाद नव्हता.

हम्म! प्रतिसाद द्यायचा राहिला खरा!

त्यामुळे "विनायकरावांचा लेख वाचण्यास उत्सुक" हे खरेच मनापासून आहे का?

तर तर! अगदी मनापासून!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

उपक्रम दिवाळी अंक २००९!

उपक्रम दिवाळी अंक २००९ ची घोषणा झाली आहे!! वाचा! लेखन सुरू करा!!

अंकनिर्मिती (मुद्रितशोधन, संपादन इ.), अंकाची सजावट, मुखपृष्ठ, चित्रे याबाबतीत सहभागी होण्याची इच्छा असेल तर आपले स्वागत आहे, लागलीच कळवावे.

कलोअ,
उपक्रम दिवाळी अंक २००९

अरे वा!

अरे वा! ह्यावर्षी देखिल दिवाळी अंक येणार का. छान मेजवानीच की. कार्यबाहुल्याने ह्यावर्षी काही लिहायला जमेल की नाही माहित नाही पण वाचनाचा आनंद मात्र भरपूर घेऊ.

अवांतरः इथली चर्चा पाहून मिसळपाव साईट बघीतली. फालतू साईट आहे.
सदस्यत्व घेतले तर ते अनुमतीच्या प्रतिक्षेत आहे म्हणे..कृपया कोणी संबधीत इथे असतील तर ते रद्दच करुन टाकावे.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

माझेही

माझेही सदस्यत्व बर्याच दिवसांपासुन पेंडिंग आहे. आता ते अप्रुव केले नाही तरी चालेल.
ती साईट एवढी काही खास वाटली नाही. रंगसंगती फारच भडक आहे. शिव्यांचा वापर अनावश्यक वाटला. मुखपृष्ठावरच एवढ्या शिव्या...

- गौरी

माझे लेखन

सदर संकेतस्थळावरील माझे सदस्यत्व वैयक्तिक आकसापोटी प्रतिबंधित केले असले तरी माझे लेखन मात्र तेथे तसेच आहे. ते लेखनही संबंधितांनी आयडीसह नष्ट करावे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

गम्मत

हा विषय आहे दिवाळी अंक आणि चर्चा पहाता कोणाला तरी डंख, असा वाटतो आहे. असो. नेमेची येतो पावसाळा. दिवाळी अंकाची घोषणा झालेली दिसते आहे. त्यामुळे चर्चा प्रस्तावकाचे काम झाले आहे म्हणायला बरे. :)


सहमत

हा विषय आहे दिवाळी अंक आणि चर्चा पहाता कोणाला तरी डंख, असा वाटतो आहे.
सहमत आहे. मूळ प्रस्तावावर चाललेली चर्चा मनोरंजक आणि उद्बोधक आहे.

अवांतर..

मनमोहन सिंग चौतिसाव्या वेळेला 'दीवार' बघत होते. तेवढ्यात सेक्रेटरीने फोन करून झरदारी आल्याचे सांगितले. सिंगांनी अस्सल पंजाबीत मातृकुलाशी संबंधित काही उद्गार काढले आणि झरदारींना भेटायला निघाले.

झरदारींनी नेहेमीचा राग आळवायला सुरूवात केली. "२६/११ शी आमचा संबंधच नाही. आमचा देश किती समृद्ध आहे तुम्हाला माहीत नाही. आमच्याकडे स्कड आहे, चायनीज क्षेपणास्त्र आहेत. क्लिंटन आमच्या खिशात आहेत. तुमच्याकडे काय आहे?"

"आमच्याकडे लोकशाही आहे." सिंग अमिताभचे बेअरिंग ठेवत उद्गारले.

झरदारी निमूटपणे सिंगांनी दिलेल्या कोल्हापुरी चपला (भेट म्हणून हो!) पायात सरकवत जायला निघाले. सिंग परत दीवारकडे वळले.

--

सही....

अवांतर आवडले.


अवांतर चपला

अवांतर चपला
अवांतर चपला"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

किस्सा आवडला!

संबंधित चर्चेत अवांतर असला तरी किस्सा आवडला!

तात्या.

--
हम्म! आंतरजालीय अस्तित्व! आहे खरा कळीचा मुद्दा! त्यामुळे एका ठराविक संस्थळाचे सतत गोडवे गात रहावे लागते!

हाहाहा

मस्तच!
अवांतर.कॉम मालकांना अवांतराचीच तक्रार करावीशी वाटावी असे अवांतर!
मजा आली.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

अवांतर..

संपादक महोदय,

सदरच्या धाग्यात बेसनलाडू, वसंत लिमये आणि गौरी या मंडळींनी मिसळपाव डॉट कॉमचे जे गोडवे गायले आहेत त्याबद्दल मालक या नात्याने मी त्यांचे आभार मानतो परंतु या धाग्यात हे गोडवे पूर्णत: अवांतर आहेत असे वाटते. आपल्यालाही जर असेच वाटत असेल तर आपण योग्य ते संपादन करावे ही विनंती..

या निमित्ताने बेसनलाडू, वसंत लिमये आणि गौरी या मंडळींना इतकेच सांगू इच्छितो की मिसळपाव डॉट कॉमचे अहोरात्र गोडवे गाणारे काही बॉग्ज उपलब्ध आहेत ज्यांचे अस्तित्वच मुळी मिसळपाव डॉट कॉम मुळे आहे!

आपण मंडळींनी कृपया तेथे जाऊन काय ते लिहावे म्हणजे येथे अवांतर चर्चा होणार नाही इतकेच सांगणे!

कळावे, लोभ तर दिसतोच आहे त्यामुळे 'असावा' असे वेगळे म्हणत नाही!

आपला नम्र,
तात्या अभ्यंकर,
मालक - मिसळपाव डॉट कॉम.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

विनोदी

वा! फुकटात करमणूक.

आपला
गुंडोपंत

सदर चर्चेतील काही प्रतिसाद सध्या अप्रकाशित केलेले आहेत याची नोंद घ्यावी. व्यक्तिगत स्वरुपाच्या आणि इतर संकेतस्थळावरील अडचणी सोडवण्यासाठी व्यक्तिगत निरोप किंवा खरडवहीची सुविधा वापरावी. - संपादन मंडळ.

झलक मिळाली... मन तृप्त जाहले...

उपक्रम दिवाळी अंकाविषयीची चर्चाच जर इतकी खमंग आणि चुरचुरीत तर प्रत्यक्षात तो दिवाळी अंक म्हणजे तर नि:संशय पर्वणीच असेल.

उ'पंतांना स.न.वि.वि. : माहिती ह्या विभागाच्या अंतर्गत येत असेल तर यंदांच्या दिवाळी अंकात अंतरजालीय व्यक्तिविशेषांविषयी साद्यंत माहिती देणार्‍या लेखांना पण थोडी जागा द्यावी.

जाता जाता : अंतरजालीय दिवा म्हटले की आम्हाला आजानुभाऊंच्या "चरानाभौ" ह्या चिरतरूण लेखाची आठवण येते :)

________________________________________________________

माँ मृदुलानंदमयी कार्यनिमग्न असल्याने सध्या ऊहापोहासाठी जास्त वेळ देऊ शकत नाहीत. कृपया साधकांनी नोंद घ्यावी.

तुमचा लेख पहिला हवा

विनायकपंत, उपक्रमाच्या दिवाळी अंकाला लेख दिला का? तुमचा लेख पहिला हवा. करा तर श्रीगणेशा!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर