वाचू किती वाचू किती |
वाचू किती वाचू किती नजर शिणावली।
"या संकेतस्थळावरील लेखनासाठी उपक्रमकर्त्यांनी काही मर्गदर्शक तत्त्वे घालून दिली होती ते तुम्हाला आठवते का?"
"हो.ती आजही लागू आहेतच की! लेख मुख्यत्वेकरून वैचारिक, माहितीपूर्ण असावे याला प्राधान्य आहे"
"यावर प्रारंभी टीका झाली.’रेल्वे समयसारिणीसुद्धा माहितीपूर्ण असते’ असेही काही जणांनी लिहिले.पण संस्थळाची भूमिका अविचल राहिली.सवंगतेला नाकारले.त्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या या संकेतस्थळावर आता उत्तमोत्तम वैचारिक आणि माहितीपूर्ण लेख प्रसिद्ध होत आहेत.त्यांचा स्तर उच्च आहे."
"हो. इथले प्रतिसादलेखनही ज्ञानसमृद्ध ,विचारप्रवर्तक आणि वाचनीय असते.त्यामुळे सदस्य आणि पाहुणे यांची संख्या वाढत आहे."
"अहो, ज्यांना कोणताही विषय अस्पर्श्य नाही, ज्यांचे लेखन अगदी मूलगामी असते, असे श्री. धनंजय, खगोलीय भ्रमणांविषयी आपल्या अधिकार लेखणीने आकलनसुलभ लिहिणारे श्री.आनंद घारे,आपल्या समर्थ लेखणीच्या प्रभावी प्रतिवादाने प्रतिपक्षाला निरुत्तर करून सोडणारे श्री.प्रकाश घाटपांडे,शृंगापत्तीसदृश समस्यांवर सर्वांगीण विचार करून तर्कशुद्ध लेखन करणारे श्री.प्रभाकर नानावटी,पुस्तके,चित्रपट इत्यादींचे चिकित्सक आणि सडेतोड समीक्षण करणारे श्री.सन्जोप राव, यांच्यासारखे ज्ञानसंपन्न सदस्य असल्याने इथले लेखन उच्चस्तरीय असणारच. मला तर वाचू किती असे झाले आहे."
"तसेच कवितांचे मर्मग्राही रसग्रहण या विषयावर शरद यांनी बहार उडवून दिली आहे."
"आणखी प्रियाली, आजानुकर्ण,टग्या ,शास्त्रीयसंगीतावर रसिकतेने लिहिणारे विसोबा खेचर आदि सदस्यांनी; कार्यबाहुल्यामुळे म्हणा अथवा अन्य काही कारणांनी म्हणा; आपल्या लेखण्या सांप्रत टोपणबंद ठेवल्या आहेत. तेही यथावकाश लिहिते होतीलच."
"एकंदरीत आपले उपक्रमस्थळ सद्ध्या आंतरजालावर झळाळते आहे म्हणायचे."
"हो.असेच म्हणतो."
Comments
उत्तम मनोगत
असाच या निमित्त परस्परांचा उत्साह वृद्धींगत होवो. यनावाला शब्दाचे रहस्य उपक्रमावर् फोडले तेव्हा मजा आली. नानावटींना उपक्रमाची प्रथम लालुच दाखवली. नंतर ते मोहात पडणार अशी खात्री झाल्यावर मग काढता पाय घेतला.
प्रकाश घाटपांडे
तर्कक्रीडा
परत कधी सुरू करताहात? त्याच्याइतके निर्भेळ आनंद देणारे लेखन उपक्रमावर दुसरे नाही.
विनायक
सहमत
तर्कक्रीडा पुन्हा सुरु कराव्यात. इतरत्र चाललेल्या नर्कक्रीडांपेक्षा त्या बऱ्या.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
तर्कक्रीडा पुन्हा चालू केल्याबद्दल धन्यवाद
शिवाय लेखातील सद्भावनेबद्दलही!
+१
हेच म्हणतो. प्रस्तावलेखकाची या संकेतस्थळाबद्दलची तळमळ विशेष जाणवली. धन्यवाद.
+१
+१
इथे यायचं म्हणजे वाचणार्यांसाठी मेजवानीच असते.. फक्त यावे आणि तुटून पडावे.
या निमित्ताने ह्या सुंदर स्थळाबद्दल उपक्रमपंतांचे अनेक आभार मानतो
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
सहमत
सहमत. एकंदर काका मंडळ 'माहोल' करते आहे. चालू द्या.
मीही आभार मानतो. पदरमोड करून उपक्रमपंतांनी एवढे सुरेख स्थळ दिले आहे. माझा तर असा एकही दिवस जात नाही की उपक्रमाची आठवण येत नाही. नेटपासून दूर असलो की उपक्रमाला एवढा 'मिस' करतो की मांड्यात उशी घेऊन 'उपक्रम उपक्रम' करत असतो. उपक्रमापंतांचे उपकार मानावे तेवढे थोडेच आहेत. मी त्यांचा गुलाम आहे. आता थांबतो. मला रडू कोसळते आहे.
कुमार धम्मकलाडू चाटे
इयत्ता ५ वी
तुकडी 'ढ'
सहमत माध्यमिक शाळा
फेफरे बुद्रुक
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
नंबर एक.
ज्यांना कोणताही विषय अस्पर्श्य नाही, ज्यांचे लेखन अगदी मूलगामी असते, असे श्री. धनंजय,
हे बाकी खरं हाये. ह्या माणसाला कंच्याच विषयाचं वावडं नाय.
देवानं काय बुद्धी दिले हाये मानसाला..माणूस हाय का मशिन हे पाह्यला पाह्यजेन.
यनावाला काका- तेवढी तर्कक्रिडा चालू करा.
उपक्रमवर महाभारताचे येगयेगळे पर्व आन त्या नाडी ज्योतिषामुळे बिमार पडाची येळ आली हाय्.
ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !
बाबूराव :)