आधुनिक तुकाराम (नाडीपट्टीवर एक दर्शन)

आधुनिक तुकाराम
आमचे घाटपांडेकाका म्हणजे या शतकातले तुकारामच म्हणावयाला पाहिजे. "बुडती हे जन, देखवे न डोळा" असा ध्यास घेतलेल्या या माणसाला आता काका असे न म्हणता मी तरी यापुढे "बोवा"च म्हणणार.नाही तर नाडी पट्टीत आपले भविष्य शोधायला जाणारी माणसे पट्टी मिळाली तर स्वत:चे ३०० रु. घालवणार, यांच्याकडे थोडेच मागावयास येतात? मग त्या बिचार्‍यांना पट्टीत तथाकथित दिलासा मिळत असेल तर बोवांनी कशाला त्यांना पटवून द्यावयाचे की ही नाडीपट्टी हे थोतांड आहे? बरे, "हंगामा है क्युं बरपा, थोडीसी तो पी है ! डाका तो नही डाला, चोरी तो नही की है!!" च्या धर्तीवर असेही दिसून येते कीं नाडीभविष्यामुळे कोणी दंगेधोपे, बॉंम्ब स्फोट, बलात्कार असली समाजविघातक कृत्ये करत नाहीत.मग स्वत:चे पैसे खर्च करून कोणी फसत असेल तर त्याची तक्रार येईपर्यंत त्याला वाचविण्याचे कष्ट घेण्याचे
कारणच काय ? बरे, तुम्ही लोकांची तक्रार नसतांना त्यांचे पैसे वाचवावयाचा वसा घेतलाच असाल तर लोकांना राजरोस फसवण्याचे दिवसाउजेडी चाललेले धंदे अनेक आहेत,त्यांच्या मागे लागा. मी तीन देतो, प्रतिसादात तीस मिळतील.
(१) तुम्ही तीन सिनेमे पाहिलेत तर बाहेर पडतांना (किमान) दोनदा म्हणता कीं "फसलो, काय भिकार होता!" म्हणजे ६७% वेळा तुम्हाला टोपी घातली जाते.
(२) "सेल, ५०% सूट". हमखास फसवणूक.
(३) "पैसे गुंतवा, ३ महिन्यात दामदुप्पट.
या फुस (फुकट सल्ला) नंतर परत नाडी पट्टी.
माझ्या एका मित्राचा यावर विश्वास. तो चेन्नाई वरून आल्यावर मोठ्या उत्साहाने सांगू लागला. "काय अचूक भविष्य सांगतात! मला तेथे सांगितले तुमच्या घराच्या पूर्वेला देऊळ आहे आणि खरच पूर्वेला विठ्ठल मंदिर आहे". मी उडालोच. एक पट्टी शोधली आणि दहा लाख लोकांचे अचूक भविष्य सांगितले. पुण्यातल्या कोणाही माणसाच्या घराच्या पूर्वेला (आणि
पाहिजे तर उत्तर, दक्षिण, कुठलीही दिशा सांगा) देऊळ असणारच, खरे कीं नाही? म्हणे थोतांड! ह्यॅं !
मी (नेहमीप्रमाणे) निरनिराळ्या भविष्य पद्धतींचा गाढ अभ्यास करून स्वत:ची एक पद्धत विकसित केली आहे. माझ्या पद्धतीत कुंडली, अंगठा, हस्तरेषा, फासे, वगैरे काही लागत नाही. भविष्य खरे ठरले तर कनवटीचे पैसे काढावयाची तयारी असली म्हणजे झाले. हो, ८०% टक्के सांगितलेले खरे ठरले तरच दक्षिणा द्यावयाची. पहा तर,पार्थ, उजेड व ओंजळ यांच्या
बद्दल आमची पद्धत काय सांगते:
(१) लहानपणी तुम्ही एकदा पडला होता व तुम्हाला खरचटले होते.
(२) गृहपाठ न केल्याबद्दल एकदातरी शिक्षक/शिक्षिका तुमच्यावर वस्कन ओरडल्या होते/होत्या.
(३) कॉलेजमध्ये असतांना तुमचा प्रेमभंग झाला होता. शक्य आहे कीं त्यावेळी तुम्हाला ते कळलेही नसेल.
(४) येत्या २० ते ४० वर्षात तुम्हाला गंभीर आजार होणार आहे.(हल्ली पुण्यात सरदी-खोकला हे गंभीर आजार मानले जातात.)
(५) येत्या १०० वर्षात दुर्दैवाने तुमची व घरच्यांची ताटातुट होणार आहे.
संबंधितांनी आमची वाणी अचूक असल्याचे उपक्रमवर जाहीर करावे.त्या करता १०० वर्षे थांबण्याची गरज नाही.
(कुठल्याही विषयावर ५ लेख झाले कीं "बंद करा" अशी विनंती कोणीतरी करतोच, तेंव्हा बंदी यावयाच्या आधीच आपण नाडीग्रंथावर लिहावे हे बरे!)
शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

हॅ हॅ हॅ

हॅ हॅ हॅ
शरदरावांचा सेंस ऑफ ह्युमर जागा झाला की काय होतं याची पुनःप्रचिती आली :)
मस्त लेख!

आजचे भविष्यः तुम्ही आज उपक्रमवरील हा लेख वाचून हसाल

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

भविष्य खरे

ऋषिकेश,
तुमच्या प्रतिसादाशी सहमत. तुम्ही वर्तवलेले आजचे भविष्य सुद्धा खरेच निघाले.
आज-काल उपक्रम जरा भीतभीतच उघडते... कारण त्यावर "नाडी"शिवाय वेगळं काही दिसतच नाहीये आणि मग डोकं उठतं. शरदरावांचा हा लेख वाचून जरा हसू तरी आलं.

कुठल्याही विषयावर ५ लेख झाले कीं "बंद करा" अशी विनंती कोणीतरी करतोच, तेंव्हा बंदी यावयाच्या आधीच आपण नाडीग्रंथावर लिहावे हे बरे!

हा हा हा... हे भारी होतं. "बंद करा" या विनंतीसाठी +१...

आक्षेप!

आजचे भविष्यः तुम्ही आज उपक्रमवरील हा लेख वाचून हसाल

हे भविष्य पुरेशा विद्याशी तपासून पाहिलेले नसावे असे वाटते. 'माझ्यापुरते ते खरे निघाले' हा केवळ एक विदाबिंदू झाला. हा प्रयोगाची पुरेशा वेळा पुनरावृत्ती करून पडताळून पाहिल्याशिवाय ही भविष्यवाणी खरी आहे असा सिद्धांत मांडता येणार नाही.

सांगण्याचे तात्पर्य, हा लेख वाचून हसू न शकणारे निदान काही महाभाग असावेत अशी अटकळ आहे. (पडताळून पाहिलेले नाही. चूभूद्याघ्या.)

विद्या

हे भविष्य पुरेशा विद्याशी तपासून पाहिलेले नसावे असे वाटते.

ही विद्या कोण?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

विद्या...

... म्हणजे विनयला न शोभणारी ती.

विनय

आता विनय कोण हा? गोर्‍यांचा का?

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

आपणा सर्वांचाच

आता विनय कोण हा? गोर्‍यांचा का?

नाही. आपणा सर्वांचाच. (पहा: 'हा आपला विनय आहे' हे वाक्य. वाटेल त्याला उद्देशून म्हणता येते आणि सामान्यतः म्हटले जाते.)

संपन्न घरातली विद्या की काय?

हे भविष्य पुरेशा विद्याशी तपासून पाहिलेले नसावे असे वाटते.

पुरेशी विद्या म्हणजे नक्की काय? संपन्न घरातली विद्या की काय? ह्या विद्याशी भविष्य तपासतात म्हणजे काय करतात? ही प्रक्रिया समजावून सांगितल्यास बरे वाटेल.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

टंकलेखनाची चूक - क्षमस्व!

टंकलेखनाची चूक दाखवून दिल्याबद्दल आभारी आहे, आणि टंकलेखनाच्या चुकीबद्दल क्षमस्व! ते वाक्य "हे भविष्य पुरेशा विद्यांशी तपासून पाहिलेले नसावे असे वाटते." असे वाचावे. (अर्थात, एकाच विद्यावर अवलंबून न राहता अनेक विद्यांशी भविष्य तपासून पाहणे. अनुस्वाराच्या प्रतापाअभावी अर्थाचा अनर्थ झाला, चालायचेच!)

विद्याशी भविष्य तपासणे म्हणजे एखाद्या विद्याबरोबर आपल्याला भविष्य आहे की नाही हे पडताळून पाहणे. हे करण्यासाठी विद्याबरोबर सूत (नाडी नव्हे!) जमवण्याचा प्रयत्न करावा. मात्र सुतावरून थेट स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करू नये - त्याने धोका संभवतो हे भविष्य (त्या किंवा इतर कोणत्याही) विद्याबरोबर पडताळून पाहण्याची गरज नाही.

अशा अनेक विद्यांबरोबर भविष्य तपासून पाहिल्यावर यदाकदाचित "आपले कोणत्याही विद्येबरोबर कधीही जमले नाही आणि जमणारही नाही" अशा निष्कर्षाप्रत आल्यास, ज्यांचे (कोणत्या ना कोणत्या) विद्येशी जमले ते सर्व "विद्यावाचस्पती" (अर्थात विद्येचे बोलण्यापुरतेच पती) आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्याबद्दल वैषम्य वाटून घेणे टाळावे. जेथे विनयचेही विद्येशी जमले नाही, तेथे आपले जमले नाही तर काय फरक पडतो, असा विचार करून भावनेच्या आहारी जाणे टाळावे. (टीप: ही भावना प्रधानांची.)

अवांतर

असा विचार करून भावनेच्या आहारी जाणे टाळावे. (टीप: ही भावना प्रधानांची.)
प्रधानांच्या भावनेशी ओळख असेल तर मराठी सायटींवर त्याचे परिणाम भोगावे लागतात असा अनुभव आहे. :प्

पुराणांप्रमाणे ६४ विद्यांशी सूत जमवणे शक्य असल्याचे कळते. (चूभूद्याघ्या)
----
"मेरा कंपिटीशन यहां के डायरेक्टरोंसे नही है, हॉलीवूड से है. स्पिलबर्ग, कपोला..."

धन्यवाद!

धन्यवाद. प्रतिसाद फारच पथदर्शक! माहितीच्या आहारी जाण्याबाबत तुमचे काय मत आहे? (टीप: ही माहितीही प्रधानांचीच.) आणखी आता एक प्रश्न. 'तू भी विद्या मैं भी विद्या' असा प्रश्न उद्भवल्यास संबंधितांनी काय करावे?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"


१.प्रधानांच्या माहिती-भावनामुळे कवी 'बी' ह्यांच्या 'माझी कन्या' ह्या कवितेतले कडवे आठवले:
विभा-विमला आपटे-प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौर चैत्रींची तशा सजुनि येती,
रेशमाची पोलकी छिटे लेती.

ह्या कवितेचे कुणी रसग्रहण करायला हवे!

बरोबर

विद्या विनये - न शोभते!
.........
कोणीतरी.......कुठेतरी
काहीतरी......काहीतरी

ज्ञानेश्वरांची नाडीपट्टी

ओक साहेबांना ज्ञानेश्वरांची नाडीपट्टी मद्रास मधे शुकनाडीवाल्यांकडे सापडली होती. त्यात ज्ञानेश्वरांचे नांव, वडिल विठठलपंतांचे व आई रुक्मिणी चे नाव आले होते. वर्णनही होते.
शरदरावांचे वर्णन नाडीपट्टीत यायला काहीच अडचण नाही.
शरदरावांप्रमाणे आम्ही पण एक पद्धत विकसित केली आहे. वाईन चा ग्लास प्रथम भरायचा. नंतर गप्पा चालु झाल्या कि त्यात ज्यांचे भाकित सांगायचे आहे त्यांचे प्रतिबिब दिसते. ज्याचे प्रतिबिंब दिसते त्याने बिल देण्याचे कबुल केल्यास ग्लास् रिकामा होताना मुखातुन आपोआप (उस्फुर्त ) भविष्यवाणी बाहेर येते.

प्रकाश घाटपांडे

हम्म!

कुठल्याही विषयावर ५ लेख झाले कीं "बंद करा" अशी विनंती कोणीतरी करतोच, तेंव्हा बंदी यावयाच्या आधीच आपण नाडीग्रंथावर लिहावे हे बरे!

अस्सं! अस्सं! तरीच ते महाभारतावरील लेख आटले. :-)

हल्ली मला घरात कोणाच्याही पायजम्याची नाडी दिसली की दरदरून घाम फुटतो. गाडी, माडी, ताडी, अनाडी अशा सर्व "डी" कंपनीमुळे नाडीची आठवण येते. बाकी, चालू दे.

एक प्रसिद्ध नाडीपट्टी......

ही नाडीपट्टी आम्हाला खूप आवडते.... सिबिल ट्रिलोनी यांनी ही नाडीपट्टी दिली.....त्यांचे आभार.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०%

The one with the power to vanquish the Dark Lord approaches… born to those who have thrice defied him, born as the seventh month dies … and the Dark Lord will mark him as his equal, but he will have power the Dark Lord knows not … and either must die at the hand of the other for neither can live while the other survives … the one with the power to vanquish the Dark Lord will be born as the seventh month dies....प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
इतर नाडीपट्ट्या आणि या नाडीपट्टीत फरक एवढाच की ही अचूक होती. ;-)

-सौरभ (नाकावर स्कार असलेला)प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.

==================

अनाडीशास्त्र हा समुदाय

उपक्रमावर अनाडीशास्त्र नावाचा समुदाय सुरु करावा अशी मागणी करावी असे वाटू लागले आहे. कोणत्याही फलज्योतिषांना, त्यांच्या समर्थकांना, विरोधकांना, चिकित्सकांना, नाडीशास्त्रज्ञांना, त्यांच्या समर्थक-विरोधकांना त्यात सहभाग घेता येऊ नये. (राहिले कोण हा प्रश्न येथे कृपा करून विचारू नये.)

विनये न शोभते

क्या बात है ! आपल्या विनयला न शोभणारी विद्या. शरद खुस हुआ.
शरद

 
^ वर