राष्ट्रवाक्य/ब्रीदवाक्यातील 'देव'

राष्ट्रवाक्य/ब्रीदवाक्यातील 'देव'

"सत्यमेव जयते" (संस्कृत) हे आम्हा भारतीयांचे राष्ट्रवाक्य/ब्रीदवाक्य आहे. इतर देशांचे राष्ट्रवाक्य /ब्रीदवाक्य वाचत असताना 'देव' हा शद्ब १०-१२ देशांच्या ब्रीदवाक्यात आलेला आढळला.
जेव्हा यादी केली तेंव्हा २३ देशांच्या ब्रीदवाक्यांत 'देव' ह्या अर्थाचे शद्ब आलेत.

नंबर देश राष्ट्रवाक्य - मराठी भाषेत
१. यमन - यमन गणराज्य : "अल्ला, देश, क्रांती, एकता"
२. व्हानुआतु -– व्हानुआतुचे प्रजासत्ताक : "देव ज्यांच्यासमोर आम्ही उभे आहोत"
३. संयुक्त अरब अमिराती : " अल्लाह, देश, अध्यक्ष"
४. युगांडा – युगांडाचे प्रजासत्ताक : "देवासाठी आणि माझ्या देशासाठी"
५. तुवालू : "तुवालू हा महा शक्तीसाठी"
६. टोंगा – टोंगाचे राजतंत्र : "देव आणि टोंगा माझे सांस्कृतिक ठेवा आहे."
७. सौदी अरेबिया : "इथे कोणी देव नाही, केवळ अल्लाह आहे, मुहम्मद अल्लाह हा संदेशवाहक आहे."
८. सामो‌आ – सामोआचे स्वतंत्र राज्य : "सामो‌आ हा देवावर आधारलेला आहे"
९. फिलिपाईन्स –फिलिपाईन्सचे प्रजासत्ताक: "देव, जनता, प्रकृती आणि देशासाठी"
१०. निकाराग्वा – निकाराग्वाचे प्रजासत्ताक : "देव ज्यांच्यावर आमचा विश्वास आहे"
११. नौरू – नौरूचे प्रजासत्ताक : " पहिले देव असणार"
१२. मोरोक्को– मोरोक्कोचे राजतंत्र : "परमेश्वर, देश, राजा"
१३. मोनैको : " देवाच्या मदती सोबत"
१४. लिश्टनस्टाइन– लिश्टनस्टाइनचे राज्य : "देवासाठी, राणीसाठी आणि पितृभूमीसाठी"
१५. इराक – इराकचे प्रजासत्ताक : अल्लाह हो अकबर
१६. हंगेरी – हंगेरीचे प्रजासत्ताक : " देवाच्या मदतीने माझ्या देशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी"
१७. फिजी – फिजी द्वीपसमुहाचे प्रजासत्ताक : "देवाला घाबरा आणि राणीचा सन्मान करा
१८. एल साल्वाडोर – एल साल्वाडोरचे प्रजासत्ताक : "देव, एकता आणि स्वातंत्र्य"
१९. इक्वेडोर – इक्वेडोरचे प्रजासत्ताक: "देव, मातृभूमी आणि स्वातंत्र्य"
२०. डॉमिनिका – डॉमिनिकाचे राष्ट्रकुल : " देवा नंतर पृथ्वी "
२१. डेन्मार्क – डेन्मार्कचे राजतंत्र : " देवाची मदत, जनतेचे प्रेम, डेन्मार्कचे सामर्थ्य "
२२. ब्रुनेई– ब्रुनेईचे राज्य : "देवाच्या मार्गदर्शनाने नेहमीच कामासाठी हजर"
२३. अमेरिका - अमेरिकेची संयुक्त संस्थाने : पारंपरिक: "विविधतेत एकता" , अधिकृत : "देव ज्यांच्यावर आमचा विश्वास आहे"

खाली दिलेल्या चित्रात देशांच्या मूळ भाषेतील , इंग्रजी व मराठीत अनुवादित राष्ट्रवाक्य/ब्रीदवाक्य देत आहे.

bridvakya

तुम्हाला अजून काही देशांच्या ब्रीद वाक्यातील 'देव' माहीत असल्यास सांगा.

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगले संकलन

चांगले संकलन. इथे दिल्याबद्दल आभार!
यापैकी

देवाला घाबरा आणि राणीचा सन्मान करा

हे वाचून अंमळ गंमत वाटली. इतक्या सरळ सरळ 'देव' या कंसेप्टचे प्रयोजन अधिकृतरित्या लिहिलेले अन्यत्र बघितले नव्हते.

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

+१

असेच म्हणतो.

-- येडा बांटू

गॉड आणि अल्लह

मुस्लिम आणि कॅथॉलिक धर्माचे बहुसंख्य लोक ज्या देशांत रहातात त्या देशांच्या सरकारांना आपण अल्लाह आणि गॉड यांना किती मानतो असा भ्रम भोळ्याभाबड्या जनतेच्या मनात निर्माण करणे आवश्यक असते. म्हणून ही नावे ब्रीदवाक्यात घुसडवलेली असतात. भारतातील सरकारला आपण किती सत्यप्रिय आहोत(?) असा भ्रम बहुदा जनतेच्या मनात निर्माण करायचा असावा.
चन्द्रशेखर

चाणक्यनीति

भारतातील सरकारला आपण किती सत्यप्रिय आहोत(?) असा भ्रम बहुदा जनतेच्या मनात निर्माण करायचा असावा.

हॅहॅहॅ हा तर चाणक्य नीती चा भाग
प्रकाश घाटपांडे

अमेरिका

बरीच नवीन माहीती समजली. चांगले संकलन.

अमेरिकेसंदर्भात त्यांच्या चलनावर आपण म्हणता तसे लिहीले आहे, तसेच त्यांच्या प्रतिज्ञेत (Pledge of Allegiance) मधे देखील "one Nation under God" असा उल्लेख आहे. मात्र तो तितकासा धार्मिक असण्यापेक्षा शीतयुद्धाच्या काळात धर्म आणि व्यक्ती/समाज स्वातंत्र्याच्या विरोधातील साम्यवादी विचारांना (आणि त्यांच्या म्होरेक्या तत्कालीन सोव्हीएट युनियनला) एक राजकीय उत्तर म्हणून देखील हे शब्द त्या एका ओळीच्या प्रतिज्ञेत घालण्यात आले होते. त्यावरून आता अधूनमधून "गॉड" कशाला म्हणून (इतर काही प्रश्नच नसल्यासारखे - उगाच) वाद चालतात. आणि मग "गॉड" का हे सांगताना अमेरिका हे ख्रिश्चन नेशन आहे, त्यामुळे आम्ही म्हणणारच असे म्हणणारे काही महाभाग असतात!

भाषांतर

फारच शब्दशः झालेले आहे. :-)

देवाला घाबरा आणि राणीचा सन्मान करा हे वाचायला मजेशीर वाटले.

मुहम्मद अल्लाह हा संदेशवाहक आहे.

हे मुहम्मद हा अल्लाहचा संदेशवाहक आहे असे म्हणायचे असावे का? मुहम्मदालाच अल्लाह म्हटल्याने काहीजणांचा अपमान होण्याची शक्यता आहे.

बरोबर

फारच शब्दशः झालेले आहे. :-)

फिजीच्या हिंदी विकिवरचा हा मराठीतला अनुवाद आहे.

"राष्ट्रवाक्य: Rerevaka na Kalou ka Doka na Tui
ईश्वर से डरो और रानी का सम्मान करो "

देवाला घाबरा आणि राणीचा सन्मान करा

"मुहम्मद हा अल्लाहचा संदेशवाहक " हे बरोबर आहे...

"मुहम्मद अल्लाह हा संदेशवाहक आहे." हे चूक आहे.... चूक मान्य.

आणखी एक सुधारणा

७. सौदी अरेबिया : "इथे कोणी देव नाही, केवळ अल्लाह आहे, मुहम्मद अल्लाह हा संदेशवाहक आहे."

अधोरेखित भाग हा "इथे अन्य कोणी देव नाही, केवळ अल्लाह आहे" असा असावा का?

बहुधा जवळजवळ असेच

"अल्लाह शिवाय अल्लाह नाही", किंवा "देवाशिवाय देव नाही" असे भाषांतर असावे.

पण मथितार्थ तुम्ही म्हणता तसाच असावा.

शंका

दोन्ही भाषांतरे कदाचित सयुक्तिक होऊ नयेत, असे वाटते.

मात्र "अल्लाहशिवाय देव नाही" हे कदाचित सयुक्तिक ठरावे.

यातील "अल्लाह" हे एका विशिष्ट देवाचे विशेषनाम आणि "देव" हे एका संकल्पनेचे नाव मानावे. "देव" या क्लासचे एक इन्स्टॅन्शिएशन "अल्लाह" हे व्हावे. मात्र, याव्यतिरिक्त दुसरे इन्स्टॅन्शिएशन होऊच शकत नाही (किंवा होऊ शकते असे मानणे हे पाखंड आहे), असा दावा आहे.

अवांतरः पाकिस्तानचे अध्यक्ष श्री. झिया उल्-हक यांच्या कारकीर्दीत पाकिस्तानात इस्लामीकरणाच्या नावाखाली 'खुदा हाफि़ज़' या वक्तव्यास अधिकृतरीत्या बंदी घालण्यात आली होती, असे कळते. किंबहुना रात्री प्रक्षेपण बंद करताना पूर्वी 'खुदा हाफि़ज़' म्हणणारी रेडियो पाकिस्तानची केंद्रेसुद्धा त्याऐवजी 'अल्लाह हाफि़ज़' म्हणू लागली होती. (आता काय म्हणतात याची कल्पना नाही.)

माझ्या अत्यल्प वाचनाप्रमाणे (संदर्भ नेमका आठवत नाही) या बदलामागील कारण असे देण्यात आले होते, की 'खुदा' हा फारशी मूळ असलेला शब्द हा केवळ 'ईश्वर' किंवा 'ईश्वरत्व' ही संकल्पना दर्शवतो, आणि 'अल्लाह' ही (इस्लामला मान्य असलेली) एकमेव ईश्वरकल्पना दर्शवत नाही. थोडक्यात, इस्लामपूर्व पारसदेशवासीयांची ईश्वरकल्पना किंवा तुमचाआमचा देवसुद्धा 'खुदा' या संकल्पनेने दर्शवला जाऊ शकतो - फारशीतज्ज्ञांनी योग्य तो खुलासा करावा - आणि 'अल्लाह' या इब्राहिमी धर्मांच्या किंवा इस्लामसंमत ईश्वरकल्पनेचे एकमेवाद्वितीय प्रतिनिधित्व 'खुदा' या शब्दाने होत नाही, या कारणास्तव 'खुदा' हा 'सेक्युलर' अतएव इस्लामी राष्ट्रात त्याज्य शब्द आहे, तर 'अल्लाह' या शब्दाने केवळ इस्लामसंमत अल्लाहचे एकमेवाद्वितीय प्रतिनिधित्व होत असल्याने इस्लामी राष्ट्रांत मुसलमानांकडून वापरण्यास योग्य असा तो एकमेव शब्द आहे.


"If you can't stand the heat, get out of the kitchen." - Harry S. Truman?

सहमत

यात त्या समाजाच्या आतील ईशशास्त्रातला (थियॉलॉजीमधला) अर्थ, आणि त्या समाजाबाहेरील तटस्थ (कंपॅरेटिव्ह रिलिजन स्टडी करतानाचा) अर्थ, यांत फरक होणार. आणि त्यांची तडजोड पूर्णपणे कधीच लावता येणार नाही.

यातील "अल्लाह" हे एका विशिष्ट देवाचे विशेषनाम आणि "देव" हे एका संकल्पनेचे नाव मानावे. "देव" या क्लासचे एक इन्स्टॅन्शिएशन "अल्लाह" हे व्हावे. मात्र, याव्यतिरिक्त दुसरे इन्स्टॅन्शिएशन होऊच शकत नाही (किंवा होऊ शकते असे मानणे हे पाखंड आहे), असा दावा आहे.

असा तुलनात्मक धर्मशाशास्त्रांतला अर्थ ठीक वाटतो सहमत.

पण कुठल्याही एका धर्मशास्त्रात (म्हणजे आंतर्गत शास्त्रात) त्यातील गृहीतके मूलगामी मानली जातात. जी वस्तू एकच आहे, तिच्यात "विशेषनाम" आणि "सामान्यनाम" असा फरक करता येत नाही.

उदाहरणार्थ, 'नव्या मुंबई'कडे नाक मुरडून एखादा अस्सल मुंबईकर म्हणेल :
"मुंबई ही एकच मुंबई आहे." (मुंबईवेगळी अशी मुंबई नाही.)
तटस्थ विचार करता, आपण असे म्हणू शकू की प्रत्येक वाक्यातील प्रथम "मुंबई" विशेषनाम आहे, आणि द्वितीय उल्लेख "मुंबईसारखी, स्वतःला 'मुंबई' म्हणवून घेणारी शहरे अशा अर्थाचे सामान्यनाम आहे. पण नाक मुरडणारा मुंबईकर बहुधा हे विश्लेषण स्वीकारणार नाही. तो म्हणेल "छे - मुंबईसारखे शहर असे (मुंबईवेगळे) असूच शकत नाही, तर ते अर्थ असलेले सामान्यनाम नाहीच नाही. माझे म्हणणे सोपे आहे - मुंबई नाही ती मुंबई नाही. हा 'क्ष-नाही तो क्ष-नाही' किंवा 'क्ष-आहे तो क्ष-आहे' असा प्राथमिक तर्कसिद्धांत आहे."

समाजविश्लेषणात आपल्याला विचार करायचा असतो, की लोक अमुक प्रसंगी काय कृती करतात. अशा परिस्थितीत व्यक्तीचे किंवा समूहाचे अंतर्गत तर्कशास्त्र आणि तटस्थ तर्कशास्त्र दोघांची ओळख असावी लागते.

"सामान्य" आणि "विशेष" या संकल्पनांनी गेली हजारो वर्षे तत्त्वचिंतकांना सतावले आहे. (लोकायितिक 'अनुमान' प्रमाण समजत नाहीत, म्हणजे बहुधा 'सामान्य" असे काही असल्याला अमान्य करतात. मीमांसकही "जाति=सामान्याची संकल्पना" अमान्य करतात. वगैरे.) त्यामुळे धर्मशास्त्रातला हा वाद संपणारा नाही.

कलिमाचा अर्थ आणि थोडा इतिहास.

कलिमाचा अर्थ आणि थोडा इतिहास.

इस्लामची संस्थापना होणेपूर्वी अर्बस्थानात अनेकेश्वरवाद अस्तित्त्वात होता. त्यामुळे अनेकेश्वरवादास खोडून काढणे हे एकेश्वरवाद्यांचे मुख्य तत्त्व ठरले. इस्लाम कुबूल करतानाचा सहा कलिमांपैकीचा पहिला शहादा अश्दु' अ'न ला इलाह् इल्ल् अल्लाह् व मुहम्मदुन् रसूल अल्लाह् असा आहे. ही आणि उर्वरित ५ कलिमा इस्लामपूर्व अनेकेश्वरवादाचे अस्तित्त्व सिद्ध करतांत.

أشهد أن لا إله إلاَّ الله و أشهد أن محمدا رسول الله

शब्दशः अर्थ याप्रमाणे :

  • अश्दु' अ'न = सत्यप्रमाणित करतो मी (की)
  • ला इलाह् इल्ल् अल्लाह् = नाहीत (दुसर्‍या कोणी) देवता शिवाय अल्लाह् च्या
  • व = आणि
  • मुहम्मदुन् रसूल् अल्लाह् = मुहम्मद हाच प्रेषित आहे अल्लाह् चा

येथे एकेश्वरवादाची (तत्कालीन अरब समाजास नवीन) अशी मतप्रणाली मांडण्यात आलेली आहे. अल्लाहच्याशिवाय दुसर्‍या देवता नाहीत असे सांगताना पूर्वीच्या अनेकेश्वरवादी मतप्रणालीला अमान्य करणात आले आहे; तदनुषंगाने अनेकेश्वरवादामध्ये असणार्‍या इतर देवतांची अधिकृत मान्यता 'रद्द' केली गेली आहे. अधिक माहिती साठी जिज्ञासुंनी इस्लामचे सहाही कलिमा अभ्यासावेत.

"अल्लाह शिवाय अल्लाह नाही", किंवा "देवाशिवाय देव नाही" असे भाषांतर करणे चूक आहे.

--
हैयो हैयैयो!

क्वांन्स्टण्ट वेरियेबल

"देव" या क्लासचे एक इन्स्टॅन्शिएशन "अल्लाह" हे व्हावे. मात्र, याव्यतिरिक्त दुसरे इन्स्टॅन्शिएशन होऊच शकत नाही (किंवा होऊ शकते असे मानणे हे पाखंड आहे), असा दावा आहे.

उदाहरण देण्यातील कल्पकता दाद देण्यासारखी असली तरी एखाद्या क्लासचे असे एकच एक इन्स्टॅन्शिएशन होत नसावे असा जावा भाषेच्या प्राथमिक माहितीवर आधारित एक अंदाज आहे. येथे कॉन्स्टण्ट वेरियेबल हे उदाहरण जास्त सयुक्तिक ठरावे. जाणकारांनी अधिक माहिती पुरवल्यास उत्तम.

public static final variableType देव = अल्लाह;


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अधिक विचार करावा लागेल

आपले प्रतिपादन रोचक आहे. यावर अधिक विचार करावा लागेल.

संकलन आवडले.

चांगले संकलन.
याच धरतीवर कष्ट, स्वातंत्र्य, न्याय इ.इ. उल्लेखांबाबत संकलन करता येईल.
पुढे इथे. :)

ऑस्ट्रियाचे ब्रीदवाक्य : It is Austria's destiny to rule the world - हे जबरदस्त वाटले.
युनायटेड किंग्डम चे ब्रीदवाक्य फ्रेंचमध्ये असावे याची गंमत वाटली.

गंमत

नेपाळ ह्या एकाच देशाचे ब्रीदवाक्य देवनागरीत आहे "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी(Devanāgarī)"
भारताचे "सत्यमेव जयते" (संस्कृत) हे ब्रीदवाक्य संस्कृत मध्ये आहे.

तुर्कस्तान तथा तुर्की- तुर्कस्तानचे प्रजासत्ताकचे ब्रीदवाक्य Peace at Home, Peace in the World, " घरामध्ये शांती, जगात शांती"

बोत्स्वाना - बोत्स्वानाचे प्रजासत्ताकचे ब्रीदवाक्य 'Pula' इंग्रजीत 'Rain' तर मराठीत 'पाऊस'

चांगले संकलन.

चांगले संकलन.
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ,हे पण संस्कृतच नव्हे काय?

 
^ वर