माझे नाडी ग्रंथ भविष्य लेखन कार्य भाग ६

माझे नाडीग्रंथ भविष्य लेखन कार्य
भाग 6 वा

...“महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती” ही एक “सर्कस” आहे... इति - बोध अंधश्रद्धेचा...
नाडीग्रथांवरील माझे लेखन वाचून सांगलीच्या श्री कुंभोजकरांनी कळवले की डॉ. जयंत नारळीकरांना आम्ही मानतो. त्यांचे मत आपण घ्यावे. त्यांनी जर नाडीभविष्याच्या अदभूततेला मान्यता दिली तर आमच्या सारख्यांना आपल्या लेखनावर विश्वास ठेवायला सोईचे जाईल. त्यांच्या प्रतिक्रियेचा मान ठेवून मी डॉ. नारळीकरांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना माझे 'चक्रावून टाकणारा चमत्कार - नाडी भविष्य' पुस्तक सप्रेम भेट दिले. त्यांनी मला आपला नकारात्मक अभिप्राय लेखी कळवून व अंनिसला त्या पत्राची प्रत पाठवून या विषयाची बोळवण केली.
त्यानंतर अंनिसचे कार्यवाह डॉ. दाभोळकरांनी पत्रव्यवहारातून, दै. पुढारी, अंनिवार्तापत्रातून भले मोठे लेख लिहून व चर्चा, सभा आयोजित करून हा विषय अंनिसच्या मुख्य कार्यावळीवर ठेवला. नंतर ज्योतिषशास्त्राच्या संदर्भातील अंनिसचा गड सांभाळणाऱ्या त्यांच्या दोन शिलेदारांनी पुढे लेखन कार्य चालू ठेवले. फारच गवगवा झाल्यावर ओंकार पाटील नामक व्यक्तीने तांबरमच्या नाडीकेंद्रास भेट देऊन नाडी भविष्यावर अंनिसची ऑफिशियल मतमांडणी केली. त्यावर पुस्तक ही प्रकाशित झाले.
एका बाजूला हे सर्व होत असताना ठाण्याच्या डॉ. विजय बेडेकरांनी अंनिसच्या विविध प्रकरणांतील खरेखोटेपणावर प्रकाश टाकणारे ‘शोध अंधश्रद्धेचा’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले होते. नाडीग्रंथ भविष्यावरील प्रकरणात अंनिसशी झालेला प्रदीर्घ पत्रव्यवहार व अन्य लेखनावर आधारित एकूण 70 परिशिष्ठांनी गच्च भरलेला आहे. तो पाहून त्याचे पुस्तकात रुपांतर करणे ही ऐतिहासिक गरज आहे असे वाटून त्यांनी प्रकाशन करायचा निश्चय केला व 26 जानेवारी 1999 ला 'बोध अंधश्रद्धेचा अर्थात नाडी भविष्यने केला अंनिसचा पराभव' या उपशीर्षकाचे पुस्तक तयार झाले. (किंमत 150 रुपये.) त्याची एक प्रत दाभोळकरांना दिली गेली. त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात या पुस्तकातील माझ्या लेखनाची तिरकसपणे उल्लेख करून दखल घेतली गेली. मात्र त्यानंतर ते वा त्यांचे चेले नाडी ग्रंथांच्याशी आपले काही देणे घेणे नाही असे दाखवून आहेत.

‘बोध अंधश्रद्धेचा’ पुस्तकाच्या मागील कव्हरवरील खालील मजकूर सर्व सांगून जाईल. खरे तर मला याबाबत आणखी लिहायला रस नाही. तरीही या लेखमालेचा भाग म्हणून मी या पुस्तकाच्या संदर्भातील छोटी झलक दाखवतो. अर्थात वाचकांना या विषयावर अघिक माहिती माझ्या या पुस्तकातून उपलब्ध होईल. ती त्यांनी वाचावी ही विनंती.
 ...“महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती” ही एक “सर्कस” आहे. आपण (दाभोळकर) या सर्कसचे रिंगमास्टर असल्याने, “माझ्या रिंगणात या, मग मी तुम्हाला कसा लोळवतो ते पहा” असा आपला पवित्रा तुमच्या दृष्टीने शास्त्रीय पायावर आधारित पण भविष्यकाळात कसेही करून अंग काढून पसार व्हायला सोईचा आहे. तथापि, या इथे नाडी भविष्यकर्ते महर्षी “हे रिंगमास्टर” आहेत! भविष्याच्या आसूडाला तो “थोतांड” म्हणून आव्हान देऊन आपण रिंगणात उतरला आहात! वर्तमानपत्रातून परिपत्रके काढून व लेख लिहून मला मधे घालून, “पहा या रिंगमास्टरची कशी ऐशी की तैशी करतो! नाहीतर 5 लाख देतो”! असे डरकाळ्या फोडणारे आवाज आपण वेळोवेळी साताऱ्यात बसून काढता! मात्र मद्रास भागातील नाडीकेंद्रास भेटी देण्याचे नाव काढत नाही. कारण तेथे जाऊन पराजित झाल्यामुळे अंनिसला व पर्यायाने आपल्याला तोंड काळे करुन घ्यायचे नाही!”
 ... “आपल्या ‘अंनिस सर्कस’ चालायचे दिवस आता फार जिकिरीचे झाले आहेत. प्रवीण कसरत पटू शिष्यगण आपणांस सोडून गेले आहेत. इतर शिलेदारांनाही आपल्या आसुडाचा बेगडीपणा लक्षात आला आहे. वर्तनामानपत्रवाले एकजात आपल्या विविध कृत्यांना आपल्यामागे कुत्सितपणे हसून नावे ठेवतात. मात्र तोंडावर व वर्तमानपत्रात नावे ठेवायला आपल्या सर्कसचा दरारा मोठा असल्याने टाळतात. पण जे आपल्या कल्पनाविश्वात तल्लीन असतात अशा आपणांस हे लक्षात आलेले नाही...
 ...नाडी भविष्याबाबत आपल्या समितीचे मद्रासला पानिपत (वॉटर्लू) होणार हे ओळखून आपण तिकडे गेला नाहीत तरी न जाताच स्वतःच्या घरी (महाराष्ट्रात) न जाण्यानेच तिचे पानिपत झाले आहे. समितीचा मुकुट येथेच धुळीला मिळाला आहे ...
 ... अपरोक्ष वाद घालण्यापेक्षा पुण्या-मुंबईत, उभयतांच्या सवडाने केंव्हाही एका व्यासपीठावर वाद–संवाद करायला ओक तय़ार आहेत. मात्र त्याआधी दाभोळकर व नारळीकरांनी स्वतःच्या व अन्य 10 जणांच्या संदर्भात नाडी भविष्याची शास्त्रीय कसोटी मद्रासला जाऊन ओकांच्या उपस्थितीत करून घ्यावी लागेल. अशी अट यासाठी की त्यांच्या उपस्थिती शिवाय कसोटी न करता केलेली चर्चा निरर्थक होईल... त्यामुळे अंनिसने अन्य कितीही ओंकारांना पाठवून काहीही उपयोग नाही.
 ...“त्यामुळे सवंग जाहिरात करण्यासाठी केलेली कुठलीही कृती अंनिसचा बेगडीपणा निर्णायकपणे उघडकीस आणेल.”
वरील लेखनातील मद्रासला जाऊन नाडी भविष्याची शास्त्रीय कसोटी करा. असे 1996-97 सालातील तात्कालिक घटनाक्रमातून लिहिले गेले होते. आता परिस्थिती फार बदललेली आहे. आता इच्छा असेल तर अशी कसोटी घ्यायला इतके दूर जायची ही गरज उरलेली नाही. नाडी ग्रंथ केंद्रे पुणे, मुंबई, नागपूर नव्हे कोल्हापुर, नाशिक, जळगाव-धुळे, अकोला सारख्या ठिकाणीही उपलब्ध आहेत.
कदाचित यावर अधिक लिखाणासाठी विचारणा केली गेली तर पुढे पाहू.

लेखनविषय: दुवे:

Comments

नाडी

मला भविष्य नाडी, फीत, पट्टी, दोरी वगैरे संबंधी फारसे काही कळत नाही पण ही नाडीचर्चा वाचून नाडीने माझा गळा आवळला गेल्यासारखे वाटू लागले आहे.
चन्द्रशेखर

चंद्रशेखर काका

चंद्रशेखरकाका नाडीचर्चा वाचून गळा आवळल्यावानी होऊन राह्यला तव्हा-
तुम्हाला हे लेख वाचाच असा आग्रह कोनी धरला ?

लिव्हणार्‍याला लिहून द्या.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

बाबुराव

अहो बाबुराव
आदुगर वाचल्याबिगर कस काय समजनार् चंद्रशेखरना कि गळा आवळल्यावानी व्हतोय का नाई?आन ते कव्हा म्हन्ले कि लिहु नका! आता त्येन्ला तरास झाला म्हनुन ते तस बोल्ले. आता चार मान्स यका ठिकानी आल्याव व्हनारच ना थ्वॉड हिकड तिकडं
आमाला नाई तरास् होत ब्वॉ!
प्रकाश घाटपांडे

वाईट वाटले

शशि ओक,

तुमचे लेख वाचुन मला चित्पावन असल्याची शरम वाटली.
कुठे ते समाजसुधारक, बुद्धिप्रामाण्यवादी असे महर्षी कर्वे, र धो कर्वे, आगरकर, सावरकर आणि कुठे तुम्ही काळाच्या मागे धावणारी ओक वर्तक मंडळी.. छ्या!!

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

भावनाविवशता.

भावनाविवशता.

लिमये साहेब, असे भावनाविवश होऊ नका. विचारप्रणालीस 'भावना' हे योग्य प्रत्युत्तर नव्हे. आपण समाजसुधारक आणि बुद्धिप्रामाण्यवादी लोकांचा वारसा सांगता, तेंव्हा एवढा साधा सरळ एक विचार आपणांस उमजण्यास काही प्रत्यवाय नसावा.

तात्पर्य : विचारप्रणालीस योग्य प्रत्युत्तर काय असू शकते ह्याचा विचार व्हावा.

--
तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु!

हैयो हैयैयो!

 
^ वर