भेटेन नऊ महिन्यांनी

प्रति,
समस्त उपक्रम वाचकवर्ग

सप्रेम नमस्कार,
खाली नमूद केलेला विषय हा प्रत्येक घरातील जिव्हाळ्याचा विषय आहे ह्यात दुमत नसावे. त्यामुळे ह्या चर्चेच्या प्रस्तावाला यथायोग्य व चांगला प्रतिसाद मिळेल व तो सर्वांना उपयुक्त मार्गदर्शनात्मक ठरेल अशी आशा आहे.

स्त्रीला लाभलेले मातृत्वाचे वरदान ही निसर्गदेवतेची अनमोल देणगी आहे.
हे मातृत्व अनुभवताना पहिल्या नऊ महिन्यांच्या काळात ती जो त्रास सहन करते तो वास्तविक तिचा दुसरा जन्मच असतो.

ह्या विषयावर चर्चा करताना वाचकांनी वैद्यकशास्त्र आणि ज्योतिष शास्त्र अशी दुहेरी मते मांडावीत असे अपेक्षित आहे.

(१) वैद्यक शास्त्र - गर्भवती स्त्रियांचा प्रत्येक महिन्यातील आहार, त्यांचे राहणीमान, गर्भ संस्कार आणि घ्यावयाची इतर काळजी.

हेतू - डॉक्टरांनी केलेल्या सूचना / मार्गदर्शन व घरातील ज्येष्ठ व अनुभवी व्यक्तिंनी सांगितलेल्या गोष्टी ह्यात अनेकवेळा साधर्म्य / तफावत आढळते.

(२) मुलाची/मुलीची जन्मपत्रिका - कोणत्या आधारावर तयार केली जाते? बाळाचा खरा जन्म कधी होतो? नऊ महिन्यांनंतर कि पहिल्या महिन्यातच?

हेतू - अशा पत्रिकेच्याआधारे सांगितले जाणारे ज्योतिष वा भविष्य.

लेखनविषय: दुवे:

Comments

असाच एक विचार

एक विचार मनात आला.. मुलाचा जन्म होतो तेव्हाच एक 'आई' जन्मते.. तर मग मुलाला जन्म देणारी आई थोर का 'आई'चा जन्म करवणारे मुल?

बाकी वैद्यकशात्र व आपणास अपेक्षित असणारे फलज्योतिष दोन्हीमधे गती नाहि. चर्चा वाचण्यास उत्सूक आहे

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

आई

>>तर मग मुलाला जन्म देणारी आई थोर का 'आई'चा जन्म करवणारे मुल

बाळा होऊ कशी उतराई? तुझ्यामुळे मी झाले आई.
समाजाची धारणा अशी असेल का?

माहिती

२) मुलाची/मुलीची जन्मपत्रिका - कोणत्या आधारावर तयार केली जाते? बाळाचा खरा जन्म कधी होतो? नऊ महिन्यांनंतर कि पहिल्या महिन्यातच?
हेतू - अशा पत्रिकेच्याआधारे सांगितले जाणारे ज्योतिष वा भविष्य.

अधिक माहिती साठी उपक्रमावरच येथे प्रश्न क्र १२ व १३ पहा
प्रकाश घाटपांडे

 
^ वर