उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
व्यासपीठ - एक नविन मराठी संकेतस्थळ
छावा
August 25, 2009 - 6:24 pm
राम राम मंडळी,
आपल्याला एका नविन संकेतस्थळ व्यासपीठ ची माहिती देण्याचा हा प्रयत्न.
व्यासपीठ हे एक नविन संकेततस्थळ मराठी लेखक आणि वाचकांसाठी सुरु करण्यात आलेले आहे. हे एक मुक्त लेख निर्देशिका संकेतस्थळ आहे.
आपण येथे कुठल्याही विषयावर लेख लिहून तो व्यासपीठ द्वारे प्रकाशित करू शकता. तसेच व्यासपीठावर प्रकाशीत झालेले साहित्य तुम्ही दुसर्या संकेतस्थळावर पण पुन्रप्रकाशीत करु शकतात.
प्रत्येक जण कुठल्या न कुठल्या विषयात तज्ञ असतो, त्या प्रत्येकाचे ज्ञान/अनुभव व्यासपीठ ह्या संकेतस्थळाद्वारे मराठी मध्ये यावे आणि मराठी भाषेतील ज्ञान भंडार वाढावे त्याकरिता हा एक छोटासा प्रयत्न.
तुमचा प्रतीसाद जरुर कळवा.
धन्यवाद
दुवे:
Comments
अभिनंदन आणि शुभेच्छा!
नव्या संकेतस्थळाबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा!
असेच
म्हणतो. अभिनंदन आणि शुभेच्छा!
----
"कॅमरे में रील चले या न चले, स्टीव्हन कपूर ऐसा डायरेक्टर है जिसके दिमाग में हमेशा रील चलती रहती है."
चांगले व्यासपीठ आहे
चांगले व्यासपीठ आहे. लोकायत टिमचा प्रयत्न वाटतो आहे. आणखीन एक ड्रुपल आधारीत संकेतस्थळ. चांगले आहे.
छान
छान मांडणी आहे. नियम व अटी इतक्या स्पष्टपणे देणारे बहुदा पहिलेच संस्थळ असावे(चुभुद्याघ्या) त्या पारदर्शकतेबद्द्ल आभार व अभिनंदन
स्थळ उत्तमोत्तम लेखांनी बहरो ही (माझ्यासारख्या वाचनप्रिय माणसाचा थोडा स्वार्थ दडलेली ;) )सदिच्छा!
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
सहमत / अभिनंदन / शुभेच्छा
अधोरेखिताशी पूर्णपणे सहमत आहे. नियम अतिशय स्पष्ट आणि ग्राह्य आहेत. किंबहुना 'तुम्ही लेख फक्त एकाच लेखन प्रकारात टाकू शकता. आम्ही समजतो की एक लेख दुसर्या पण प्रकारात टाकता येऊ शकतो पण आम्ही ह्याला स्पामिंग समजतो. तरी असा प्रयत्न करू नका. तुमचे साहित्य व्यासपीठ वरून काढून टाकण्यात येइल आणि तुमचे सदस्यत्व रद्द करण्यात येइल.' या एकाच नियमाच्या व्यवहार्यतेबद्दल किंचित साशंक आहे (कारण प्रत्येकवेळी एखादे साहित्य अशाप्रकारे एखाद्या रकान्यात असंदिग्धपणे बसवता येईलच असे नाही), परंतु नियमामागची भूमिका समजू शकतो आणि नियमपालनाबाबतीत काही संदिग्धतेची अडचण आल्यास तिच्या निवारणाकरिता काही उपाय योजला जाऊ शकेल याची खात्री आहे.
संकेतस्थळाचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
"You can fool some of the people all of the time, and all of the people some of the time, but you can not fool all of the people all of the time." -Abraham Lincoln?????
"Fool me once, shame on you. Fool me twice, shame on me!" - An English Proverb.
लेखन् वर्गवारी
एका लेखन वर्गवारीतील साहित्य अनेक वर्गवारीत टाकुन वाचकांचा गोंधळ होऊ नये तसेच लेखन वर्गवारीची प्रक्रिया सुलभ व्हावी ह्या करीता हा नियम आहे तरी सुद्धा आपल्याला काही अडचण असल्यास व्यासपीठ व्यवस्थापन ह्यावर जरुर विचार करेल.
धन्यवाद
आभार / एक प्रश्न
आधी म्हटल्याप्रमाणे, नियमामागची भूमिका समजू शकतो.
गरज पडल्यास मार्ग निघू शकेल आणि काढला जाईल याबद्दल विश्वास आहेच. आश्वासनाबद्दल आभारी आहे.
एक प्रश्न: एखाद्या विषयाबद्दलचे ज्ञान / अनुभव / विचार हे मराठीत यावेत हा संकेतस्थळाचा उद्देश पूर्णपणे ध्यानात ठेवून, लेखनाच्या शैलीबद्दल काही पूर्वअटी / बंधने / नियम वगैरे काही आहेत काय? जसे, पूर्णपणे ललितसाहित्य या सदरात मोडू शकणारे (उदा. कथा वगैरे) असे काही (तसा नियमांमध्ये स्पष्ट उल्लेख नसला तरी) अपेक्षित नसावे, असे वाटते, आणि तसे असल्यास ते समजण्यासारखेही आहे. परंतु एखाद्या वैचारिक लेखात प्रस्तावनात्मक किंवा उदाहरणादाखल एखादी कथा, रूपक, anecdote अशा स्वरूपाचे काही माफक ललितलेखन अंतर्भूत झाल्यास ते नियमांस अनुसरून व्हावे काय? याबद्दल नेमके नियम काय आहेत? (थोडक्यात, लेखन ललितस्वरूपाचे नसल्यास, परंतु त्यात म्हणणे स्पष्ट करण्यासाठी गरज भासेल तेथे ललितशैलीचा आधार घेतल्यास, असे लेखन ग्राह्य ठरावे काय?)
"You can fool some of the people all of the time, and all of the people some of the time, but you can not fool all of the people all of the time." -Abraham Lincoln?????
"Fool me once, shame on you. Fool me twice, shame on me!" - An English Proverb.
ललित् लेखन्
संपुर्ण लेखन जर ललितस्वरूपाचे असेल तर त्या करीता एक नवीन लेखन वर्गवारी करता येऊ शकते. व्यवस्थापन ह्यावर जरुर विचार करेल.
एखाद्या वैचारिक लेखात प्रस्तावनात्मक किंवा उदाहरणादाखल एखादी कथा, रूपक, anecdote अशा स्वरूपाचे काही माफक ललितलेखन अंतर्भूत झाल्यास ते नियमांस अनुसरून व्हावे काय?
होय ते नियमास धरुन होईल. कारण ते लेखन एखाद्या विषयास धरुन केलेले असल्याने त्यामध्ये प्रस्तावनात्मक किंवा उदाहरणादाखल एखादी कथा, रूपक, अशा स्वरूपाचे काही माफक ललितलेखन अंतर्भूत करता येईल.
धन्यवाद
आभार
शंकानिरसनाबद्दल आभारी आहे.
शुभेच्छा
संकेतस्थळ लगेच पुस्तकखूण घालून ठेवले. परत भेट देईनच.
चन्द्रशेखर
शुभेच्छा...
व्यासपिठाला माझ्या व आमच्या मिसळपाव परिवारातर्फ अनेकानेक शुभेच्छा!
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
अभिनंदन आणि शुभेच्छा
नव्या संकेतस्थळाला अभिनंदन आणि शुभेच्छा.
असेच म्हणतो
अभिनंदन आणि शुभेच्छा.
शुभेच्छा...!
व्यासपीठ मराठी संकेतस्थळाच्या वाटचालीला हार्दिक शुभेच्छा......!
हे एक मुक्त लेख निर्देशिका संकेतस्थळ आहे.
मुक्त लेख निर्देशिका संकेतस्थळ म्हणजे काय?
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
सामासिक शब्द
मुक्तलेखनिर्देशिकासंकेतस्थळ. हा एक सामासिक शब्द आहे, असाच लिहायला पाहिजे.म्हणजे हवा तसा अर्थ लावून घेता येईल.
यावरून मोरो केशव दामल्यांच्या ,शास्त्रीय मराठी व्याकरणा'च्या पुस्तकातली "भाषेचें मूल स्वरूप एकच आणि तें म्हणजे विशिष्टकल्पनावाचकसांकेतिकविशिष्टशब्दमय म्हणजे भाषण(बोलणें) होय", ही व्याख्या आठवली. --------वाचक्नवी