आणखी एक फाळणी
पै. जिनासाहेब यांना १९४७ मधे झालेल्या फाळणीचे शिल्पकार म्हणले जाते. परंतु आपल्या मृत्युनंतर अर्धशतक झाल्यावर आपण परत एका फाळणीचे शिल्पकार बनू असे कधी त्यांच्या स्वप्नातही आले नसेल. ही दुसरी फाळणी झाली आहे भाजपा आणि त्यांचे एक खंदे सैनिक् जसवंतसिंह यांच्या मधे. म्हणजे प्रथम दर्शनी तरी तसे वाटते आहे. जसवंतसिंह तसे नेहमीच वादग्रस्त असतात. विमान अपहरण घटनेत, त्यावेळी भारताचे परराष्ट्रमंत्री असलेले हे गृहस्थ, एका अतिरेक्याला घेऊन स्वतःच कंदाहारला गेले होते. परवाच्या निवडणूकीच्या आधी लोकांना पैसे वाटत असल्याचा स्वतःचा फोटोही त्यांनी वर्तमान पत्रात छापू दिला होता. आता हे सद् गृहस्थ परत एकदा वादात सापडले आहेत.
या सगळ्या वादविवादात एक गोष्ट मला तरी समजली नाही. जसवंतसिंहजींनी त्यांचे हे पुस्तक प्रसिद्धीच्या आधी इतर भाजपा नेत्यांना आणि मुख्य म्हणजे नागपूरकडे दाखवून त्यांची मान्यता घेतल्याशिवाय प्रसिद्ध केले असेल असे मान्य करणे, भाजपाचा आणि त्यांच्या नेत्यांचा पूर्व इतिहास बघता, खूप कठिण वाटते. त्यामुळेच हे वादळ उठवले गेले आहे अशी शंका आल्यावाचून रहात नाही. दुसरे म्हणजे या पुस्तक प्रसिद्धीची घटना आणि भाजपाने आता तरूण नेत्यांना तयार करावे हा आदेश, एकाच आठ्वड्यात येणे हे ही काही योगायोगाची गोष्ट वाटत नाही. त्यामुळेच एका मोठ्या गेम प्लॅनची ही पूर्वतयारी असावी असे वाटते.
आपल्याला काय वाटते?
Comments
फार्स
या सर्वाला फार्स म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. काल याविषयी इंडिया टिव्हीवर चर्चा पाहिली. जे चालले होते त्याला चर्चा म्हणणे म्हणजे राहुल रॉयला अभिनेता म्हणण्यासारखे आहे. त्यातील काही मुद्दे.
हे पुस्तक निवडणुकीच्या आधीच तयार होते पण निवडणुका होईपर्यंत थांबावे असे जसवंत सिंग यांना सांगण्यात आले. ते का? तर म्हणे पुस्तक जिनांवर आहे म्हणजे नक्कीच वादग्रस्त असणार असे आम्हाला वाटले. म्हणून थांबायला सांगितले. :प्
आज जसवंत सिंग म्हणत आहेत की अपहरणाची अडवाणींना कल्पना होती. मग निवडणुकांच्या आधी तुम्ही कल्पना नव्हती असे खोटे का सांगितले? तर म्हणे माझी चूक झाली. मी अडवाणींना पाठीशी घालत होतो.
भाजपच्या पराभवाचे विश्लेषण करणार्या समितीने अडवाणी, मोदी यांना पराभवासाठी जबाबदार धरले आहे. गुप्त चिंतन बैठकीत याचा उल्लेख झाला का? असल्यास त्यांच्यावर कारवाई होणार का? हे तो ईश्वरच जाणे.
काल शेवटी वैतागून मुलाखतकाराने विचारले, "तुम्ही सर्व पक्ष आपापल्या आयडीऑलॉजींच्या टिमक्या वाजवत असता. हाऊ सीरीयस आर यू अबाउट इट? कारण जवळपास कुठलही पक्ष सत्तेसाठी कुणाशीही युती करू शकतो."
असो. यावर कितीही टंकले तरी कमीच आहे. लोक परत एकदा धर्माच्या राजकारणाला फसले नाहीत ही त्यातलेत्यात समाधानकारक गोष्ट.
----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
उत्तर
चांगला प्रश्न. पण त्याचे उत्तर असे आहे : "We [and this stands for almost any political party in India aka Bharatamata] are as serious about our idelogies as are the voters serious about them."
शिवसेनेसारख्या पक्षात राहून हिंदूत्वाचे गोडवे गाणारा नेता कॉंग्रेसमधे जातो व तेव्ह्ढ्याच उत्साहाने तात्काळ उलटी भाषा बोलू लागतो. पण त्याच्या प्रदेशात त्याची लोकप्रियता तसूभरही कमी होत नाही. हे एक उदाहरण दिले. असेच सर्वकाळ चालू असते. फक्त कम्युनिस्ट नेते असे दलबदल करतांना आढळले नाहीत. पण त्यांच्या युत्या बरेचदा तत्वहीन असतात. तरीही त्यांच्या बालेकिल्ल्यात लोकप्रियता कमी नाही.
तेव्हा जिथे मतदारांना आपल्या हाती असलेल्या अधिकारच्या अर्थाची जाणीव नाही, तेथे त्यांचा फायदा करून घेणार्यांचे काय हो?
सहमत
सहमत आहे.
हा प्रश्न थोडासा कोंबडी-अंडे सारखा वाटतो. आधी मतदारांनी बदलायचे की राजकारण्यांनी? सुरूवात कुठे, कशी होणार? आणि मतदारांनी बदलायचे म्हटले तर त्यासाठी मतदारांची जागरूकता वाढली पाहिजे. म्हणूनच अमेरिकेत निवडणूक आरोग्य किंवा परराष्ट्र धोरण अशा मुद्यांवर लढवली जाते. भारतात राम-मंदीर हा मुद्दा ठरतो.
अर्थात अमरूही फार ग्रेट आहेत अशातला भाग नाही. जॉर्ज बुशला एकदा नव्हे दोनदा (अबब!) निवडून दिले यातच सर्व आले.
----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
फार्स : अंक दुसरा
आत्ताच जसवंत सिंग यांची आज की अदालत मध्ये मुलाखत पाहिली. त्यांच्या म्हणण्यानुसार पुस्तक प्रकाशित होण्याची वेळ आणि त्यांना बडतर्फ करण्याची वेळ यातील अंतर लक्षात घेतल्यास पुस्तक पूर्ण न वाचताच हा निर्णय घेण्यात आला असे वाटते. ७०० पानांचे पुस्तक वाचून, त्याचे विश्लेषण करून, निर्णय घ्यायला जो वेळ लागेल तो इथे अजिबात लागला नाही. किंवा पुस्तक स्पीड रीडींगने वाचले असावे. :प
मुलाखतीमध्ये त्यांनी कुणावरही वैयक्तिक टीका करण्याचे टाळले. पुस्तकात जीनांचा गौरव केला आहे या मताशीही ते सहमत नव्हते. त्यांच्या मतानुसार जीना हे व्यक्ती म्हणून चांगले असले तरी त्यांचे राजकारण abhorrent होते. फाळणी आणि टू नेशन थिअरीवरही त्यांनी टीका केल्याचे म्हटले आहे. फाळणीसाठी जीना एकटे जबाबदार नव्हते, त्यात अन्य नेत्यांचाही समावेश होता असे त्यांचे म्हणणे आहे.
पुस्तक वाचा. वाचल्यानंतर जर मला दोष द्यायचा असेल तर द्या असे त्यांचे म्हणणे होते. आणि हे सयुक्तिक वाटते. पुस्तक न वाचता त्याच्याविषयी मत प्रदर्शित करणार्यांचा संत रामदासांनी दासबोधात केलेला उल्लेख आठवतो.
----
"And ye shall know the truth, and the truth shall make you free." -- John 8:32
फाळणी- उपजत की संस्कारित
फाळणी- उपजत की संस्कारित असे शिर्षक दिले असते तरी चालले असते. ;)
प्रकाश घाटपांडे
पुढचा
नंबर अरुण शौरींचा का? सुधीद्र जोशीही गेले. चौतालांशी फाटले.
अशाने कुणीच रहाणार नाही, आता उरले अडवाणी आणि भावी पंतप्रधान मोदी.
पक्षाची अवस्था कटी पतंग आहे -- अरूण शौरी :प्
----
सुदर्शन चक्र
या चर्चा विषयासंबंधीची आजची सुदर्शन चक्राची बातमी वाचून(टाइम्स ऑफ इंडिया) मला असलेली मोठ्या गेम प्लॅनच्या शंकेची आता खात्रीच होत चालली आहे. थोड्याच दिवसात भाजपात मोठे बदल होणार असे दिसते आहे.
चन्द्रशेखर
सुदर्शन चक्र
आजचे वर्तमानपत्र ज्यांनी वाचले असेल त्यांना सुदर्शन चक्र कोणाचा बीमोड करण्यासाठी निघाले होते त्याची कल्पना आली असेलच. जसवंतसिंहाच्या पुस्तक प्रकरणापासून सुरू झालेल्या भाजपा नेत्यांच्या गेम प्लॅनची आता कल्पना यावी.
चन्द्रशेखर
वसुंधराराजे आणि जसवंत
दुसऱ्यांच्या घराणेशाहीला/हुकूमशाहीला नावे ठेवणाऱ्या पक्षाची अंतर्गत स्थिती कशी आहे हे या निमित्ताने उघड झाले. 'मी हसे लोकांना, शेंबूड माझ्या नाकाला' ही एकंदरीत मराठी संकेतस्थळांपासून ते देशव्यापी पक्षांपर्यंत सार्वत्रिक परिस्थिती आहे हेही अधोरेखित झाले.
वसुंधराराजे आणि जसवंत यांचे विळ्याभोपळ्याचे सख्य लक्षात घेता नजीकच्या भूतकाळात वसुंधराराजेंनी केलेले बंड आणि जसवंतांना हाकलून दिल्यानंतर शमलेले वादळ यांचा संबंध सूचित करणारी अनेक विधाने च्यानेलांवर पाहण्यात आली.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
नेहरु आणि पटेल
नेहरू आणि पटेल हेच फाळणीचे शिल्पकार. सत्तेच्या लालसेतून यांनी फाळणीला तात्काळ मान्यता दिली. फाळणी झाली नसती तर आता ज्यांच्या नावाने हिंदुत्त्ववादी पक्ष बोंबाबोंब करत आहेत ते पाकिस्तानी, बांगलादेशी सगळे भारतात असते, त्यांना पोसणे परवडले असते का? मग कोणत्या संघाच्या विरोधात ग्राउंड उखडले असते? हा प्रश्नही पडतोच.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
भाजपा म्हणजे कु क्लक्स क्लॅन :))
जसवंतसिंहांना भाजपा म्हणजे कु क्लक्स क्लॅन असल्याची उपरती झाली आहे असे दिसते. इतके दिवस पक्षाच्या पाठबळावर सत्ता भोगताना समजले नाही वाटते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
तितकेसे पटले नाही
(परिस्थितीबद्दलच्या वैयक्तिक माहितीअभावी श्री. जसवंतसिंहांच्या हृदयपरिवर्तनामागील प्रामाणिकपणाबद्दल किंवा प्रामाणिकपणाच्या अभावाबद्दल कोठल्याही बाजूने काहीही बोलू शकत किंवा इच्छीत नाही, पण...)
एखाद्या व्यक्तीचे मतपरिवर्तन होणे हे तितकेही अशक्यकोटीतले, गैर किंवा नेहमीच संशयास्पद नसावे असे वाटते.