उपक्रमी

सध्या उपक्रमला झाले आहे तरी काय? सगळेच उपक्रमी स्वाईन फ्ल्यूने मरगळले की काय? एकीकडे शरदजी आपल्याला महाभारताचे डोसावर डोस पाजत आहेत तर दुसरीकडे पूर्वांचल आपल्याला मेघालय आणि ईशान्य भारतातून गरगर फिरवित आहेत. दोन्ही लेख माला छानच आहेत याबद्दल प्रश्नच नाही पण श्रीखंड गोड लागते म्हणून किती दिवस खायचे? काहीतरी गरमागरम चटकदार लज्जतदार येऊद्या की मंडळी!

लेखनविषय: दुवे:

Comments

तक्रार

मी सध्या एका लज्जतदार ब्लॉगवर वाचत आहे. खरच एक अतिशय सुंदर ब्लॉग.

:-)

आवडला

चंद्रशेखरजींचा ब्लॉग आवडला.
प्रकाश घाटपांडे

वेळ

स्वाईन फ्ल्यू वगैरे काही नाही हो. कार्यालयातले इंटरनेट फुकटात असले तरी हल्ली कामात जास्त घालावे लागत असेल अनेकांना नाहीतर नोकरीवर गदा. त्यामुळे बरेचजण वाचनमात्र असावेत. तुम्ही टाका एखादी चटकदार लेखमाला.






कावळीचा फोटो

कावळ्याचे माहितीपूर्ण फोटो झाले आता कावळीचा टाकतो. मिळेलच काहीतरी गरमागरम लज्जतदार.

-राजीव.

ह्म्....

येकदम सहमत चंद्रशेखरराव!

हा लेख अतिशय गंभीरपणे घेण्यासारखा आहे.

बरीच टिपणे काढून ठेवली आहेत. नवीन लेखावर आता शेवटचा हात फिरवायची वेळ आली आहे वाटतं. :-)

-सौरभ.

==================

 
^ वर