प्लूरसी : एक अनुभव

माझ्या मुलाचा जन्म १९८१ साली झाला. त्यानंतर दीड वर्षाने पत्नीला एक दिवस ताप आला. औषध सुरू केले. तथापि गुण येईना. दुसरीकडे दाखविले. प्लूरसीचे निदान झाले. ठराविक औषधाचा कोर्स सुरू झाला. दर महिन्याला घेतल्या जाणार्‍या एक्स्-रे मधे पांढरा सिस्ट दिसायचा. तो तसाच दिसणार, त्याने कांही त्रास् होत नाही वगैरे सांगितले गेले. विचारातून हा विषय जाईना. माझ्या वाचनात आलेल्या कांही उल्लेखांची आठवण झाली. वंशलोचन कफ खरवडून् काढते आणि तालिसादि चूर्ण कफ पातळ करते, याचे स्मरण झाले. बाजारातून वंशलोचन प्रमुख घटक असलेले सितोपलादि चूर्ण व तालिसादि चूर्ण आणले. दोन्ही समप्रमाणात मिसळून इतर औषधांबरोबर ते दुधातून दिले. महिन्याने काढलेल्या एक्स्-रे फोटोत सिस्ट्चा पांढरा भाग गेलेला होता ! त्यावेळी मुंबईतील राधीबाई वाटूमल इस्पितळात पत्नी उपचार घेत होती. असेच कांही अनुभव नंतर.

लेखनविषय: दुवे:

Comments

व्वा ! चांगला अनुभव..!

गोल गरगरीत पोटाचा वाढलेला आकार कमी करण्यासाठी काही औषध आहे का ?
कडवट, वासाने ओकारी येणारे, कसलेही औषध असले तरी घेईन.
फक्त गुण शंभर टक्के यायला हवा.

-दिलीप बिरुटे

पण

वा आपला अनुभव रोचक वाटला.
आधुनिक वैद्यक अपूर्ण आहे यात शंका नाही. (ते शास्त्र आहे की नाही हा वेगळा भाग!)

एक कुतुहल मात्र आहे की,

हा कफच आहे हे कसे शोधले? किंवा अंदाज आला?
कारण वैद्यकात निदान करता येणे हाच मोठा भाग आहे.

असो,
यावर अजून अनुभवही वाचायला आवडतील.

आपला
गुंडोपंत

वेगळा विषय

उपक्रमावर वेगळा विषय वाचून बरे वाटले ;)

अगदीच त्रास होत असेल तरच मी ऍलोपथीच्या वाटेला जातो तोही फक्त त्रास शमण्यापुरता. त्रास कमी होताच आजार "बरा" करण्यासाठी मात्र अश्या नैसर्गिक उपायांनची मदत होते असे निरिक्षण आहे

अजून माहिती येऊ दे.

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

चांगला अनुभव

आजारी व्यक्तीला गुण आला हे चांगले झाले. चांगला अनुभव आहे.

पण प्लूरिसी आणि कफाचा थेट संबंध कळला नाही. फुप्फुसाचे आवरण आणि छातीच्या पोकळीचे अस्तर, असे जे पापुद्रे असतात, त्यांना "प्लूरा" म्हणतात. "प्लूरा" सुजली तर "प्लूरसी" म्हणतात.

एक्सरेमध्ये दिसणार्‍या सफेद द्रवकोषातील कफ काढल्यामुळे "प्लूरा"ची सूजही निस्तरली, असा काही तुमचा अनुभव सांगायचा आहे का? ही शक्यता पटण्यासारखी आहे.

क्षमस्व. गेल्या सहा महिन्यांपेक्षा...

जास्त काल हा विषय माझ्याकडून दुर्लक्षित राहिला.
अभिप्रायाबद्दल सार्‍यांचे आभार. पत्नीच्या उपचारादरम्यान डॉक्टरांशी चर्चा केली होती, हा एक भाग. दुसरा म्हणजे फुफ्फुसावरण शोथ हा जंतुसंसर्गामुळे होणारी एक व्याधी आहे, त्यात दोन प्रकार संभवतात : एक म्हणजे केवळ सूज येणे किंवा फुफ्फुसाभोवती असलेल्या आवरणात दूषित पाणी साठणे. या दोन्ही प्रकारात शरीरातील् मुख्यत: द्रव धातू बिघडला जातो. म्हणून हा कफ विकार समजायचा. ऍलोपॅथिक औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालू होतीच. त्या औषधांनी द्रव सिस्ट्मध्ये आतल्या आत सुकून गेला होता. त्यातून सुटका होण्यासाठी केलेला हा प्रयत्न होता. ऍलोपॅथिक गोळ्यांना जोड म्हणून दिलेली वर उल्लेखित औषधे चांगली लागू पडली.

 
^ वर