पुर्वांचलात विवेकानंद् केन्द्राचे कार्य
विवेकानंद केन्द्राने पूर्वांचलातील आसाम व अरुणाचलप्रदेशात आपल्या कार्याचे जाळे विणले आहे. या संस्थेचे विशेष कार्य अरुणाचल प्रदेशात आहे.
२००५ च्या उपलब्ध आकड्यानुसार तेथे भव्य अशी २२ निवासी विद्यालये विवेकानंद केन्द्र चालविते. त्यात ७११० विद्यार्थी उत्तम शिक्षणाबरोबर विवेकानंदाचे विचार ग्रहण करीत आहेत. अशाच प्रकारची १० अनिवासी विद्यालये आसाममध्येही आहेत.त्यात ६८८८ विद्यार्थी शिकत आहेत. या व्यतिरीक्त ३ हातमाग प्रशिक्षण केन्द्रे, नुमालीगड रिफायनरीत हॉस्पीटल आणि सातही रज्यांतील जनजातिंच्या संस्कृतीचा अभ्यास व संशोधनाचे एक् केन्द्र गुवाहाटीत चालवले जाते. नागालॅण्ड मध्ये ओखा जिल्ह्यात सुरु झालेल्या शाळेत ४२२ विद्यार्थी शिकत आहेत्.
उर्वरित भारतात ठिकठिकाणी स्थापन झालेल्या 'अरुणाचल बंधु परिवार' या समित्यांद्वारे पूर्वांचलातील परिस्थितीबद्दल येथे जागृती आणण्याचे मोलाचे कार्य विवेकानंद केन्द्र करत आहे. विवेकानंद केन्द्राचे पूर्वांचलात, उर्वरित भारतातून गेलेले ४० व स्थानिक १८ असे एकूण ५८ पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत.