ईशान्य भारत

भारतामध्ये प्रामुख्याने हिंदू समाजामध्ये एखाद्याने उपासना पध्दतीत परिवर्तन केल्यास त्याच्याकडे फार गांभीर्याने पाहिले जात नाही. ईश्वर प्राप्तीसाठी कोणता मार्ग निवडावा ही व्यक्तीगत बाब मानली गेल्यामुळे या बदलाची विशेष दखल घेतली जात नाही. पण एखाद्या हिंदू व्यक्तीचे हिंदू उपासना पध्द्तीतून ख्रिश्चन उपासना पध्द्तीत होणारे मतांतर(ज्याला सामान्यतः धर्मांतर म्हटले जाते) मात्र तितकेसे सरळ व व्यक्तिगत मर्यादेपुरते नसते. ते वाढत्या संख्याबळानुसार सुरुवातीला वसाहतवाद व सरतेशेवटी 'फुटीर राष्ट्रवादा' त रुपांतरित होताना दिसते. या विषयी अनेक विचारवंतांनी लिहून ठेवले आहे. सुप्रसिध्द गांधीवादी अर्थशास्त्रज्ञ श्री. जे.सी. कुमारप्पा हे स्वत: ख्रिश्चन होते. त्यांनी चर्चला पाश्चात्य राष्ट्रांची भूसेना, वायुसेना व जलसेना या बरोबरची चौथी सेना म्हटले आहे. रशियाचा हूकुमशहा जोसेफ स्टॅलिन याने चर्चला 'अदृश्य सेना' म्हटले आहे. 'वर्ल्ड् कौन्सिल ऑफ चर्चेस' ने प्रसिध्द केलेल्या 'ख्रिश्चॅनिटी एण्ड एशियन रेव्हॉल्युशन" या पुस्तकात आशिया खंडात बहुसंख्य ख्रिश्चन झालेल्या समाजाने मूळ राष्ट्राशी नाते तोडण्याचा कसा प्रयत्न केला हे एबोनी (इंडोनेशिया), करेन(म्यानमार) व नागा (भारत) या तीन उदाहरणांवरुन स्पष्ट केले आहे.

१५ ऑगस्ट १९४७या दिवशी भारत स्वतंत्र झाला तेंव्हा नागालँड मधील ५०% ख्रिश्चन झालेल्या नागांनी स्वतंत्र नागालँड राष्ट्राची मागणी केली. गेली ६१ वर्षे त्या मागणीच्या पूर्तीसाठी नागांनी दहशतवादाचा मार्ग जोपासलेला आपण पाहतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काही वर्षातच मिझोरामने देखील बहुसंख्याक ख्रिश्चन झाल्यावर अशीच मागणी केली.

मतांतरणाबरोबर समाजामध्ये फुटीरता निर्माण करण्यासाठी ब्रिटीशांच्या मदतीने सुमारे दीडशे वर्षांपूर्वी ख्रिश्चनिटीने शिक्षण पध्द्तीचा आधार घेतला. विशेषतः पूर्वांचलाला सुरक्षित क्षेत्र घोषित करुन तेथील जनजातीय बंधूंना असत्ये शिकवून त्यांचा बुध्दिभेद केला.

शिक्षणाद्वारे पुढील असत्य गोष्टी शिकवून त्यांनी फुटीरता वाढवायला सुरुवात केली.
१) पूर्वांचलातील जनजाती हिंदू नसून मंगोलॉईडस आहेत्, त्याच्या भाषा, उपासनापध्दती आदी हिंदूंपेक्षा भिन्न आहेत्.
२) हिंदू (भारतीय) समाज हा त्यांचा शत्रू आहे, कारण तो त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या परंपरा नष्ट करतो व आर्थिक शोषण करतो.
३) म्हणुन आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी या हिंदूंना आपल्या राज्यांतून घालवून स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे हा आपला स्वतंत्रता संग्राम आहे.

शिक्षणातून हा विचार देण्यासाठी त्यांनी पूर्वांचलातील जनजातीय बंधूंवर रोमन लिपी लादली आणि स्वाभाविकपणे त्या लिपीतील त्यांना उपलब्ध साहित्य फक्त बायबलचंच असे. हिंदी भाषेबद्दल तिरस्कार निर्माण करुन प्रत्येक जनजातीला स्वतंत्र राष्ट्र म्हणून उभे करण्याच्या प्रयत्नात आज हे मिशनरी कार्यरत असलेले दिसतात. ख्रिश्चन झालेले जनजातीय त्यांच्याच समाजाच्या गैर ख्रिस्ती बांधवांवर अनन्वित अत्याचार करतात.

पूर्वांचलातून जेव्हा आपण 'विदेशी' ना घालवण्याबद्दल आंदोलन चालल्याच्या बातम्या ऐकतो तेव्हा आपली नेहमी चुकीची समजूत होत असते. आसाममध्ये 'विदेशी' हा शब्द बांगलादेशी घुसखोरांसाठी वापरला जातो. उर्वरित सहाही राज्यांमध्ये मात्र ख्रिश्चॅनिटीच्या पध्द्तशीर प्रचाराद्वारे उर्वरित भारतातील जे नागरिक तेथे वास्तव्य करुन रहात असतात त्यांनाच विदेशी म्हटले जाते. या विदेशींनी केलेल्या शोषणातून आपला विकास तर खुंटलाच आहे; पण आपले अस्तित्व व अस्मिताही धोक्यात आली आहे असेही भासवले जाते.

आज 'मिझोराम' व 'नागालँड' या बहुसंख्य ख्रिश्चन लोकसंख्या असलेल्या राज्यांत तर अन्य भारतवासी नागरिकांची संख्या नगण्य झाली आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

संदर्भ

वरिल विषयावर अनेक शोधकार्य सरकार द्वारे तसेच इतरांनी व अनेक तत्ववेयांनी आपले विचार मांडले आहेत मात्र प्रत्येक प्रयत्नात आंतरराष्ट्रीय दबाव आणी पाश्चीमात्या राष्ट्राकडून येणारी धन संपत्ती याचीच सरशी झाल्याचे आपण पहातो त्यात भर म्हणजे आमच्या शासनकर्त्यांची निष्क्रीयता आणी वेळकाढु धोरण. http://www.hvk.org/articles/0301/93.html या साइट वर सविस्तर माहिती अवश्य पहवी.

विश्वास कल्याणकर

अनुकरणीय!

आज 'मिझोराम' व 'नागालँड' या बहुसंख्य ख्रिश्चन लोकसंख्या असलेल्या राज्यांत तर अन्य भारतवासी नागरिकांची संख्या नगण्य झाली आहे.

श्री. राज ठाकरे यावरून काही बोध घेतील काय?

धोका पटू लागला आहे!

शिक्षणाद्वारे पुढील असत्य गोष्टी शिकवून त्यांनी फुटीरता वाढवायला सुरुवात केली.
१) पूर्वांचलातील जनजाती हिंदू नसून मंगोलॉईडस आहेत्, त्याच्या भाषा, उपासनापध्दती आदी हिंदूंपेक्षा भिन्न आहेत्.
२) हिंदू (भारतीय) समाज हा त्यांचा शत्रू आहे, कारण तो त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या परंपरा नष्ट करतो व आर्थिक शोषण करतो.
३) म्हणुन आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी या हिंदूंना आपल्या राज्यांतून घालवून स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे हा आपला स्वतंत्रता संग्राम आहे.

अधिक वाचनाअंती, चर्चच्या कारवाया या ईशान्येपुरत्याच मर्यादित न राहता चोरपावलाने घरापर्यंत पोहोचण्याचा धोका हळूहळू लक्षात येऊ लागून पटू लागला आहे.

किंबहुना, महाराष्ट्रातील काही संघटनाही काही वेगळ्या संदर्भांत अशाच प्रकारची, काहीशी समांतर अशी शिकवण पसरवण्याच्या कार्यात रत आहेत, असे कळते. कदाचित या संघटनांचे ईशान्येतील चर्चशी गुप्त संधान असून, चर्चशी सल्लामसलत करून त्या आपले कार्य पुढे रेटत असाव्यात की काय, असा संभ्रम मनात निर्माण होऊ लागला आहे. अधिक तपास करणे कदाचित उद्बोधक ठरावे. संबंधित अधिकारी यात लक्ष घालतील काय?

 
^ वर