चर्चचा कांगावा
भारताचे तत्कालिन प्रधानमंत्री श्री अटलबिहारी बाजपेयी सप्टेंबर २००० मध्ये अमेरिका भेटिला गेले होते. अमेरिकन व्यापार्यानी भारतात निवेश करावा कारण भारत हा एक् शांततामय, पश्चिमेकडिल राष्ट्राना अनुकुल् आणि लोकशाही वर विश्वास असणारा असा देश आहे, हा या भेटिचा उद्देश होता. त्याच्या सोबत संबधीत विषयाशी निगडित शिष्ठमंडळ ही होते.
या भेटिची वेळ साधून न्यूयार्क टाईम्स मध्ये " An Open Letter to the Honorable Atal Bihari Vajpayee, prime minister of India" या मथळ्याखाली एक पत्र प्रकाशीत करण्यात आले. हे पत्र प्रकाशीत करण्यासाठी न्युयॉर्क टाईम्स ला पन्नास हजार डॉलर्स देण्यात आले होते आणी ही रक्कम दिली होती The National Association of Asian Christians in the US (whom nobody had heard about before) (Ref. Article by Francois Gautier-
या पत्रात असे म्हटले होते कि भारतात ख्रिश्चन समुदायांवर अनन्वीत अत्याचार होत असुन भारतातिल ख्रिश्चन हे भितीच्या वातावरणात वावरत आहेत्.
साहजिकच या पत्रामुळे श्री बाजपेयी आणि त्याच्या सोबतच्या शिष्टमंडळाची अवस्था काय झाली असेल पण या पत्राचा उद्देश मात्र सफल झाला.
Comments
अहो
जर आपल्याला खरोखर काही चर्चा व्हायला हवी असेल तर आपला लेख जरा विस्ताराने लिहाल का?
उगाच आपल्या ४ ओळी खरडायच्या?
हा तर चर्चा टाकण्याचाच कांगावा झाला.
लिहायचेच आहे तर त्या विषयाची सांगोवांग चर्चा टाका.
त्याचे
मुख्य मुद्द्याची ओळख, मुद्याचा विस्तार द्या.
आपला
गुंडोपंत
चर्चचा कांगावा
न्युयार्क टाईम्स मध्ये त्यावेळि प्रसिध्द् झालेल्या पत्रात ख्रिश्चनांवरिल अत्याचारासंबधीत खालिल घटना दिल्या गेल्या:
१. मध्यप्रदेशातील झाबुआ मध्ये ४ नन्स वर हिंदूद्वारे बलात्कार झाला- या संदर्भात त्या ४ नन्सनी इंदुर च्या बिशाप समोर हे कबुल केले की ह्याचा संबध धार्मिक नसुन बलात्कारी हे भिल्ल समाजातील गुंड होते आणी त्यांनी असे कृत्य त्याच्या समाजातील स्त्रियांवर देखील केले होते. पण याउपर हि राजकारणी, वर्तमानपत्रे, आणि ख्रिश्चन चर्च याचा उल्लेख ख्रिशचनांवर हिंदुद्वारे अत्याचार या संदर्भात करतात्.
२. आंन्ध्रप्रदेश मध्ये चर्च जाळण्याचा प्रकार् घडला होता. आणि त्या वेळि वर्तमान पत्रात त्या संबधी बराच गदारोळ् उठला त्यात या घटनेबद्दल आर एस एस वर् या घटनेबद्दल आरोप करण्यात आले होते. त्यानंतर चौकशी नंतर असे सिध्द झाले कि हा प्रकर भारतिय मुस्लिम समाजाने आय्.एस्.आय च्या पाठींब्याने घडवुन आणला होता. उद्देश हा कि दोन समाजात तेढ निर्मण व्हावी पण हा खुलासा करण्याबाबत मात्र प्रसिध्दि माध्यमांनी मौन बाळगणे पसंद केले आणि ह्याचे खापर मात्र जनमानसात आर.एस्.एस्. चे कृत्य म्हणुनच राहिले.
३. दारासीग हा बजरंग दलाचा होता पण तो व इतर आरोपी हे गुंड प्रवृती चे होते आणी जो प्रकार घडला त्या गावातील प्रुविपासुन चालत आलेल्या वैमनस्यातुन आणी जमीनिसंबधातील वादातुन झाला असण्याची शक्यता होती पण त्याला ही पुन्हा ख्रिश्चनांवरिल हिंदुद्वारे अत्याचार या सदरात मांडला जातो.
वरिल घटना आणी त्यावरिल खुलासे हे माझे नसुन या संदर्भात केल्या गेलेल्या चौकशीतुन निघालेले निष्कर्ष आहेत.श्री फ्रॅकोइस् गौटिअर् http://www.stephen-knapp.com/christian_persecution_in_india.htm त्यांच्या शब्दात "I am born a Christian and I have had a strong Catholic education. And this is what I have to say about the "persecution" of Christians in India."
विश्वास कल्याणकर
फ्रान्स्वा गोतिए
हे फ्रान्स्वा गोतिए मोठे सुरस प्रस्थ आहे.
सुरस प्रस्थ
:-) सहमत आहे.
मागे कधीतरी, हा माणूस कौनसे मिट्टी का बना हुआ है पासून कौनसे चक्कीका आटा खाता है पर्यंत चर्चा केल्याचे आठवते.