अस्सल मराठी टुलबार

नुकताच मी एक मराठी टुलबार तयार केला आहे आणि तो तुम्हाला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. या टुलबारचं वॅशिष्ट म्हणजे यापुढे तुम्हाला जालावर उपलब्ध सर्व मराठी वेबसाईट्सना अगदी सहजतेने भेट देता येईल. शिवाय सर्व मराठी लोकांना एका क्लिकच्या अंतरावर आपापसात चॅटींग करण्याची सोय उपलब्ध होईल. शिवाय या टुलबारचा उपयोग करून तुम्ही फक्त जालावरील मराठी अंतर्गत शोध घेऊ शकता. तुम्ही कोणत्याही सोशल नेटवर्कशी जोडलेले असाल, या टुलबारवर १५ सोशल नेटवर्कस ची यादी आहे. त्यामुळे तुम्हाला आता त्यांच्यांपर्यंत पोहचणं अधिक सोपं जाणार आहे. शिवाय खास मराठी लोकांना नजरेसमोर ठेऊन मनोगत, मिसाळपाव, उपक्रम, मराठी विकिपेडिआ, मराठी ब्लाऍगविश्व, मराठी माती, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स इ. अनेक मराठी वेबसाईटस एका क्लिकच्या अंतरावर असतील. तुम्ही या इथे दिलेल्या प्रतिक्रियांना गृहित धरून त्यात नंतर अनेक सुधरणा करण्यात येतील. तरी सर्वांनी हा टुलबार एकदा वापरून पाहावा. या इथे भेट द्या. http://marathidesh.blogspot.com आणि बॅनरवर क्लिक करा. हा मराठी टुलबार रोमन आणि देवनागरी अशा दोन लिपीत उपलब्ध आहे.

या टुलबारमध्ये अधिक काय काय आहे?
१.ई-बडी ऑल इन वन मेसेंजर
२.जालावरील मराठीअंतर्गत शोध
३.नवीन मराठी चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी लिंक
४.आत्तापर्यंत १८ प्रमुख मराठी वेबसाईट्स चा समावेश
५.अगदी नवीन हिंदीं/इंग्रजी सिनेमा ऑनलाईन पाहण्याची सुविधा
६.ई-मेल नोटिफायर
७.यु-ट्युब पाहणे सोपे
८.हवामान आणि रेडिओ तसेच mp3 प्लेअर
९.सर्व सोशल बुकमार्किंग साईटस
१०.प्रायव्हसी
११.पॉप अप पासून सुटका
१२.टि.व्ही. आणि गेम्स
१३.orkut सारख्या १५ सोशल नेटवर्कस ची यादी
१४.आपापसात गप्पा मारण्याची सोय.
१५.नकाशे आणि converter
१६.महत्त्वाचे पटकन नॊंद करायची सुविधा
१७.आणि इतरही खूप काही

राज ठाकरे यांच्या orkut community वरील प्रतिक्रिया
Raj...
mast re....
keep it up

Pratik Jadhav
छान आहे tool bar, सर्वांनी download करा.

Kandy Pooh
lay bhari......!!!!

Harihar Mayekar
@rohan
jai MAHARASHTRA !!!
ASA KAY TARI KRUTISHIL RESULT ORIENTED USER FRIENDLY ASAV......KEEP IT UP
Good...

Vasudev
jabardast mitra....jam avadla mala.....

अमोघ
Mitra kela install .. sahi aahe ... saglya mitranna recommend karto ..

आता "मनोगत” वरील प्रतिक्रिया पहा.

राजू९३१३
आपण मराठी लोकांना नजरेसमोर ठेऊन मनोगत, मिसाळपाव, उपक्रम, मराठी विकिपेडिआ, मराठी ब्लाऍगविश्व, मराठी माती, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स इ. अनेक मराठी वेबसाईटस एका क्लिकच्या अंतरावर आणून ठेवल्या. त्याबद्दल आपले आभार.

राजवी
आभार
धन्यवाद............ अनेक मराठी वेबसाईट आता एकाच ठिकाणी पाहता येतील....

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्त!

आत्ता ही बातमी वाचली आणि लगेचच टूलबार डाउनलोड केला. खुप मस्त आहे. अभिनंदन आणि आभार!

एक प्रश्नः त्या मधे . "या टुलबारमध्ये अधिक काय आहे..." जे सारखे स्क्रोल होत राहते ती छोटीशी खिडकी बंद कशी करता येईल?

परत एकदा या सुविधेबद्दल आभार!

विकास

मराठी टूलबार

हा टूलबार वापरल्यास RAMचे किती एमबी अडकून पडतात?
चन्द्रशेखर

काही समस्या येणार नाही

RAM ची कोणतीही समस्या येणार नाही याची खात्री बाळगा.

कमी करण्यात आला आहे

तुमची समस्या लक्षात आली. आता तो स्क्रोल निम्यापेक्षा कमी आकाराचा करण्यात आला आहे. बाकी >> चिन्हापलीकडची बटणे अलिकडे मुख्य टुलबारवर आणली आहेत. त्यामुळे तुम्हाला तो स्क्रोल काढून टाकता येणार नसला, तरी आता तुम्ही त्याकडे सहनजपणे दुर्लक्ष करु शकाल, याची मी पूर्णपणे खात्री देतो. सहकार्याबद्दल आभारी आहे.

 
^ वर