पुर्वांचलातील महाराष्ट्रा चा सहभाग-डोंबीवली येथील नागालॅण्ड वसतीगृह.
पुर्वांचलात संघाचे बरेच कार्य आहे असे आपण ऐकतो. पण तेथील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने नेमके काय चालू आहे याची एक झलक सर्वांना कळावी या उद्देशाने हा लेखन प्रपंच:-
९ मार्च १९९९ रोजी अभ्युदय प्रतिष्ठान संचालित डोंबिवलीत सुरू झालेल्या पुर्वांचल विकास प्रकल्पाला १० वर्षे पुर्ण झाली त्यानिमीत्ताने ३१/१/२००९ रोजी प्रसिध्द नेत्रशास्त्रविशारद डॉ. तात्याराव लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
हास्यसम्राट् ह्या मालिकेतुन महाराष्ट्राला हसविणारे एक कलाकर श्री अभिनय बोरकर ह्यांनी हसत खेळत नागालॅण्ड्हुन सर्वप्रथम डोंबीवलीत आलेल्या १० विद्यार्थ्याची व्यवस्थापक म्हणुन जवाबदारी पेलत ह्या वसतिगृहाची सुरवात केली. अतिशय भिन्न वृत्तीच्या आणि प्रकृतीच्या, आई वडीलांपासुन अतिशय् दुर रहायला आलेल्या विद्यार्थ्यांची काळजी घेणे हे जिकिरीचे तसेच अत्यंत चिकाटीचे काम श्री अभिनय बोरकर ह्यांच्या नंतर श्री रविकिरण काळे व त्यानंतर श्री व सौ. शशिकांत लेले ह्यांनी समर्थपणे पेलले. नंतरच्या कालावधीत श्री विद्याधर पाठक तसेच श्री संजय काथे ह्यांनी देखील ही कठीण जवाबदारी अत्यंत आनंदाने व प्रेमाने पार पाड्ली. विद्यमान व्यवस्थापक श्री दिलीप दिक्षीत व सौ सानिका दिक्षीत हे दि. ७/६/२००४ पासुन ही जवाबदारी गेली पाच वर्षे सांभाळत आहेत्.
गेल्या १० वर्षातील विद्यार्थ्यांची शालेय प्रगती बघता आत्तापर्यंत एकुण ७ विद्यार्थी १० वी पास झाले आहेत. २ विद्यार्थी पदवीधर झाले आहेत. तसेच इथे राहुन शिक्षण घेतलेले दोन विद्यार्थी नागालँडमधील शाळेत शिक्षक म्हणुन जवाबदारी सांभाळत आहेत्.
वसतीगृहातील विद्यार्थी फक्त शालेय शिक्षणात पुढे आहेत असे नाही तर खेळातील ह्यांची प्रगतीही लक्षणीय आहे. पेंढारकर कॉलेजमधील सर्व एथलेटिक्स स्पर्धातील वैयक्तिक गटात रसिलूग पामे ह्या विद्यार्थ्याने घवघवीत यशा मिळवले आहे.
३१ मे त ४ जून ह्या कालावधीत विद्यार्थ्याची अलिबाग परीसरात सहल नेण्यात आली होती. मुरुड्चा जंजिरा किल्ला, कणकेश्वर ह्या ठिकाणी जाउन आल्यानंतर अलिबाग मध्ये झालेल्या बांगलादेशी घुसखोरी संबंधातील एका जाहीर कार्यक्रमास सर्व विद्यार्थी उपस्थित राहीले होते. परतीच्या प्रवासात मांडवा ते भाउचा धक्का हा लांचचा प्रवास विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा अनुभवला
गेल्या वर्षात भारत मेरा घर योजनेअंतर्गत नागालॅण्डमधील ७ महिला व ६ पुरुषांनी वसतीगृहास भेट दिली. ह्या नागरीकांसमवेत विद्यार्थ्यांच्या शाळा व कॉलेजला भेट देण्याचा कार्यक्रम घेण्यात् आला. स्थानिक नागरीकांच्या घरातुन ह्या सर्व व्यक्तींची चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती तसेच ९ जानेवारी २००८ रोजी ५० कुटुंबांच्या उपस्थीतीत सदर नागरीकांनी आपले मनोगत व्यक्त केले व सहभोजनाचा आनंद घेतला.
आजच्या घटकेला जनकल्याण समिती, पुर्वांचल विकास अंतर्गत ठाणे,डोंबीवली, चिपळुण रत्नागिरी, पर्वरी(गोवा), सांगली, चिंचवड, नाशीक, पुणे, संभाजीनगर, परभणी, नांदेड लातुर अंबाजोगाई, नागपुर गोंदीया येथील वस्तीगृहात २०० पेक्षा अधीक विद्यार्थी-विद्यार्थीनि शिक्षण घेत आहेत. भविष्यात हेच भावी नागरीक भारत व पूर्वांचल यामधील मजबूत पुलाचे काम करतील यात शंका नाही. आज गरज आहे ती त्याना आपल्यात सामावुन त्याच्या मनात आपल्या बद्दल जवळीकिची भावना निर्माण करण्याची.
Comments
चांगली माहीती
सहसा माहीत नसलेल्या/प्रकाशात न येणार्या चांगल्या बातम्या/चांगली माहीती येथे दिल्याबद्दल धन्यवाद!
अशा संस्थांचे (वसतीगृह) आणि संबंधीत छायाचित्रे येथे चिकटवलीत तर लेख अधिक उत्तम दिसेल.
चांगला उपक्रम
गरजांचा पुरवठा करण्याचा उपक्रम चांगला आहे.
अशामुळे परस्पर आपुलकी वाटू शकेल.
धन्यवाद
विकासरावांसारखेच म्हणतो.
ह्या संस्था पुढे पुलाचे काम करतील हे निश्चित
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
पूर्वी
सीलच्या निमित्ताने ह्या ईशान्येतील विद्यार्थ्यांना भेटण्याची संधी सुमारे ७-८ वर्षापूर्वी मिळाली होती. निसर्गात जास्त राहिल्याने ते थोडे बुजरे पण हसतमुख असतात.
त्यानंतर एकदा दिल्लीला गेले असताना चकमा निर्वासिताशी भेट झाली. बांगलादेशातील धर्मांध मुसलमानांनी त्रास देऊन ह्या चकमांना कसे भारतात पळायला भाग पाडले ते कळले. मात्र इथे ह्या आपल्याच बांधवांना आसामी उल्फा बंडखोर कसे त्रास देत आहेत हे पण कळले, वाईट वाटले.
अवांतर :
चिकाटीचे काम श्री अभिनय बोरकर ह्यांच्या नंतर श्री रविकिरण काळे
नुकताच एक विवाहाचे स्थळ म्हणून श्री. काळे ह्यांना भेटण्याचा योग आला. एकुणच व्यक्तिमत्व समर्पित आहे असे जाणवले.
--------------------------X--X-------------------------------
इंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,
मधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,
चौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,
सृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||
एक कुतूहल
कृपया प्रस्तुत जाहीर कार्यक्रम कोणी आयोजित केला होता, वगैरे तपशील मिळू शकतील काय?
तसेच सहलीत सहभागी होणार्या विद्यार्थ्यांच्या वयोगटाबद्दल अधिक माहिती मिळू शकेल काय?
स्वतंत्र वसतीगृहे
प्रत्येक जातीजमातीच्या लोकांसाठी स्वतंत्र वसतीगृहे असल्यामुळेच लोकांमधला दुरावा वाढत जातो. त्यामुळे अशी वसतीगृहे असणे धिक्कार्ह आहे. मुसलमानांच्या स्वतंत्र मदरशांमुळे त्यांच्यात भारतद्वेष कसा पोसला जातो हे सर्वश्रुतच आहे. आतातर काय, मदरशांमध्ये जाणार्या सर्व पुरुषांसाठी(वयाची अट नाही!) दिल्लीच्या केन्द्र सरकारने प्रवासासाठीची फुकट सीझन तिकिटे वाटायचा निर्णय घेतला आहे. बॉम्ब बनवण्याचे सार्वत्रिक शिक्षण आता फुकटात मिळेल.
त्यामुळे डोंबिवलीतल्या त्या वसतीगृहाबद्दल मला जराही कौतुक नाही.--वाचक्नवी
द्विधा
घरापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अश्या सोयी असाव्यात असे वाटते अर्थात आपण म्हणता त्याप्रमाणे अशी वसतीगृहे ठराविक जातीसाठी असली पाहिजेत असे नाही.
याच धर्तीवर परदेशस्थ भारतीय विद्यार्थ्यांसाठी + तात्पुरत्या परदेशस्थ नोकरदारांसाठी हॉस्टेल काढण्याचे ऐकिवात आले होते. इथे मात्र ह्या मुद्द्यावर मात्र माझ्या मनात द्विधा आहे. स्वतःला त्यांच्या जागी ठेवले की अश्या वसतीगृहांची गरज का भासत असेल हे जाणवते
ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव
पूर्वांचलातील महाराष्ट्र?
उत्तर प्रदेशात जसा एक पूर्वांचल आहे तसा पूर्वांचलात एक महाराष्ट्र आहे? --वाचक्नवी