जालावरील मराठी पुस्तके व ग्रंथ

नाईलाजास्तवच लिहिले आहे.
(माझ्यासारख्या) अमराठी ठिकाणी अडकुन पडलेल्यांसाठी, जिथे एकही पुस्तक नाही, तिथे राहणार्‍यांसाठी.
जालावरच्या मराठी पुस्तकांचे दुवे.

मुद्रित पुस्तकेच असावीत.
जितकी जुनी, जितकी मोठी तितके चांगले.
सोयीसाठी एकाच लेखकाचे सारे लेखन एकत्र आले तर उत्तम. नसता प्रति-प्रतिसादात डकवावे. म्हणजे एकत्र माहीती मिळेल.

कृपया केवळ सुची असतील, किंवा वृत्तपत्रे असतील तर दुवे देवु नयेत. या प्रकारची चर्चा इतर कुठे झाली असेल तर तिथले दुवे द्यावेत.
(बहुतेक वृत्तपत्रे ई-आवृत्ती काढतात. तेवढे तरी बरे आहे.)
खापरे.इन हे स्थळ माझ्या पहाण्यात आलेले जालावरचे सर्वात मोठे मराठी ग्रंथागार आहे.
(माफ करा, खापरेंचा दुवा नीट दिला गेलेला नाहिये बहुतेक.)
असे प्रकल्प जास्त नसतील पण म्हणुनच ही चर्चा लाभदायी ठरेल असे वाटते.

----------------
न चोरहार्य न च राजहार्य न भ्रात्रभाज्यं न च भारकारी !
व्यये कृते वर्धत नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानम् !
----------------

विविध मराठी संस्थळांवर आणि अनुदिनीवर स्वतःचे काहीही लिहीणारे अनेक आहेत. त्यांना कृपया वगळावे.अपवादात्मक परिस्थितीत असे दुवे मान्य. आपण ठरवाल तो अपवाद. (i believe in you all. you never proved otherwise)
जितके सवंग तितके टाळावे.

Comments

जालावरील पुस्तके

पुस्तके मुद्रितच असावीत हा आग्रह का?
चन्द्रशेखर

दुसरी कोणती असतात?

विविध मराठी संस्थळांवर आणि अनुदिनीवर स्वतःचे काहीही लिहीणारे अनेक आहेत. त्यांना कृपया वगळावे.अपवादात्मक परिस्थितीत असे दुवे मान्य. आपण ठरवाल तो अपवाद. (i believe in you all. you never proved otherwise)
हे यासाठी कि हे सहज सापडेल आणि हे मी किंवा इतर कुणी शोधत नसेल. वगेरे. सरसकट सारे दर्जाहीन असेल असे मी म्हणत नाही.
(रडगाणे हे की मला पुस्तके वाचायला मिळत नाहीयेत.)
मला मुद्रिताशिवाय दुसरा प्रकार माहिती नव्हता/सुचला नाही. आपण म्हणताल तसे प्रकारही चालतील. (मला भुक भागल्याशी मतलब).
बखरी, शिलालेख, भुर्जपत्रे आणि काय काय आणखीन असते देव जाणे, सारे चालेल.

उपक्रम हे अतिशय चांगले स्थळ असुन इथे फालतू पणा, स्पामिंग वगेरे कुणी करत नाही ही फार चांगली गोष्ट आहे

दुसरी कोणती असतात?

दुसर्‍या प्रकारची पुस्तके म्हणजे जी फक्त जालावरच प्रसिद्ध झालेली आहेत व ज्यांची हार्ड कॉपी नाही अशी पुस्तके.
चन्द्रशेखर

जालावरची पुस्तके

धार्मिक पुस्तके आणि संतवाङ्मय अनेक संकेतस्थळांवर आहे. खापरे डॉट इन, संस्कृतडॉक्युमेन्ट्‌स डॉट ऑर्ग, आय्‌आय्‌टी आणि डिजिटल लायब्ररी ऑफ़ इंडिया इथे जाऊन पाहावे, अनेक जुनी दुर्मीळ पुस्तके(सुमारे २९५) सापडतील. आणखीही काही संकेतस्थळे आहेत, सापडवून लिहीन.--वाचक्‍नवी

सावरकरांचे बरेच काही

http://www.savarkar.org/mr/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0...

सावरकरांचे बरेच काही सावरकरांचे बरेच काही सावरकरांचे बरेच काही सावरकरांचे बरेच काही सावरकरांचे बरेच काही सावरकरांचे बरेच काही सावरकरांचे बरेच काही सावरकरांचे बरेच काही सावरकरांचे बरेच काही सावरकरांचे बरेच काही सावरकरांचे बरेच काही सावरकरांचे बरेच काही सावरकरांचे बरेच काही सावरकरांचे बरेच काही सावरकरांचे बरेच काही सावरकरांचे बरेच काही सावरकरांचे बरेच काही सावरकरांचे बरेच काही सावरकरांचे बरेच काही सावरकरांचे बरेच काही सावरकरांचे बरेच काही

धन्यवाद

सावरकरांची चरित्रे आणि त्यांचे काही निवडक साहित्य असलेले हे संकेतस्थळ आवडले. कुसुमाग्रजांच्या कविता आणि गीतरामायण जालावर आहे हे सर्वांना माहीतच असावे. पुलंच्या काही निवडक कथा जालावर आहेत. आणखी अशा बर्‍याच साइट्‌स असाव्यात, त्यांची सूची करायला हवी.--वाचक्‍नवी

मराठी म्हणींचे एक जुने पुस्तक

गुगलबुक्स वर मला काल एक छान दुवा मिळाला. एका ब्रिटीश रेव्हरंडने लिहीलेले १८९९ सालातले हे पुस्तक आहे.

ख़ज़ाना!

विकास यांनी निर्दिष्ट केलेल्या आर्चिव्ह डॉट ऑर्ग ह्या दुव्याबद्दल त्यांचे आभार. या संस्थळावर मराठी आणि मराठीविषयक जुन्या पुस्तकांचा मोठा खजिना आहे.
माझ्याकडे आय्‌ईची जुनी आवृत्ती होती. ती वापरून संकेतस्थ्ळावरील पुस्तक उघडता आले नाही. शेवटी फ़ाफ़ॉच्या मदतीने जमले. सुमारे १६०० म्हणींचा अप्रतिम संग्रह. समांतर इंग्रजी म्हणी आणि सोप्या भाषेत भाषान्तर. वा! ख्रिश्चन मिशनर्‍यांनी मराठीत जे काम करून ठेवले आहे ते खरोखर स्पृहणीय.--वाचक्‍नवी

सहमत/जुन्या आयईकरिता दुवा/एक सुचवण

संस्थळ रोचक आहे. जुन्या आयईकरिता हा दुवा वापरून पहावा.

असे दुवे एम्बेड करण्याऐवजी दुवास्वरूपात दिल्यास (निदान हा दुवा पाहतानाच्या या क्षणाच्या माझ्या अनुभवावरून तरी) वापरकर्त्यास सोपे जावे, असे वाटते.

वा! ख्रिश्चन मिशनर्‍यांनी मराठीत जे काम करून ठेवले आहे ते खरोखर स्पृहणीय.

धर्मप्रसाराकरिता/राज्यविस्ताराकरिता/राज्यकारभाराच्या सोयीकरिता का होईना, पण ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी आणि ब्रिटिश व काही प्रमाणात इतर युरोपीय राज्यकर्त्यांनी (विशेषतः सुरुवातीच्या काळात) मराठीत/महाराष्ट्रात/हिंदुस्थानातच नव्हे, तर जगात अनेक ठिकाणी असे बरेच स्पृहणीय कार्य केले असावे, असे वाटते. (अशा धर्मप्रसारकांनी आणि परकीय राज्यकर्त्यांनी अनेकदा केलेले नुकसान जरी लक्षात घेतले, तरीसुद्धा आपल्याच सांस्कृतिक वारशाचे डॉक्युमेंटेशन - आणि म्हणूनच अप्रत्यक्षरीत्या आणि कदाचित अभावितरीत्या जतन - करण्यातील त्यांचा हातभार मोलाचा आहे, हेही विसरून चालणार नाही. या कामात त्यांना स्थानिकांची बरीच मदत अर्थातच झाली असावी, पण योजक्स्तत्र दुर्लभः*| असो.)

विकास यांनी निर्दिष्ट केलेल्या आर्चिव्ह डॉट ऑर्ग ह्या दुव्याबद्दल त्यांचे आभार.

एक सुचवण: Archive या इंग्रजी शब्दाचा उच्चार 'आर्काइव' असा व्हावा, असे वाटते.

(*अवांतर: 'योजकस्तत्र दुर्लभः'चा आगापिछा कोणी सांगू शकेल काय? म्हणजे या वाक्प्रचाराचा उगम, श्लोकातून अथवा सुभाषितातून उगम असल्यास संपूर्ण श्लोक अथवा सुभाषित आणि त्याचा अर्थ वगैरे? वाक्यात प्रयोग करण्याकरिता उत्तम वाक्प्रचार आहे, पण पूर्ण संदर्भ कळल्यास दुग्धशर्करायोग! असो.)
(अतिअवांतर: 'श्लोक' आणि 'सुभाषित' यांच्यातील नेमका फरक काय?)

स्टॉप प्रेस: 'योजकस्तत्र दुर्लभः'बद्दल...

'योजकस्तत्र दुर्लभः'बद्दल श्री. धनंजय यांनी खाली चिकटवल्याप्रमाणे माहिती खरडीतून पुरवली आहे. त्याबद्दल श्री. धनंजय यांचे मनापासून आभार.

श्री. धनंजय यांची खरड पुढीलप्रमाणे:
=========================================================================================
अमन्त्रम् अक्षरं नास्ति नास्ति मूलमनौषधम् | अयोग्यः पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः ||
गूगलवर सगळे मिळते!
असे (कुठलेच) अक्षर नाही जे मंत्रबद्ध नाही, ज्यात औषध नाही असे (कुठलेच) मूळ नाही, अयोग्य असा (कुठलाच) पुरुष नाही, (मात्र) त्यांची योजना करणारा (=नियोजक) दुर्लभ आहे.
"महासुभाषितसंग्रह" नावाच्या संग्रहात सापडले, पण मूळ कोणाची उक्ती आहे, ते गूगलवर पटकन सापडले नाही.
=========================================================================================
(श्री. धनंजय यांची खरड समाप्त.)

पर्स्पेक्टिव:
'गूगलवर सगळेच मिळते!' हे (बर्‍याच अंशी) खरेच. केवळ शोधून काढणार्‍याची गरज असते. योजकस्तत्र दुर्लभः|
पुनश्च मनापासून आभार.

(कृपया गूगलवर सापडलेला दुवाही दिल्यास अधिक चांगले होईल.)

माझी पुस्तक सुची

मला आंतर जालावरील माहीत असलेल्या पुस्तकांची सुची मी इथे बनवली आहे. आणखी काही पुस्तके सुचवायची असतील तर मला suchana@marathinet.tk वर कळवा.

http://marathinet.tk

मराठी पुस्तके

मराठी पुस्तके या स्थळावर चार मराठी पुस्तके आहेत. मूळ पुस्तकाच्या पानांचे प्रतिमांकन करून ती तिथे डकवली असती तर टंकलेखनाच्या चुका झाल्या नसत्या. पण बाकी काम तसे बरे आहे. रसिक डॉट कॉमवरही काही पुस्तके आहेत. काही फुटकळ कविता आणि गाणी, लघुकथा इत्यादी अनेक संकेतस्थळांवर आहेत. पण संपूर्ण ई-पुस्तके थोडीच असावीत.--वाचक्‍नवी

 
^ वर