रॉ फ़ाईल्स

कॅमेरा रॉ फ़ाईल्स

आजकाल डिजिटल कॅमेर्‍यावर मिळणारी छायाचित्रे खरोखरीच नेत्रदीपक असतात. आणि अशी चित्रे मिळवावयाला फार भारी, १०-१२ मेगा पिक्झलचा कॅमेराच पाहिजे असेही नाही.त्यामुळे हल्ली छायाचित्र काढतांना आपण काहीतरी गमावतो आहोत इकडेही आपण लक्ष देत नाही. नक्की काय होत आहे?

आपण फोटो घेतो तेंव्हा कॅमेर्‍याच्या सेन्सरवर चित्राची छबी तयार होते. याला डिजिटल निगेटिव्ह म्हणावयास हरकत नाही. कॅमेरा ही निगेटिव्ह कॅमेर्‍यात प्रोसेस करतो व आपणास तयार पॉझिटिव्ह देतो. ती आपण कॅमेर्‍यात, संगणकावर पहातो, त्याची प्रिंट काढतो. चांगली ८"x१२" अशी मोठीही करता येते. मग गमावले काय ? तेच आता बघू.

समजा तुमचा एक छान फ़ोटो तुम्हाला मित्राला पाठवावयाचा आहे. त्याचा आकार जर १५ मेगा पिक्झल असेल तर ही मोठी फ़ाईल इंटरनेटवरून पाठविणे अडचणीचे होते. तुम्ही तीचा आकार कमी करता, १-२ मेगा पिक्झल. मग पाठविणॆ सोयीचे होते. आकार लहान करता, कॉम्प्रेस करता, म्हणजे १३-१४ मेगा पिक्झल काढून टाकता. हे करतांना चित्राची गुणवत्ता (quality) कमी होते. उदा.JPEG या प्रकारच्या lossy compressions मध्ये सोय पाहिली जाते पण गुणवत्ता कमी होतेच.

तुमचा कॅमेरा हेच करत असतो. सेन्सरवरील फ़ाईलची काटछाट करून तो पोझिटिव्ह तयार करतो. ही काटछाट फार काळजीपूर्वक करतात म्हणून तुम्हाला चांगला फोटो मिळतो. पण गुणवत्ता कमी होतेच.जर तुम्हाला उत्कृष्ट,केवळ चांगला नव्हे, फोटो पाहिजे असेल तर ही कॅमेर्‍यातील लुडबुड नसलेली छबी तुमच्या हातात पडली पाहिजे. मध्यम-भारी किंमतीच्या कॅमेर्‍यांमध्ये ही सोय उपलब्ध झाली आहे. या छबीला म्हणतात camera raw file. आज ही सोय असलेले ५०-६० कॅमेरे, निरनिराळ्या कंपन्यांचे बाजारात मिळतात.अगदी १०-१५,००० रु. किंमत असलेल्या कॅमेर्‍यातही अशी सोय असते. मागे कॅमेर्‍याची निवड यावर लिहतांना माझे मत दिले होते की raw formatची सोय असेल तर प्राधान्य द्या. आता आपण जरा जास्त माहिती पाहू.

काटछाट नाही म्हणून ही छबी थोडी मोठी, जवळजवळ १० मेगा पिक्झलच्या आसपास असते. तुमच्या कॅमेर्‍यात २-४ जिबि.चे कार्ड असतेच, म्हणजे ही काही मोठी अडचण नाही. तुम्ही जेंव्हा रॉ मध्ये फ़ोटो काढता तेंव्हा कॅमेरा तुम्हाला एक साधा, नेहमीचा फोटो देतोच. याचा फायदा हा की तुम्ही रॉचे काही केले नाही तरी नेहमीचा फोटो हाताशी असतोच. आता कॅमेर्‍याची लुडबुड नको म्हटले की पुढचे सोपस्कार तुम्हालाच करावयास पाहिजेत, नाही कां ? आणि येथेच खरा स्वनिर्मितीचा आनंद मिळतो. white ballance, exposure, contrast, colour cast, sharpness, lens abberation corrections अशा कित्येक गोष्टी
तुम्ही ठरवू शकता. तुम्ही राजे ! श्री.अनुप यांनी उपक्रमवर दिलेल्या चित्राबद्दल विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले," मी रॉ वर काम केले." बस. संध्याकाळची लालसर छटा कोणती हवी, मी ठरवणार! contrast ? मला पाहिजे तो!त्यांनी दिलेल्या बदकाच्या चित्रातील रंग व टेकडीच्या चित्रातील संध्याकाळची रंगछटा अप्रतिम होती. हे केवळ रॉमध्येच शक्य आहे. तर असा आनंद मिळवत उत्कृष्ट , केवळ चांगला नाही, फोटो तयार करावयाचा. तयार करतांना तो तुमव्या डोळ्यासमोर आकार घेत असतो. आपल्या मनाजोगती छबी झाली की ती डेव्हलप करावाची, कारण आतापर्यंत ती निगेटिव्हच असते. पूर्वी मी घरी निगेटिव्ह(B W) डेव्हलप करत असे.अजून त्यातला आनंद आठवून मन उल्लसित होते.

ही डेव्हलपमेंट करावयाला निरनिराळे प्रोग्रॅम मिळतात, काही विकत, काही फुकट. फोटोशॉपमध्ये ही सोय आहे.Silkypix Developer Studio 3.0 मोफ़त उतरवून घेता येतो. पुढील भागात त्याचा उपयोग कसा करतात हे थोडक्यात सांगणार आहे. रॉ बद्दलची एक गोची
आहे. रॉ फ़ाईल कशी तयार करावयाची याबद्दल standardisation झालेले नाही. प्रत्येक कॅमेरा कंपनी आपल्याला पाहिजे तसे करते. त्यामुळे कॅननची पद्धत निराळी, निकॉनची निराळी. बरे कॅननच्या सगळ्या कॅमेर्‍यातही एकच असेल असेही नाही.प्रत्येक वर्षी १० नवीन कॅमेरे येणार. पण ती प्रोग्रॅमवाल्यांची डोकेदुखी. आपल्या कॅमेर्‍याला जुळणारा प्रोग्रॅम आपल्याकडे असला म्हणजे झाले.

शेवटी एक दोन गोष्टींबद्दल सांगून थांबू. वर दिलेल्या गोष्टी कॅमेर्‍यात असतात व फोटोशॉपमध्येही आहेत. मग रॉ कशाला ? याचे उत्तर असे की कॅमेर्‍यामध्ये WB, esposure वगैरे आहेत पण त्यांचा वापर केल्यानंतर प्रोसेसमध्ये पिक्झल जातात. आणि फोटोशॉपचा उपयोग पिक्झल गेल्यानंतरच्या अवशिष्ट भागावरच करता येतो.आता एकदा गेलेले पिक्झल कायमचे गेलेले असतात. ते कुठेही,कसेही परत आणता येत नाहीत. तेंव्हा रॉ फ़ाईल एकमेवाद्वितीय. काही चित्रांत रॉ फ़ाईल डेव्हलप करून मग फोटोशॉप वापरणे उपयोगी पडते.

शरद

लेखनविषय: दुवे:

Comments

प्रमाणीकरण

या रॉ मध्ये प्रमाणीकरण नसण्याचे कारण काय असावे?
प्रकाश घाटपांडे

नेहेमीप्रमाणे

फारच सुरेख आणि उपयुक्त माहिती. पुढील भागासाठी उत्सुक

वरील लेखावरून मला असे समजले की रॉ चित्राला ठराविक आज्ञावलीने चाळून क्यामेरा आपल्याला फोटो देतो (बरोबर ना?). म्हणजे चित्रातील काय वगळायचे याची ठोस आज्ञावली (/फिक्ड प्रोसेस) आहे. मग (तीच आज्ञावली उलटी चालवून) गाळलेला भाग परत टाकून चित्राला रॉ फॉर्मॅटमधे बनविणारे सॉफ्टवेअर्स आहेत का. जेणे करून रॉ फोटो देणारा क्यामेरा नसला तरी त्या सॉफ्टवेअर्समधून रॉ फोटो मिळतील.

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

रॉ फाईल्स

(१) प्रमाणीकरण का नाही ?
निकॉनने एक प्रणाली निर्माण केली तर ती कॅननला का मिळावी ? म्हणून कॅनन आपली प्रणाली शोधते. तिसरा तिसरी. पण लवकरच यातील फुकट जाणारा खर्च व कटकट पाहून लवकर एक पद्धत येईलच.
(२) उलटे करता येते का ? साधी फाईल रॉमध्ये प्रोसेस होते का ?
हो. तसे करता येते.पण फायदा काय ? तुम्ही पिक्झल गमावून बसलेले असताच. सिल्किपिक्समध्ये अशी सोय आहे पण ते काम तुम्ही फोटोशॉपमध्येही करू शकता.

शरद

रॉ फाईल्स

रॉ फाईल्स साठी प्रमाणीकरण नसले तरीही प्रत्येक कॅमेरर्‍यासोबत रॉ फाईल प्रोसेसींग सॉफ्टवेर मिळते. जसे कॅनन चे जीटल फोटो प्रोफेशनल आणि निकॉन चे क्याप्चर वन. त्याला वापरून काही बेसिक adjustments करून लॉसलेस फोरमॅट (जसे TIFF) मधे फाईल सेव करून त्यावर GIMP, Photoshop वा तत्सम प्रणाली वपरुन चांगली छायाचित्रे मिळवू शकता.

माहीतीपूर्ण

रॉ फाईल (मला आधी वाटले की गुप्तहेरखात्यासंबंधीच आहे!) बद्दल प्रथमच ऐकले. आता नवीन कॅमेरा घेताना लक्षात ठेवीन. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत...

Silkypix Developer Studio 3.0 मात्र आता फ्री डाउनलोडसाठी बंद केले आहे :-(

डिजीटल निगेटिव

रॉ फाईल चे ठराविक एक प्रमाण नाही हे असूनही Adobe ने तयार केलेला एक फॉरमॅट आहे. DNG (Digital Negative) हे त्याचे नाव. DNG ला प्रमाण बनविण्यासाठी Adobe आणि काही आघाडीचे छायाचित्रकार प्रयत्नशील आहेत.

काही निवडक साखळ्या

रॉ बद्दल माहिती आणि त्याचे प्रोसेसींग बद्दल खालील संकेत स्थळे सदस्यांना उपयोगी पडतील.

एक हे खुप माहितीपुर्ण स्थळ आहे. ह्यावर चलचित्र देखिल आहे

दोन

तिन

 
^ वर