उपक्रम या संकेतस्थळावरील लेख

उपक्रमवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखांवर मालकी हक्क (कॉपीराईट) कोणाचा असतो? तसेच त्या लेखात बदल किंवा तो लेख परत घेण्याचे हक्क लेखकाला असतात किंवा नाही यासंबंधी कोणी मार्गदर्शन करू शकेल का?

लेखनविषय: दुवे:

Comments

माझे मत

आपले प्रश्न उपक्रमाचे मालक - संपादक यांना उद्देशून असल्याचे त्यांची अधिकृत उत्तरे उपक्रमपंत किंवा संपादक देऊ शकतील. मी इथे फक्त माझे मत देत आहे.

उपक्रमवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखांवर मालकी हक्क (कॉपीराईट) कोणाचा असतो?

उपक्रमावरच असे नाही तर कुठल्याही संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या लेखांवर मालकी हक्क माझ्या मते लेखकाचा असतो. एका स्थळावर प्रसिद्ध झालेले लेखन लेखकाने अन्यत्र प्रसिद्ध केल्याची असंख्य उदाहरणे आहेत.

तसेच त्या लेखात बदल किंवा तो लेख परत घेण्याचे हक्क लेखकाला असतात किंवा नाही यासंबंधी कोणी मार्गदर्शन करू शकेल का?

विनंती केल्यास संपादक बदल करू शकतात. लेख परत घेण्याचा प्रश्न जरा अवघड वाटतो. पण जर अनेक ठिकाणी लेखन प्रसिद्ध करायला अडथळा येत नसेल तर लेख परत घ्यायला (लेखकाची इच्छा याशिवाय) काय कारण असू शकते?

विनायक

 
^ वर