एक वाचनीय पुस्तक

भारताचे माजी राष्ट्रपती श्री. अब्दुल कलाम यांनी पुष्कळ नवनवीन प्रयोग चालू करण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. त्यातलाच एक राष्ट्रीय डिजिटल पुस्तकालय हा आहे. या दुव्यावर हे पुस्तकालय आहे. या पुस्तकालयात जुन्या मराठीतील पुस्तकांचा अक्षरश: खजिना आहे. परवा असेच या पुस्तकालयात भटकत असताना, ‘मराठी दफ्तर भाग 1 ’ या 1839 च्या आसपास प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचा मला शोध लागला. या पुस्तकात सातारच्या महाराजांच्या संग्रहात असलेली भोसले घराण्याच्या इतिहासाची बखर आहे. यात शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी यांपासून ते इ.स. 1800 च्या आसपास सातार्‍याच्या गादीवर असलेले प्रतापसिंह भोसले यांच्यापर्यंतच्या घराण्याच्या इतिहासाचे वर्णन आहे.

अर्थातच शिवाजी महाराज, संभाजी, राजाराम, आणि शाहू महाराज व औरंगजेब यांचे वर्णन असलेली पृष्ठे खूपच वाचनीय आहेत. बखर असल्याने काही वर्णने अतिरंजित असल्याची शक्यता आहेच. गंमत म्हणजे सातारच्या महाराजांच्या वंशजाकडून मिळालेल्या या बखरीत सुद्धा दादोजी कोंडदेव यांचा शिवाजीचे बालपणीचे शिक्षक असाच उल्लेख आहे. मी येथे काही पानांचे प्रिंट्स देतो आहे. पुस्तक जुने असल्याने कॉपीराईटचा प्रश्न नाही.

मला सर्वात वाचनीय वाटलेले भाग म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्युपासून पेशव्यांच्या हातात सूत्रे येण्यापर्यंतच्या काळाचे वर्णन आणि 1817-18 मधे बाजीराव पेशवे आणि इंग्रज यांच्यातील शेवटच्या सत्तांतराच्यावेळी सातारच्या प्रतापसिंह महाराजांनीच केलेला पेशव्यांचा घात.
मी इतिहासाचा तज्ञ नाही. त्यामुळे काय खरे (Authentic) आहे हे मला सांगणे शक्य नाही. मला पुस्तक वाचनीय वाटले यात शंकाच नाही.
30 जून 2009

लेखनविषय: दुवे:

Comments

एक वाचनीय पुस्तक्

पानांचे प्रिन्ट्स लेखात घालता आले नाहीत. का ते माहित नाही.
चन्द्रशेखर

पानांचे प्रिन्ट्स

चन्द्रशेखर

पानांचे प्रिंट्स

चन्द्रशेखर

ह्म्म्

गंमत म्हणजे सातारच्या महाराजांच्या वंशजाकडून मिळालेल्या या बखरीत सुद्धा दादोजी कोंडदेव यांचा शिवाजीचे बालपणीचे शिक्षक असाच उल्लेख आहे.

अस्सं ?!!
अजून त्या पानांची चित्रे दिसत नाही आहेत.
--लिखाळ.

अधिक माहिती द्यावी

चित्रे दिसत नाहीत. डी-एल-आय.संकेतस्थळाच्या विदागारात शोधता यावी, अशा तर्‍हेची अधिक माहिती द्यावी. तसेच पृष्ठसंख्या द्यावी. म्हणजे पुस्तक बघता येईल.

धन्यवाद.

पाने दिसत नाहीत

मला शक्य तेवढे पयत्न मी करून बघितले. पाने मला उपक्रमवर आणता येत नाहीत.
आपण डिजिटल लायब्ररीच्या संकेतस्थळावर गेल्यावर मराठी वर टिचकी मारा. त्यानंतर 'एम' वर टिचकी मारा. 'एम' मधील पान नंबर चारवर हे पुस्तक सूचीत आहे. त्यावर टिचकी मारून नंतर २ नंबरचा बूक रीडरवर टिचकी मारा म्हणजे पुस्तक दिसू लागेल
चन्द्रशेखर

हा नेमका दुवा

ज्यांना हवा असेल त्यांच्यासाठी हा नेमका Marathi daptara. Part-1..

चांगले

चांगली माहिति आहे हव्या त्यावेळी संदर्भासाठी संकेतस्थळ चांगले आहे॥ आवश्यक तेव्हा पहाता येईल॥ मात्र वाचना साठी छापिल मजकूरच बरा वाटतो॥
सदानंद ठाकूर
आम्हाला येथे भेट द्या http://www.mutualfundconsultantindia.com

 
^ वर