गुंतवणूक आणि इंशुरन्स (मुख्यत्वे युलिप) गल्लत नको.

जीवनात आपण काही गोष्टिंची उगाचच गल्लत करत असतो. आता हेच पहाना कोण तरी आपला मित्र, ओळखीचा किंवा नातेवाईक असतो, त्याने कोणत्यातरी इंशुरन्स कंपनीची नुकतीच एजंन्सी घेतलेली असते. खाजगिकरणानंतर देशात अनेक इंशुरन्स कंपन्या सुरु झाल्या आहेत. जवळपास प्रत्येक तालुक्याचे ठीकाणी या कंपन्यानी युनिट मॅनेजर किंवा सेल्समॅनेजर म्हणून भरती केली आहे त्यांचे काम एकच स्वप्ने दाखवून एजंट नेमणे आणि गावो गावी अगदि गल्लीबोळात इंशुरन्स एजंट नुसते बोकाळले आहेत. मग एक दिवस असाच एकजण आपल्याकडे त्याचेसोबत त्या कंपनीचा युनिट मॅनेजर किंवा सेल्समॅनेजर बरोबर घेवून येतो व मग दोघे मिळून आपल्याला सांगता फक्त तीन वर्ष प्रत्येक वर्षी फक्त रु.१ लाख भरा तीन वर्षानी दुप्पट होतिल आणि आपण गिराहिक बनवतो आणि आपण एखादा युलिपचा प्लान विकत घेतो. तीन वर्षानी आपल्या लक्षात येते कि आपण फसविले गेलो. यात विषेश अस काहिच नाही, कारण आपणालाच माहित नसत आपल्याला खरच कशाची गरज आहे ते.

इंशुरन्सची गरज असेल तर निव्वळ इंशुरन्सच घेतला पाहिजे शक्यतो टर्म इंशुरन्स घ्यावा एकतर तो स्वस्त असतो साधारणपणे २८ वर्षी घेतला तर १० लाख रुपयांच्या विम्यासाठी ३ हजार रुपये हप्ता येतो.

गुंतवणूक करावयाची असेल तर निव्वळ गुंतवणूकिचेच् प्रोडक्ट घेतले पाहिजे. आता युलिप हे शेअर बाजाराशी संबंधीत प्रोडक्ट आहे म्हणजे तुम्हाला शेअर बाजाराची जोखिम समजली आहे व शेअर बाजाराचे फायदेहि समजले आहेत अस ग्राह्य धरले तर वागवे ठरु नये. मग अशावेळी म्युचल फंडातील गुंतवणूक करणेच इष्ट होइल. कारण जोखिम तर दोन्हीकडे सारखिच आहे. शेअर बाजाराची. पण चार्जेस मात्र इंशुरन्स (युलिप) साठी १ ल्या वर्षी सरासरी ३०% असतात (२०% ते ६०% पर्यंत प्रोडक्ट व कंपनी नुसार्) व पुढे १% ते १०% असतात. म्हणजेच गुंतवले जातात फक्त् ७०% म्हणजे जी काय वाढ होणार ती ७०% रकमेवरच. म्युचल फंडात गुंतवणूकीसाठी २.२५% प्रत्येक वेळी एंट्री लोड आहे व आता सेबीचे नविन मार्गदर्शक तत्वांनुसार एंट्री लोड अजिबात लागणार नाही (कार्यवाही होणे बाकी आहे).

आपण असे ग्राह्य धरुया कि दर वर्षी युलिप व म्युचल फंडातून सारखेच म्हणजे १०% परतावा मिळाला आहे तर म्युचल फंडातिल ९७.७५ रुपयांवर १०% वाढ् मिळेल व युलिप मधे ७० रुपयांवर १०% वाढ् मिळेल . इंकम टॅक्सची कलम ८०-सी सवलतीच्याही योजना म्युचल फंडातहि आहेतच. पण आपली गरज तपासुन गुंतवणूक करणे चांगले.

निषर्षच काढायचा तर गुंतवणुक हि गुंतवणुक म्हणूनच करावी आणि इंशुरन्स हा आपले पश्चात कुटुंबाचे संरक्षणासाठीच घ्यावा.

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगला लेख

चांगला लेख. अजुन येउ द्या.

मेडीकल इंशुरन्सबद्दल काही माहीती देउ शकाल?

 
^ वर