एकाकी पूर्वांचल

शिलांग शहर् म्हणजे नानाविध रगांची मुक्त उधळण आहे. हॅपी व्हॅली ओलांडुन आपण शहराच्या वेशीवर् येतो नि मग डोंगर दर्यांच्या कडे़ खांद्यावर विसावलेलं अवघं शिलांग शहर हिडस्तोवर् आपण आनंदाच्या खोर्यातच असतो. डोळे निवतील् अशा कंच हिरव्या घनराईच कॅनव्हास् सगळ्या शहराला लाभलाय. त्यात निळ्या, तपकिरी नि तांबड्या रंगांची उतरती छप्परं मिरवणार्या घरांच्या रांगा म्हणजे नुसती रंगपंचमी. लहान मोठ्या चौकटीचं डिझाईन काढलेल्या लोकरी शालीत स्वतःला लपेटून् लगबगीत जा ये करणारी माणसं हे सगळ चित्रं जिवंत करतात, त्याला आणखीसच एक वेगळी रंगत् आणतात.

अडीच लाखांच्या आस पास शिलांगची लोकवस्ती आहे. हे शहर मेघालयाच्या राजधानीचं देशातील सर्वाधिक पावसाचा हा चिमुकला प्रान्त. इथे वर्षातले आठ महिने तरी सतत आपलं "नभ मेघांनी आक्रमीलेलंच!" साहजिकच जिथं जाल तिथं नी जेंव्हा जाल तेंव्हा सगळीकडेच "हिरवे हिरवे गार् गालिचे , हरित त्रुणांच्या मखमालीचे " असा प्रकार.

गोहाटि विमानतळावर उतरल्यावर जाणवली ती तेथील् दमट हवा. ब्रम्हपूत्र नद म्हणजे समुद्र्च त्याचा हा परिणाम. गोहाटि ची लोकसंख्या २००१ च्या शिरगणतीनुसार ८ लाख होती. गोहाटी हे शहर इ.स. पुर्वी ६ व्या शतकात अस्तीत्वात असल्याचे येथील पुरातत्व विभागाच्या उत्खननातुन निष्पन्न् झाले आहे. कामरुप राजवटीत गोहाटी हे राजधानी चे शहर होते. या शहराला महाभारत कालीन संन्दर्भ देखील आहेत. महाभारतातील नरक आणि भागदत्त राजांच्या राजधानिचे हे शहर, १२-१५ व्या शतकात कामता राजाच्या नाशानंतर या शहराच्या वैभवाला उतरती कळा लागली. कामाख्या देवीचे प्रसिध्द् शक्ती पीठ, नवग्रह मंदिर् आणी बसीस्ता येथील ऐतिहासीक अवशेष या शहराच्या गत वैभवाचे साक्षीदार् आहेत.

शिलांग ला जाण्यासाठी आपल्याला दक्षीणे कडे जावे लागते. तसे ईशान्य भारतातील कुठ्ल्याहि राज्यात जाण्यासाठी गोहाटि ला यावेच लागते. परस्पर् एका राज्यातुन दुसर्या राज्यात जायला मार्गच नाही इतका हा प्रदेश दुर्गम आहे. गोहाटी ची वेस ओलांडून आपण जरा पुढे आलो की घाट रस्त्याला जी सुरुवात होते, ती थेट तीन साडेतीन तासानंतर् शिलांग येईस्तोवर. घाटाचा चढ सुरु होताच घनराईने गुरफटून टाकलेले डोंगर नजरेला पडतात, हवेतला ब्रम्हपुत्रे काठचा घामटपणा पार निघुन जातो नि एका सुखद गारव्याच्या अनुभवाने आपण मनोमन उमजतो की आपण मेघलयाकडे जात आहोत.

मेघालयातील् खासी काय् किंवा गारो आणि जयंतीया काय, सगळ्यांचेच इंग्रजी उच्चार् अगदी अधर्, अस्पष्ट. खासी भाषे साठी रोमन लीपी वापरतात्. त्यामुळे अर्थ जरी समजला नाही तरी निदान रोमन स्पेलिंग वरुन् आपण उच्चार तरी करु शकू अशी आपली भोळी समजूत पार् मोडीत निघते. एका पेक्षा एक कठीण शब्द म्हणतांना आपलीच बोबडी वळते.

आपले शब्द खासी शब्द
हात Ka Kti
पाय Ka kjat
चेहरा Ka dur khmat
नाक Ka khmut
जीभ U thylliej
शहर Nongbah
जंगल Lawbah
पाणी Ka um
पुल Ka jingkieng
जमीन Ka khyndew

उमनगोट(Umngot) आणी उमस्यू (Umsiew) ही नद्यांची नावं व उमसोसुम (Umsohsum)
हे शिलांग शहराच्या एका भागाचे नाव. सर्वच दुर्बोध . इथली नावं त्याहुन ताण . ही नावं ऐकल्यावर आपण भारतात आहोत की एखाद्या दक्षीण आशियाई देशाता असा संभ्रम पडतो.

श्री. प्रशांत महमुनी ()
A youth from Pune is working for Seva Bharti Meghalaya for the last 9 years . He new that he will have not place there unless he learns Khasi. He therefore settled himslef in the remote village of Meghalaya and stayed there for 2 years and acquired a good proficiency on Khasi Language. Today he speaks with the village tribes in fluent khasi and has made a place for himself and Seva Bharti in the hearts of the villagers. They approache him in time of any problem. I have seen him in discussions with the villagers in Khasi Language and bowed before him for his selfless service for the North East. When we meet such modern saints working selflessly for the Nations cause, their work does inspire us to contribute our share for this cause


लेखनविषय: दुवे:

Comments

स्वागत

उपक्रमवर स्वागत.
ही नावं ऐकल्यावर आपण भारतात आहोत की एखाद्या दक्षीण आशियाई देशाता असा संभ्रम पडतो.
भारत हा दक्षिण आशियाई देश नाही का?

भुगोलाचा मास्तर
गणा मास्तर
भोकरवाडी बुद्रुक

अवांतरः- फोटु डकवा राव.

त्यांना

ही नावं ऐकल्यावर आपण भारतात आहोत की एखाद्या दक्षीण आशियाई देशाता असा संभ्रम पडतो.

दक्षिण पूर्व आशियाई देशात म्हणायचे असावे. मंडळी, नवोदित / उगवत्या पण उत्साही लेखकांच्या अजाणत्या चुकांकडे दुर्लक्ष करून आपण थोडे त्यांना प्रोत्साहन देऊया.

ता. क. : फोटो मात्र हवेतच. त्या अपराधाला क्षमा नाही :)

--------------------------X--X-------------------------------
गडद जांभळं, भरलं आभाळ,
मृगातल्या सावल्यांना, बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई, मातीला दरवळ ||

त्यांना प्रोत्साहन देऊया

मी ही असेच म्हणतो.
नवीन आणि न ऐकलेला विषय कानी पडेल अशी शक्यता दिसते आहे.


(खोचकपणाचा जाहीर निषेध असो.)
(मिडीयाचा ही)

जरूर द्या, पण....

दक्षिण-पूर्व आशियाई देश म्हणजे आग्नेय आशियाई देश . म्हणजे चीनच्या दक्षिणेचे आणि भारताच्या पूर्वेकडचे. यांत ब्रम्हदेश, कंबोडिया, सयाम, व्हिएटनाम, मलेशिया, इंडोनेशिया वगैरे देश येतात. खासी भाषा ऐकून या देशांची आठवण का व्हावी हे मला समजले नाही. मला नाही वाटत की आपणांपैकी कुणी आग्नेय आशियाई भाषा ऐकल्या असतील. असो, ते महत्त्वाचे नाही.
मला एक वेगळीच शंका आहे. ज्याअर्थी लेखकमहोदयांचे नांव पुर्वान्चल्‌ आहे, त्याअर्थी त्यांचे वास्तव्य काही कालाकरिता का होईना, त्या ईशान्येकडच्या राज्यांत असावे. या दिशेला जी राज्ये आहेत ती आसाम, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, नागालॅन्ड आणि अरुणाचल प्रदेश. (यांत सिक्कीम येते की नाही ते माहीत नाही!) लेखात जरी तसे स्प्ष्ट म्हटले नसले तरी, या सात राज्यांच्या गटाला पूर्वाञ्‌चल म्हणतात की नाही, याबद्दल संशय वाटतो. उत्तर प्रदेश राज्याच्या अतिपूर्वेकडच्या आणि जिथे भोजपुरी भाषा बोलली जाते त्या भागाला पूर्वाञ्‌चल म्हणतात असा माझा आजतागायत (गैर?)समज होता. त्या समजुतीप्रमाणे उत्तरप्रदेशचे, पहाडीभाषिक उत्तरांचल(हा आता उत्तराखंड झाला), ब्रज, अवध, पूर्वाञ्चल आणि दक्षिणेकडचा मध्यप्रदेशाला लागून असलेला बुंदेलखंड असे भाषिक विभाग होते.(चू.भू.द्या.घ्या.)-वाचक्‍नवी

निराशा

अधिक विस्तृत माहिती अपेक्षित होती. पुढील लेखास शुभेच्छा.

सहमत

लेख वाचता वाचता मध्येच संपल्यासारखा वाटतो.

पूर्वी मी बी.एड्. करताना आम्हाला "पाठ्य योजना" नावाचा प्रकार असे. त्यात कोणताही विषय शिकविण्यापूर्वी कागदावर विषय, उद्दिष्ट्ये, पाठ्यपद्धती, सारांश लिहिणे हा एक प्रकार होता. नवोदित लेखकांनी तसा विचार करून पहायला हरकत नाही. म्हणजे त्यांना नक्की काय म्हणायचे आहे ते लोकांना कळेल.

--------------------------X--X-------------------------------
गडद जांभळं, भरलं आभाळ,
मृगातल्या सावल्यांना, बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई, मातीला दरवळ ||

एकाकी पूर्वान्चल

विश्वास कल्याणकर
आलेल्या नोंदींवरुन असे ल्क्षातआले कि या ब्लाग वरिल सन्माननिय सदस्यांच्या तुलनेत मी खरोखरच नवखा आहे. एक् तर माझ्या डोक्यात खुप काही लिहावयाचे आहे. कारण माझ्या नुकत्याच घडलेल्या मेघालयाच्या प्रवासात मी खुप काही अनुभवलेले आहे आणी ते सर्व मला तुमच्यासोबत शेअर करावयाचे आहे. पण माझी गोची होते ती टायपींग करतांना. मी लिहीलेला लेख लिहायला मला चांगले चार तास लागले त्यात खरडपट्टी च्या नोंदी बघुन माझ्या उत्साहात भर पडली कि काय तेच कळत नाही. तरी हतोत्साहीत न होता मी लिहिणार आहेच .

मी पुन्हा १२ सप्टेंबर ला गोहाटी ला जाणार आहे एक महिन्यासाठी कारण तेच माझे कार्यक्षेत्र आहे. सुद्न्य् वाचकानी आवश्य्क त्या सुचना जरुर पाठवाव्यात कारण मी त्यांच्या देखील प्रेमात पडलो आहे.

मला हे सर्व खुपच आवडले आहे.

सर्व सुचकांचे व्यक्तिशः आभार.

मराठी स्पेलचेक

लिहा हो तुम्ही छान लिहिता.
काही मुद्दे सगळे विचारणारच. त्याला इतरजणही उत्तरे देतील. काळजी करू नका.
बाकी
मराठी स्पेलचेक वापरण्या विषयी काय मत आहे आपले?
यामुले तुमचा बराच ताण हलका व्हावा!

आपला
(सूचक)
गुंडोपंत

एकाकी पुर्वाचल

विश्वास कल्याणकर

मराठी स्पेल चेक ची कल्पना चांगली आहे पण ते कसे करायचे ते कळवा.

मराठी

सूचनांमध्ये भर -
शब्दांचे अर्थ देवनागरी लिपीत लिहावेत म्हणजे उच्चार लक्षात यायला मदत होईल.

अनुभव वाचण्यास उत्सुक.

एकाकी पूर्वांचल

विश्वास कल्याणकर

उच्चार आपल्याला हवे तसे करावेत कारण कसे ही केलेत तरी ते चुकच ठरतात त्यांच्या द्रुष्टिने. सरावाने ते अंगवळी पडतात.

पूर्वाञ्चल नक्की कुठे आहे?

पूर्वाञ्चल नक्की कुठे आहे हे समजण्यासाठी खालील दुवा उघडून पहा. किंवा, या दुव्यावरील दुसरा म्हणजे खालचा नकाशा पाहणे.--वाचक्‍नवी

पूर्वांञ्चलाबद्दल

पूर्वांञ्चलाबद्दल आपण देत असलेली माहिती छान आहे. आपण अजून लिहावे.

आपले नाव , विश्वास कल्याणकर, आपल्या प्रतिसादाच्या ते सुरुवातीला येते. नावाच्या आधी क्लिक करुन लिहायला सुरुवात केली तर ते सही प्रमाणे शेवटी जाईल. मग श्री. प्रशांत महमुनी कोण आहेत? त्यांचे स्तुतीपर उद्गार आपल्या बद्दल आहेत का? सेवा भारती या संस्थेच्या कामाची सुद्धा काही माहिती सांगावी!

लेखक महोदय जनकल्याण समितीच्या वतीने प्रवास करत आहेत असे त्यांनी पहिल्या लेखात लिहिले आहे. संघपरिवारामध्ये ईशान्येकडच्या भागाला पूर्वाञ्चल असे म्हणतात असे वाटते. लेखक महोदय कृपया खुलासा करता का?

अजून लिहा आणि फोटो सुद्धा द्या :) माहिती वाचायला आवडेल.
--लिखाळ.

सेवा भारती मेघालय

सेवा भारती पूर्वांचल ही सामाजिक संस्था पूर्वांचलामध्ये कार्यरत आहे. या कार्याला "रा.स्व.संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत पूर्वांचल विकास ही संस्था मदतीचा हात देत आहे. मुख्यत्वेकरुन मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम् या राज्यामध्ये
या योजनेअंतर्गत कार्य् चालू आहे. शैक्षणिक, वसतीग्रुहे, वैद्यकीय प्रकल्प, संस्कार केन्द्र, शिलाई प्रशिक्षण केंन्द्र, महिला बचत गट, हातमाग केन्द्र असे अनेक प्रकल्प आहेत. हे सर्व प्रकल्प आपल्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि समर्पित भावनेमुळे कार्यरत आहेत श्री प्रशांत महामुनी हे मेघालयात गेल्या ९ वर्षा पासुन् कार्यरत आहेन.

विश्वास कल्याणकर

 
^ वर