म्युचल फंडा बाबत माहिती देणारे संकेतस्थळ

मी स्वतः म्युचल फंडाचा वितरक असल्यामुळे सहज चाळा म्हणून या विषयावर मराठीमधे संकेतस्थळाचा शोध घेत असताना असे कोणतेहि संकेतस्थळ आढळले नाहि आणि म्हणूनच मी तसे संकेतस्थळ बनविण्याचा प्रयत्न केला आहे जर मराठी भाषीकानी जर हे संकेतस्थळ पाहून म्युचल फंडा बाबत मी दिलेल्या माहितीवर येथे चर्चा घडवून आणल्यास व माझ्या काहि चुका दा़खवल्यास मला सुधारणा करुन परिपूर्ण माहिती देता येईल.

तुम्ही माझे संकेतस्थळावर जाणेसाठी येथे टिचकी मारा

Comments

अरे वा!

अभिनंदन.

नक्की भेट देउ तुमच्या संकेतस्थळाला.

अवांतर - गुंतवणूक / म्युचुअल फंड इ. संबधीत काही लेख (बहुतेक) उपक्रमावर सापडू शकतील. तुम्ही देखील येथे लिहू शकता.

उत्तम कल्पना

वेगवेगळ्या विषयांना वाहिलेली संकेतस्थळे मराठीत येत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे.
ठाकुरसाहेबांचे अभिनंदन आणि आभार.
वरच्या उजव्या कोपर्‍यात झाडांची, पर्यटन स्थळांची प्रकाशचित्रे दिली आहेत, ती काढुन जरा नोटा लावा राव.

छान

छान. अशा स्थळाची मोठी गरज होती. पण स्थळ स्टॅटिक वाटते आहे. (नसल्यास क्षमस्व.). आपण या विषयावर येथे लेखन केल्यास आनंदच आहे.
आभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...






अभिनंदन!

वेगळ्या विषयावरील संकेत स्थळाअबद्द्ल आभार आणि अभिनंदन!

संपूर्ण संकेतस्थळ बघु शकलो नाहि.. मात्र वरवर पाहता चाणक्य म्हणतात त्याप्रमाणे स्थळ स्थायी (स्टॅटिक) वाटले. लोकांना असलेले प्रश्न जाहिरपणे मांडता येतील का?
शक्य तिथे योग्य मराठी शब्दांचा वापर कौतुकास्पद आहे मात्र त्यातही सुधारणा करता येईलसे वाटते.

तसेच गणा मास्तर म्हणतात तसे जरा अर्थविषयक चित्रे असतील तर पर्याटन केंद्राचे संस्थळ वाटणार नाहि ;)

ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

 
^ वर