रोजच्या आहारात

तुम्ही बद्ध - मुमुक्षु - साधक -सिध्ध यापैकी कोणीही असा, रोजच्या आहारात खालील गोष्टींचा अविर्भाव करणे उत्तम, असे समजते.....लाभ घ्यावा..

१. तीन लीटर पाणी
२. दोन चमचे आवळा- रस
३. दोन चमचे कोरफडिचा रस
४. दोन -तीन भिजवलेले अंजीर
५. दोन -तीन भिजवलेले बदाम
६. एक आक्रोड़
७. एक - दोन मोसंबी (सोलून खाणे )
८. आणखी एखादे फळ
९. ताक
१०. सांज - सकाळ एक - एक अश्वगंधा वटी
११. सांज - सकाळ एक - एक शिलाजित वटी (बाबा रामदेव - पतंजलि केंद्रात उपलब्ध)
१२. दोन खारका
१३. काकडी, गाजर, मुळा यापैकी काहीतरी
१४. एक चमचा त्रिफ़ळा चूर्ण
१५. दूध

......याशिवाय अर्थातच तुमची बायको, तुम्ही, वा आणखी कोणी जे काही बनवते, ते...

लेखनविषय: दुवे:

Comments

गोळी

यादीत दिलेल्या गोष्टी, एकाच गोळीत किंवा काढ्यात उपलब्ध आहेत का? असल्यास कुठे मिळेल?

सहमत आहे !

>>यादीत दिलेल्या गोष्टी, एकाच गोळीत किंवा काढ्यात उपलब्ध आहेत का? असल्यास कुठे मिळेल?
मलाही कळवा अशी गोळी मिळाली तर !

-दिलीप बिरुटे

दोन प्रश्न

१. हे नियमित आहाराऐवजी घ्यायचे की आहारासोबत.
२. हे सर्व परवडेल का? कोथिंबीरीची गड्डीच ५६ रुपयाला एक आहे असे आज वाचले. :(


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

दोन परस्पर उत्तरे

१. हे नियमित आहाराऐवजी घ्यायचे की आहारासोबत.

लेखातील शेवटची ओळ वाचली तर हे सर्व (घरगुती) आहारासोबत घ्यायचे आहे हे कळेल.

२. हे सर्व परवडेल का?

हे ज्यांना परवडते त्यांच्यासाठीच असावे. ;-)


कोथिंबीरीची गड्डीच ५६ रुपयाला एक आहे असे आज वाचले. :(

बापरे! पण ५६ का? मला वाटायचे फक्त लोकल ट्रेन्सच ८:२३, २:१३ असे आडनिडे आकडे वापरतात. ;-)

बाकी, आहारातील जडी-बुटी सोडल्यास इतर गोष्टी चविष्ट दिसतात. करून पाहायला हवे. :-)

ओह

याशिवाय अर्थातच तुमची बायको, तुम्ही, वा आणखी कोणी जे काही बनवते, ते...

ओह याचा रंग वेगळा असल्याने लक्ष गेले नाही.

बापरे! पण ५६ का? मला वाटायचे फक्त लोकल ट्रेन्सच ८:२३, २:१३ असे आडनिडे आकडे वापरतात. ;-)

नक्की कल्पना नाही मात्र भाज्यांचे भाव मागणी वि. पुरवठा असे ठरतात. ५६ या भावाला विक्रेते आणि श्रीमंत खरेदीदार यांनी मान्यता दिली असावी.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

कोथिंबिरीचा भाव

यादी बनवतांना कमी असावा, त्यामुळे तिचा समावेश नाही. तो तसाच राहिला तर पुढील आवृत्तीमध्ये कदाचित येईल.
पण इतर अशक्यप्राय गोष्टी खाल्ल्याने नेमका कोणता लाभ होणार आहे?

रंग?

याशिवाय अर्थातच तुमची बायको, तुम्ही, वा आणखी कोणी जे काही बनवते, ते...

ओह याचा रंग वेगळा असल्याने लक्ष गेले नाही

रंग कुणाचा वेगळा? बायकोचा?
सन्जोप राव
उर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोती मे!

गमतीशीर

गमतीशीर आहार आहे :)
रोज खारका, अंजीर, बदाम, दूध, आक्रोड शिवाय आवळा, कोरफड असले कसले-कसले रस, कल्यातरी वट्या- चूर्ण .. वा वा वा! हे असं (महागडं!)खाणं रोज खाल्यावर जेवायचं काय आणि कधी?

शिवाय मोसंबी सोलून खाणे हे सांगितलेत ते बरे झाले.. हो! एखाद्याने तशीच खाल्ली असती ;)

बाकी प्रियालीताई,
आम्रिकेत राहून अडनिड्या किंमती बघुन दचकलात म्हणजे कमाल आहे ;)

(कोथिंबीरीसाठी ब्यांकेत (शीत)लॉकरचा अर्ज करण्याच्या विचारात) ऋषिकेश
------------------
समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव

आहार

>>एक - दोन मोसंबी (सोलून खाणे )
बाकीची तशीच खाणे.
>>तुम्ही बद्ध - मुमुक्षु - साधक -सिध्ध यापैकी कोणीही
बद्ध म्हणजे बद्धकोष्ठ झालेले का?

एवढे सर्व खाऊन जेवायचे सुद्धा म्हणजे वजनाचं काय होणार हो?

एवढ्या अवांतरानंतर
या गोष्टींचा आविर्भाव (अंतर्भाव म्हणायचे असावे) केल्याने काय फायदे होतात? त्याचा काही अभ्यास झाला आहे का? कुठे जुना उल्लेख आहे का?

खराटा.

पैशे??

४. दोन -तीन भिजवलेले अंजीर
५. दोन -तीन भिजवलेले बदाम
६. एक आक्रोड़
७. एक - दोन मोसंबी (सोलून खाणे )

पैशे??

आपला,
(गरीब) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

कुठे समजले?

तुम्ही ...कोणीही असा, रोजच्या आहारात खालील गोष्टींचा अविर्भाव करणे उत्तम, असे समजते...

नाडीपट्टीवर "योग्य आहार" यादी देखील लिहली होती की काय?

"विरंगुळा|स्फुट" आवडला|ले :-)

हम्म..

यादीतील पदार्थ कोणत्या क्रमाने खावेत? ते खाल्याने नक्की काय फायदा होतो?

खायचे ?

खायचे अस कुठे म्हणलय ? नुस्ता अविर्भाव करायचा खाल्लाय असा. नाही का हो शशिभाऊ ?

रोजच्या आहारात!

या यादीत एक वाटी पंचगव्य व दोन चमचे शिवांबू यांचाही उल्ले़ख हवा होता.

आहार व किमती

४. दोन -तीन भिजवलेले अंजीर
५. दोन -तीन भिजवलेले बदाम
६. एक आक्रोड़

ह्यांच्या किमती रु. १०/- चे मॅगी पाकिट किंवा रु. ५ चे लेज् वेफर्स किंवा एक पेग मद्य इ. पेक्षा कितीतरी कमी आहेत. पूर्वी मला माझे वडिल सांगायचे की दुधात रु. १०००/- प्रति कि.ग्रॅ. ची एक चमचा नेस्कॉफी घालण्यापेक्षा दोन काड्या केशर व एक चमचा बदाम तुकडे घालणे स्वस्त व आरोग्यदायी. अर्थात मला कॉफीचे व्यसन लागल्यामुळे मी ते सर्व ऐकून न ऐकल्यासारखे करीत असे हा भाग अलाहिदा :)

--------------------------X--X-------------------------------
गडद जांभळं, भरलं आभाळ,
मृगातल्या सावल्यांना, बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई, मातीला दरवळ ||

'माहितीपूर्ण' विरंगुळ्याची कल्पना आवडली.

'माहितीपूर्ण' विरंगुळ्याची कल्पना आवडली.
प्रतिसादात आहाराबद्दल, खाद्यपर्थांच्या गुणधर्मांविषयी विशेष काही नसले तरी खाद्यपदार्थांचे बाजारभाव, अर्थिक नियोजन या विषयी माहिती आहे !

>>११. सांज - सकाळ एक - एक शिलाजित वटी (बाबा रामदेव - पतंजलि केंद्रात उपलब्ध)<<
यातून दोन विशेष गोष्टी समजल्या १) शिलाजित हा प्रकार रस्त्याकडेच्या जडिबूटीवाल्याकडेच फक्त मिळत नसून इतरत्रसुद्धा मिळतो. २) रामदेवबाबा यांचे योगकेंद्र आहे आणि तेथे शिलाजित मिळते.
शिलाजित काय आहे हे पाहण्यासाठी थोडा गुगलशोध घेतला. थोडी माहिती मिळाली.

--(मधुकरवृत्तीने माहिती संकलन करणारा) लिखाळ. :)

सफरचंद

सफरचंद चा सामावेश का नाही? फक्त एवढाच आहार घेतला तर तो शरिराला पुरेल का? सध्या आम्ही सकाळी रसाहार घेतो. कडुलिंब, कारले, दुधी, तुलसी, आवळा ई. हल्ली टेकडीवर् फिरायला जाताना मिळतो रसाहार. वर्षात आम्ही बरेच सडपातळ झालो.
प्रकाश घाटपांडे

कडू

लहानपणी आम्हा मुलांना कारले खायची सक्ती केली जायची. कारण विचारले असता सर्व रस पोटात जायला हवेत असे सांगितले जायचे.

आम्ही हे फारच मनावर घेतले. हल्ली जेवणात कारले फार मिळत नाही. म्हणून अनेकवेळा संध्याकाळी (सोनेरी रंगाचा) कडू रस घेतो. :)

खराटा

वा!

मलाही हा कडू रस फार आवडतो बरं का!

तसं कारलंही आवडतच बॉ!

आपला
गुंडोपंत

शंका (लाल अक्षरात) समाधानाचा लाभ विचारकांनी द्यावा

तुम्ही बद्ध - मुमुक्षु - साधक -सिध्ध यापैकी कोणीही असा, (नसल्यास?)रोजच्या आहारात खालील गोष्टींचा अविर्भाव करणे उत्तम, असे समजते.....लाभ घ्यावा..

१. तीन लीटर पाणी (कुठल्या कंपनीच्या बाटलीतले? बाबा रामदेव - पतंजलि केंद्रात उपलब्ध आहे /नाही ?)
२. दोन चमचे आवळा (जास्त जोरात नको) रस - (राय का विलायती?)
३. दोन चमचे कोरफडिचा रस (बाबा रामदेव - पतंजलि केंद्रात उपलब्ध नसेल तेथे कोणाकडून?)
४. दोन -तीन (वाळवून का ताजे) भिजवलेले अंजीर
५. दोन -तीन भिजवलेले बदाम (पत्यातल्या बदामाच्या साईजचे की त्यापेक्षा मोठे?)
६. एक आक्रोड़ (न फोडताच?)
७. एक - दोन मोसंबी (सुरीने की नखांने? बियासकट?) सोलून खाणे
८. आणखी एखादे फळ (मनुका चालतील का? )
९. ताक (फुंकून?)
१०. सांज(वेळी तीर्थाच्या कार्यक्रमानंतर की आधी?) - सकाळी (विधीच्या आधी की नंतर?)एक - एक अश्वगंधा वटी (बाबा रामदेव - पतंजलि केंद्रात उपलब्ध)
११. सांज - सकाळ एक - एक शिलाजित वटी (सकाळच्या प्राशनानंतर तात्काळ रतिसुखात बाधा आल्यास बाबा रामदेव - पतंजलि केंद्रात काही सोय उपलब्ध?)
१२. दोन खारका (बियासकट'?)
१३. काकडी, गाजर, मुळा यापैकी काहीतरी (किती?)
१४. एक चमचा त्रिफ़ळा चूर्ण (रात्री की सकाळी?)
१५. दूध (बकरीचे की गाढवीचे की रासायनिक)

......याशिवाय अर्थातच तुमची बायको, तुम्ही, वा आणखी कोणी जे काही बनवते, ते.(मार सुद्धा?)..

 
^ वर