बदक

हे बदक छानपैकी ऊन शेकत बसले होते. मी जवळ जाताच सावध झाले.
तांत्रीक बाबी:
शटर स्पीड : १/२५०
ऍपरचर : ५.६
ISO : १००
कॅमेरा : Canon EOS 350 D
लेन्स : Canon EF 70-300 IS USM
रॉ मधे खेचला आणि कलर करेक्शन, शार्पनेस टाकला.
प्रतिक्रीया आणि सुधारणा कळवावी.

-अनूप

लेखनविषय: दुवे:

Comments

बदक आवडले

बदक छान आहे. डोळ्यामध्ये घाबरल्याचा भाव मस्त आला आहे.

आपला,
(डोमकावळा) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

+१

असेच म्हणतो!

फोटो इन्डोअर काढला आहे का? पार्श्वभुमी नक्की कशाची आहे ह्यावर विचार करतो आहे...

नाही

तळ्याच्या काठी. पार्श्वभुमी तळ्याचे पाणी आहे. मी तळ्याच्या काठावर झुडूपांमागे उभा होतो आणि बदक तळ्यात.

रंग

रंग अतिशय छान उमटले आहेत.
आवडले.
छायाचित्र जरा अजुन मोठे करुन लावलेत तर उत्तम.

मोठा फोटो....

बघा.... येथे मोठा फोटो बघता येईल. मी जरा लाहान करुन पिकासा वर लोड केला. (स्पेस लिमीट... :( )

कुठे काढला आहे

हे बदक कुठे छानपैकी ऊन शेकत बसले होते?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

युनीयन सिटी

युनीयन सिटी, कॅलीफोर्नीया. येथे सिटी लायब्ररी जवळ छान तळे आहे. खुपसारे पक्षी येतात. त्यादिवशी, मी जवळपास १०० फोटो खेचले. पण ३-४ चांगले आलेत. त्यापैकी हा एक. मी तेंव्हा उडत्या पक्ष्याचा फोटो घेण्याचा प्रयत्न करत होतो. पण हे बदक वेगळे बाकी सर्वांमध्ये उठून दिसत होते.

मस्त बदक

वा छान बदक ! :)
तो डाव्या-खालच्या कोपर्‍यातला हिरवा ठिपका लाईट आहे ना? का निघालेले पीस?

ऋषिकेश
------------------
दोन पायांच्या उंदराला काय म्हणता?...... मिकी माऊस!!!!
बरोब्बर... दोन पायांच्या बदकाला?........ डोनाल्ड डक!!!! चूक!!!!!!! "बदक" बदकाला दोनच पाय असतात.

कोण रे तोऽऽ दोन पायाच्या सिंहाला विचारतोय!? ;)

नाही

तो बदक झुडूपामागे होता. तो हिरवा ठिपका झाडाचे पान आहे. मला जास्त GIMP मधे एडीटींग जमत नसल्यामुळे तो काढता आला नाही.

सुंदर

वा .. बदकाचे चित्र फार सुंदर आहे. छान ऊन पडले आहे...
कोणते बदक आहे हे?

चोचीच्या पुढे थोडी अधिक जागा ठेवली असती तर अजून चांगले झाले असते असे मला वाटले.
--(पक्षीमित्र) लिखाळ.

 
^ वर